12th Marathi Guide Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक Textbook Questions and Answers
नमुना कृती
1. परिणाम लिहा :
प्रश्न 1.
घटना | परिणाम |
अ. अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला. | ………………….. |
आ. परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते. | …………………. |
उत्तर :
घटना | परिणाम |
अ. अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला. | तिचे नृत्य कायमचेच बंद पडण्याच्या मार्गावर होते. |
आ. परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते. | पंडितजींच्या कल्पकतेला येथे आव्हान मिळाले. |
2. अभिव्यक्ती.
प्रश्न 1.
‘कृत्रिम पायाच्या मदतीने दि व्यां गत्वाव र मात करता येते’, हे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
जयपूर फूट आता जगप्रसिद्ध झाला आहे. आजपर्यंत हजारो विकलांग लोकांनी हा कृत्रिम पाय बसवून घेतला आहे. ही मुलेमाणसे आता सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. यांच्या कथा प्रेरणादायक आहेत.
एक कथा आहे नायरा नावाच्या तीन वर्षांच्या मुलीची. तिचे वडील स्वतः फार्मासिस्ट आहे. नायरा जन्मतः च कमकुवत होती. तीन वर्षांपर्यंत तिला उभे राहता येत नव्हते, चालता येत नव्हते. हा जयपूर फूट बसवल्यावर मात्र नायरा सोबतच्या मुलीबरोबर खेळू लागली; बागडू लागली; धावू लागली.
कॉर्पोरेट जगताने आता यात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांपैकी एक आहे – लेमन ट्री हॉटेल. एक २३ वर्षांचा तरुण पायाने अधू होता. त्याला एक दानशूर व्यक्तीने जयपूर फूट बसवून दिला. तो आता सहायक म्हणून या हॉटेलमध्ये काम करतो. हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांची देखभाल करण्याचे काम तो करतो. तो आता हॉटेलचा मॅनेजर होण्याचे स्वप्न पाहत आहे. त्या कंपनीत आतापर्यंत ४०० विकलांगांची भरती केली गेली आहे.
एकंदरीत, विकलांगत्वावर मात करून सर्वसाधारण माणसाचे आयुष्य नक्की जगता येऊ शकते, हे आता सगळ्यांनाच मान्य झालेले आहे.
Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक Additional Important Questions and Answers
कारणे लिहा :
प्रश्न 1.
पंडितजींच्या कल्पकतेला आव्हान मिळाले; कारण –
उत्तर :
पंडितजींच्या कल्पकतेला आव्हान मिळाले; कारण उपलब्ध कृत्रिम पाय खूप महागडे होते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांची चाल सुलभ होताना दिसत नव्हती.
प्रश्न 2.
त्या कृत्रिम पायाचे नाव ‘जयपूर फूट’ ठेवण्यात आले; कारण –
उत्तर :
त्या कृत्रिम पायाचे नाव ‘जयपूर फूट’ ठेवण्यात आले; कारण जयपूरमधल्या एका रुग्णालयात तो प्रथम विकसित झाला होता.
चौकटी पूर्ण करा :
प्रश्न 1.
- सुधाचंद्राच्या आयुष्यावरील चित्रपटाचे नाव – [ ]
- जयपूरमध्ये मिळणाऱ्या कृत्रिम पायाचे नाव – [ ]
- विकलांगांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव – [ ]
- कृत्रिम पाय तयार करणारे – [ ]
- सुरुवातीला पंडितर्जीनी पाय तयार करण्यासाठी वापरलेला पदार्थ – [ ]
उत्तर :
- सुधाचंद्राच्या आयुष्यावरील चित्रपटाचे नाव : नाचे मयूरी
- जयपूरमध्ये मिळणाऱ्या कृत्रिम पायाचे नाव : जयपूर फूट
- विकलांगांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव : डॉ. प्रमोद किरण सेठी
- कृत्रिम पाय तयार करणारे : पंडित रामचरण शर्मा
- सुरुवातीला पंडितजींनी पाय तयार करण्यासाठी वापरलेला पदार्थ : बांबू
जयपूर फूटचे जनक Summary in Marathi
जयपूर फूटचे जनक
‘नाचे मयूरी’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. सुप्रसिद्ध नर्तिका सुधा चंद्रन हिच्या आयुष्यावर तो आधारित होता. एका अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला होता. साहजिकच तिचं नृत्य कायमचंच बंद पडण्याच्या मार्गावर होतं; पण सुधा जयपूरला गेली आणि तिथं तयार करण्यात आलेला कृत्रिम पाय आपल्या गमावलेल्या पायाच्या जागी बसवला, नृत्याची कारकीर्द तिनं नव्यानं सुरू केली आणि त्या कृत्रिम पायाच्या आधारानं तिनं भरघोस यश मिळवलं. सुधानं बसवून घेतलेल्या त्या कृत्रिम पायाचंच नाव आहे ‘जयपूर फूट’, जयपूरमधल्या एका रुग्णालयात तो प्रथम विकसित केला गेला म्हणून त्याला ते नाव मिळालं.
जयपूरच्या रुग्णालयात डॉ. प्रमोद किरण सेठी अनेक विकलांगांवर उपचार करीत होते. पोलिओची बाधा झाल्यामुळे दिव्यांगत्व आलेल्या मुलांना पाहून त्यांना एक कल्पना सुचली. पंडित राम चरण शर्मा या कलाकाराला विविध प्रकारची विलक्षण साधनं तयार करताना त्यांनी पाहिलं होतं. त्यांनी पंडित ना सणालयात येण्याचं आमंत्रण दिलं.
पंडितींनी सणालयात, ज्यांचे पाय काही कारणांनी गमावले आहेत अशांना परदेशातून आयात केलेले, महागडे कृत्रिम पाय बसवताना पाहिलेलं होतं, ते परवडणारे नव्हते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांचीही चाल काही सुलभ होत असताना त्यांना दिसली नव्हती. ते पाहून त्यांच्या कल्पकतेला आव्हान मिळालं. त्यांनी व्हल्कनाईज्ड रबर आणि लाकूड या सहजगत्या उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून हालचाल करण्यास सुलभ असा पाय तयार केला.
डॉ. सेठी यांनी तो आपल्या एका रुग्णाला बसवून पाहिला. त्यासाठी शस्त्रक्रियेची नवी पद्धत विकसित केली, त्या रुपणाला त्याचा फायदा झाल्याचं पाहून त्यांनी पंडितजींना आणखी तसेच पाय तयार करायला सांगितलं. आता परदेशातून कृत्रिम पाय आयात न करता हे लाकडी पाय बसवण्याचाच सिलसिला सुरू झाला. सुरुवातीला तर पंडितजींनी बांबूचाच वापर केला होता; पण हळूहळू इतरही पदार्थाचा वापर करायला त्यांनी सुरुवात केली.
आता जगभर त्याचं रोपण केलं जातं. अदययावत प्लास्टिक व अॅल्युमिनियम यांचा वापरही आता करण्यात येतो. पण मूळ कल्पना मात्र पंडितर्जीचीच राहिली आहे.
– डॉ. बाळ फोंडके