Chapter 13 संतवाणी
Textbook Questions and Answers
(अ)
ऐका. वाचा. म्हणा.
प्रश्न 1.
सकलसंतगाथा खंड पहिला: संत सेना अभंग
अभंग क्रमांक 15
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी
उत्तरः
आजि सोनियाचा दिवस।
दृष्टी देखिलें संतांस।।1।।
उपरोक्त पंक्ती संत सेना महाराजांच्या ‘संतवाणी’ अभंगातील आहे. संतांच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांचा दिवस सोन्यासारखा झाल्याप्रमाणे त्यांना वाटत आहे. मौल्यवान अशा सोन्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने दिवसही मौल्यवान झाल्याचा त्यांचा भाव आहे. ‘सोन्याचे’ रुपक देऊन कवितेत सौंदर्य निर्माण झाले आहे.
जीवा सुख झालें।
माझें माहेर भेटलें।।2।।
संत सेना महाराज आपल्या अभंगात सुखाची भावना व्यक्त करताना माहेरची उपमा देतात. संत दर्शनाने त्यांना माहेर भेटल्याचा आनंद होत आहे. सासरी गेलेली मुलगी माहेरी जशी अतिशय आनंदी असते तसेच संत भेटल्याने माहेर भेटले असा भाव त्यांनी व्यक्त केला आहे. सुखाला माहेरची उपमा देऊन काव्यसौंदर्य खुलवले आहे.
अवघा निरसला शीण।
देखतां संतचरण।।3।।
संसारातील कामांमध्ये विविध अडचणी, थकवा, चिंता काळजी असते. पण सेना महाराजांना जेव्हा संत चरण दिसले तेव्हा त्यांच्या सर्व काळज्या, शीण निघून गेला. त्यांना सुख प्राप्त झाले. संतांच्या सहवासात त्यांना
समाधान मिळाले.
आजि दिवाळी दसरा।
सेना म्हणे आले घरा।।4।।
संत सेना महाराजांचा भाव उत्कट आहे. त्यांना कदाचित खऱ्या दिवाळी व दसऱ्याबद्दल विशेष कौतुक नसेल ही पण जेव्हा संत आपल्या घरी येतात, त्यांचे चरण आपल्या घरी लागतात, तेव्हाच खऱ्या अर्थी त्यांच्यासाठी दसरा किंवा दिवाळी असते. तो दिवस त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा असतो. त्यांच्या सान्निध्यात सेना महाराजांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. दसरा व दिवाळीचे रुपक घेऊन अभंगाला काव्यसौंदर्य प्राप्त झाले आहे. ‘दसरा – घरा’ या शब्दांचे सुंदर यमक कवीने साधले आहे.
भावार्थ:
संत सेना महाराज संतभेटीने झालेल्या आनंदाचे वर्णन करताना म्हणतात, “संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोनियाचा झाला असून ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आल्याने आनंद होतो तसा आनंद मला झाला आहे. या आनंदाचे वर्णन करताना पुढे ते म्हणतात, संतचरण दृष्टीला पडल्याने माझा सगळा शीण नाहीसा झाला असून घरी दिवाळी, दसरा या सणांसारखा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे.”
(आ)
ऐका. वाचा. म्हणा.
प्रश्न 1.
सकलसंतगाथा खंड पहिला: संत चोखामेळा अभंग
अभंग क्रमांक 37
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी
उत्तरः
चंदनाच्या संगे बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।1।।
संत चोखामेळा यांच्या ‘संतवाणी (आ)’ या अभंगात, चंदनाच्या झाडाची संगत लाभली तर बोरी, बाभळीसारखी सामान्य झाडेही सुगंधित होतात. लहान-सहान झुडुपांनाही चंदनाचा सुगंध प्राप्त होतो. तसेच संतांच्या सहवासाने सामान्य जनांनाही लाभ होतो. असा आशय नमूद करून कवितेचे काव्यसौंदर्य खुलविले आहे. संतांना चंदनाची उपमा दिली आहे.
संतांचिया संगें अभाविक जन।
तयाच्या दर्शनें तेचि होती।।2।।
चोखामेळा यांनी आपल्या अभंगात खात्रीने पटवून दिले आहे की, अभाविक जनांना संत सहवास लाभला की ते संतच होऊन जातात एवढी संतांची महती आहे. ते त्यांना आपल्यासारखेच करतात. त्यांच्यातील दुर्गुण काढून टाकतात. अत्यंत मोजक्या शब्दांत संत चोखामेळा यांनी मोठा आशय स्पष्ट केला आहे. कवितेचे भावसौंदर्य या उदाहरणाने आणखी खुलले आहे.
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा। नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा।।3।।
संत चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतात, जन्मास येऊन प्रत्येकाने खरा परमार्थ साधावा. संतांचा, गुणिजनांचा सहवास घ्यावा. आपल्या वृत्तीत पालट करावा. संतांच्या सहवासाने हे शक्य होते. पण असे न केल्यास आपला जन्म वाया जातो व भूमीस भार झाल्यासारखे होते. म्हणून मानव जन्माचे सार्थक करून घेणे योग्य. चोखामेळांनी संत सहवासाची महानता स्पष्ट करून कवितेचे आशयसौंदर्य खुलविले आहे.
भावार्थ:
संत चोखामेळा म्हणतात, “ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात बोरी, बाभळी, अन्य झाडे व झुडपे आली तर ती चंदनाप्रमाणे सुगंधी होतात त्याप्रमाणे संतांच्या सहवासातही आलेले सर्वजण भाविक बनतात. मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा नाहीतर आपले जीवन भूमीला भारभूत ठरेल.”
प्रश्न 2.
खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. आकृतीतील शब्दांचा उपयोग करुन अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.
उत्तरः
- तुषार गुणी आहे.
- तो पिवळा चेंडू खेळतो.
- तुषारला मिठाई आवडते.
- मेथीची भाजी ताजी आहे.
- तो मोठा व्यक्ती आहे.
- तुषारला लाडू आवडतात.
- ताजी भाजी घे.
- तो खेळकर आहे.
- ती वस्तू सुंदर आहे.
- तो ताजी भाजी खातो.
- तो मोठा चेंडू रंगीत आहे.
- हिरवी, ताजी मेथी खावी.
हे नेहमी लक्षत ठेवा.
जीव धोक्यात घालू नका,
दरीत डोकावून पाहू नका.
भर रस्त्यात गाडी थांबवू नका,
इतरांना जाण्यासाठी व्यत्यय आणू नका.
प्रश्न 1.
घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.
Additional Important Questions and Answers
पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
प्रश्न 2.
चौकट पूर्ण करा.
उत्तरः
- असा दिवस आहे – [सोनियाचा]
- दृष्टीस दिसले – [संत]
- सुख झाले – [जीवा]
प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तर लिहा.
संत सेना महाराजांचा शीण कशामुळे गेला?
उत्तरः
संतचरण पाहून संत सेना महाराजांचा शीण गेला.
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
उत्तरः
प्रश्न 2.
जोया जुळवा.
अ | ब |
1. सोनियाचा | (अ) संतांस |
2. देखिलें | (आ) माहेर |
3. भेटले | (इ) दिवस |
4. निरसला | (ई) सुख |
5. जीवा | (उ) शीण |
उत्तरः
अ | ब |
1. सोनियाचा | (इ) दिवस |
2. देखिलें | (अ) संतांस |
3. भेटले | (आ) माहेर |
4. निरसला | (उ) शीण |
5. जीवा | (ई) सुख |
प्रश्न 2.
रिकाम्या जागा पूर्ण करा.
- दृष्टी देखिलें ……………..
- माझे …………….. भेटले.
- ………..”म्हणे आले घरा.
उत्तर:
- संतास
- माहेर
- सेना.
कृती 3: काव्यसौंदर्य.
खालील पंक्तींचा आशय स्पष्ट करा.
प्रश्न 1.
जीवा सुख झालें।
माझें माहेर भेटलें।।
उत्तरः
संत सेना महाराज आपल्या अभंगात आपल्या सुखाची
तुलना माहेराशी करतात. संतांना माहेर हेरुपक देऊन संत हेच माहेरम्हणूनआनंददायीभावतेव्यक्तकरतात.सासरीगेलेल्या मुलीला माहेरी किती सुख वाटते हे सांगून सुखाची भावना सेना महाराजांनी व्यक्त केली आहे व संतांना भेटून माहेर भेटल्याप्रमाणे आनंद झाला आहे, असे सांगितले आहे.
माहेर भेटले या रुपकाने काव्यसौंदर्य खुलवले आहे. झाले-भेटले या शब्दांचे यमक साधले गेले आहे.
प्रश्न 2.
आजि दिवाळी दसरा।
सेना म्हणे आले घरा।।
उत्तर:
संत सेना महाराजांचा भाव उत्कट आहे. त्यांना खऱ्या दिवाळी व दसरा सणांबद्दल विशेष उत्सुकता नाही. पप संत आपल्या घरी येतात तोच दिवस त्यांना विशेष आनंदाचा म्हणजे दिवाळी व दसऱ्यासारखा वाटतो. त्या दिवशी त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो. दसरा व घरा या शब्दांचे यमक साधले आहे. संतांचे आगमन हाच दिवाळी दसरा असा उच्च भावार्थ सांगून कवितेचे भावसौंदर्य खुलवले आहे.
प्रश्न 3.
तुम्हांला माहीत असलेल्या संतांविषयी तुमच्या शब्दांत विचार मांडा.
उत्तरः
मी सुट्टीत संतश्रीरामदास’ यांचे छोटेसे चरित्रवाचले. लहानपणी पोहण्यात पटाईत असलेला, झाडावरून उड्या मारणारा नारायण, मठिपणी तपश्चर्या करून सत रामदास होतात. समाजाला प्रयत्नांची कास धरायला शिकवतात. अक्षर कसे काढावे?, विदयार्थ्यांनी पाठांतर कसे करावे? हेही सांगतात. आळस करू नये असे बजावतात.
नारायण सूर्याजीपंत ठोसर हे त्यांचे पूर्ण नाव पण त्यांनी ‘दास’ किंवा ‘रामदास’ या नावाने उदंड लेखन केले आहे. मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम या त्यांच्या मुख्य रचना. विदयार्थ्यांनी मनाच्या श्लोकाचे पाठांतर केल्यास त्यांच्यावर सुविचारांचा प्रभाव राहील यात शंका नाही.
प्रश्न 4.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी/कवयित्री – संत सेना महाराज
2. कवितेचा रचनाप्रकार – अभंग
3. कवितेचा काव्यसंग्रह – प्रा. डॉ. र. रा. गोसावी संपादीत सकलसंतगाथा खंड पहिला संतसेना अभंग क्र. 14
4. कवितेचा विषय – संतांच्या सान्निध्यान मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन केले आहे.
5. कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायी भाव) – शांत रसाचा भाव कवितेतून व्यक्त होतो.
6. कवी/कवयित्राची लेखन वैशिष्ट्ये – अतिशय साध्या, सोप्या शब्दांद्वारे मोठा आशय व्यक्त करण्याचे कसब सुंदर आहे. ‘दसरा-घरा, शीण-चरण’ यांचे यमक साधलल्याने नादमयता निर्माण झाली आहे.
7. मध्यवर्ती कल्पना – संतसेना महाराज संतांच्या सान्निध्यात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन करतात. दिवाळी-दसरा प्रत्यक्ष नसला तरी संतांची जेव्हा भेंट होते ते क्षणच दिवाळी दसऱ्या समान आनंददायी असतात. कवितेतून व्यक्त होणारा विचार – माहेर भेटणे वा दिवाळी दसरा साजरा करणे या जशा आनंदाच्या गोष्टी आहेत तशाच संत सज्जनांचा सहवास मिळणे हाही तेवढाच आनंददायी प्रवास आहे असा विचार कवितेतून व्यक्त होतो.
8. कवितेतील आवडलेली ओळ – आजि सोनियाचा दिवस दृष्टीं देखिलें संतांस. (१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
मला ही कविता आवडली; कारण शांतरसाची निर्मिती झाल्याचे कवितेतून जाणवते. या कवितेतून संत सज्जनांच्या सहवासाची महती कळते.
9. कवितेतून मिळणारा संदेश – संत सज्जनांच्या सहवासाने अवर्णनीय आनंद मिळतो. सर्व शीण, थकवा निघून जातो. म्हणून संत-सज्जनांची संगत धरावी व चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्याव्यात.
पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
प्रश्न 2.
एक/दोन शब्दात उत्तरे दया.
- चंदनाच्या स्पर्शाने सुगंधित होते – [………….] [……………]
- हे जन संत दर्शनाने पावन होतात – [……………]
उत्तर:
- हेकळी, टाकळी
- अभाविक
कृती 2: आकलन कृती
एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रश्न 1.
कोणाच्या सहवासात परमार्थ साधावा?
उत्तरः
संतांच्या सहवासात परमार्थ साधावा.
प्रश्न 2.
अभंगात कोणत्या सुगंधी झाडाचा उल्लेख आला आहे?
उत्तरः
अभंगात ‘चंदन’ या सुगंधी झाडाचा उल्लेख आला आहे.
प्रश्न 3.
खालील पंक्ती पूर्ण करा.
- ……….. संगे बोरीया बाभळी।
- तयाच्या ………………… तेचि होती।
- नाही तरी ……………….. वाहावा खरा ऐसा।
उत्तरः
- चंदनाच्या
- दर्शने
- भार
कृती 3: काव्यसौंदर्य
खालील पंक्तींचा आशय स्पष्ट करा.
प्रश्न 1.
चंदनाच्या संगें बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।1।।
उत्तरः
उपरोक्त पंक्ती संत चोखामेळा यांच्या ‘संतवाणी (आ)’ मधून घेतली आहे. संतांच्या सान्निध्याने सामान्य जनांमध्ये कसे असामान्यत्व येते हे चोखामेळा यांनी उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे.
चंदनाच्या झाडाजवळ बोरी, बाभळीची काटेरी झाडे असतात. लहान-सहान झुडपेही असतात, पण चंदनाच्या सुगंधाने तीही प्रभावित होतात. त्यांनाही तोच सुगंध प्राप्त होतो. संतांना चंदनाची उपमा दिल्याने कवितेस काव्यसौंदर्य प्राप्त झाले आहे. सत्संगतीने सामान्यांना ही लाभ होतो व त्यांच्यात चांगला बदल होतो हे सांगितले आहे. ‘बाभळी, हेकळी, टाकळी’ या शब्दांनी अभंगात अनुप्रास साधला गेला आहे.
प्रश्न 2.
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा |
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा।।३।।
उत्तरः
संत चोखामेळा यांनी ‘संतवाणी (आ)’ या अभंगात संत सान्निध्याचा सुपरिणाम विविध उदाहरणांनी दर्शवला आहे. जसे चंदनाच्या झाडाजवळची लहान मोठी झाडे सुगंधित होतात तसेच संतांच्या सहवासाने अभाविक जन संतांच्या समानच होतात. म्हणून प्रत्येकाने जन्माला येऊन खरा परमार्थ जाणला पाहिजे नाहितर भूमीला भार झाल्यासारखे होईल. आपले जीवन भूमीला भारभूत ठरू नये. संत सहवासाने जीवन पावन करावे असा आशय चोखामेळा यांनी प्रदर्शित केला आहे.
प्रश्न 3.
‘मैत्री कशी असावी?’ या विषयीचे विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
मैत्रीशिवाय आनंद मिळत नाही. पण मैत्रीत भांडणे, द्वेष, मारामाऱ्या होऊ नयेत. चातक जसे पावसाच्या पाण्यासाठी वाट पहात असतो त्याशिवाय तो दुसरे पाणी पीतच नाही तशीच मैत्री हवी. चकोर फक्त चंद्राचे किरण पितो. मग चंद्र वेळेवर उगवला नाही तरी तो रागवत नाही. मैत्री तोडत नाही. मैत्री गुणीजनांशी करावी. चंदनाच्या झाडाने बाकीची झाडेही सुगंधीत होतात तशीच मैत्री करावी. मैत्रीने गुण जोडता यायला हवे.
प्रश्न 4.
दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी/कवयित्री – संत चोखामळा
2. कवितेचा रचनाप्रकार – अभंग
3. कवितेचा काव्यसंग्रह – प्रा. डॉ. र. रा. गोसावी संपादीत सकलसंतगाथा खंड पहिलाः संत चोखामेळा अभंग क्र. ६७
4. कवितेचा विषय – संत सहवासाने आपले जीवन त्यांच्याप्रमाणेच होते हे चंदन, बोरी व बाभळी यांच्या उदाहणांद्वारे पटवून दिले आहे.
5. कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये – अतिशय साधी, सोपी, सरळ शब्दरचना. कवीतेत हेकळी, टाकळी, बाभळी या शब्दांची पुनुरुक्ती असल्याने नादमयता आली आहे. अत्यंत कमी शब्दात मोठा अर्थ सांगण्याचे कौशल्य जाणवते.
6. मध्यवर्ती कल्पना – संत चोखामळा यांनी संत सहवासाची महानता स्पष्ट करून खात्रीने पटवून दिले आहे की जशा सहवाससात आपण राहतो तसेच आपण होतो. संत सहवासाने आपले दुर्गुण कमी होतात. सुसंगती ने समान्यांना लाभ होऊन त्यांच्यात चांगला बदल होतो.
7. कवितेतून व्यक्त होणारा विचार – जन्मास येऊन प्रत्येकाने खरा परमार्थ साधावा. संतांचा, गुणिजनांचा सहवास ध्यावा. आपल्या वृत्तीत बदल करावा. मानव जन्माचे सार्थक करून ध्यावे.
8. कवितेतील आवडेळली ओळ – चंदनाच्या संगे बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।
9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे – मला ही कविता खूप आवडली; कारण ती तर्कदृष्ट्या पटणारी आहे. चंदनाची संगत लाभली तर त्याचा सुवास लागतोच. बाभळी ही सुगंधित होते. यावरून आपल्याला सत्संगाची महती कळते.
10. कवितेतून मिळणारा संदेश – गुणिजनांच्या सहवासात रहावे. आपल्या दुर्गुणांना दूर करावे. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकाव्यात. आपले जीवन भूमीला भारभूत ठरू नये.
Summary in Marathi
काव्यपरिचय:
संत सेना महाराजांनी प्रस्तुत अभंगात संतांच्या सान्निध्यात मिळणाऱ्या अवर्णनीय आनंदाचे वर्णन केले आहे. Saint Sena Maharaj elaborated a joy of having the company of Saints this poem.
प्रस्तुत अभंगात संत चोखामेळा यांनी संत सहवासाने आपले जीवन त्यांच्याप्रमाणेच होते असे सोदाहरण पटवून दिले आहे. तसेच संत सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन त्यांनी या अभंगात केले आहे.
In this abhang Saint Chokhamela a describes with many examples that living in the company of saints, one can be virtuous and can attain happiness.
भावार्थ:
आजि सोनियाचा दिवस।
दृष्टी देखिलें संतांस।।1॥
संत सेना महाराजांनी या अभंगात संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोन्यासारखा झाला असे वर्णन केले आहे. त्यांच्या दर्शनाने त्यांना अपार आनंद झाला आहे.
जीवा सुख झालें।
माझें माहेर भेटलें।॥2॥
सासरी गेलेल्या मुलीला माहेरी जसा आनंद होतो. माहेरची माणसं पाहून ती अत्यंत प्रसन्न होते तसेच सेना महाराजांना संतांना पाहून झाले आहे. जणू काही आपले माहेरच आपल्याला भेटले आहे असे त्यांना वाटत आहे, तितकाच आनंद त्यांना झाला आहे.
अवघा निरसला शीण।
देखतां संतचरण।।3।।
संतांचे दर्शन घेऊन संसारातील सगळा थकवा, दु:ख, काळजी निघून गेली. संतांच्या चरणाचे दर्शन झाल्यावर सगळा शीण नाहीसा झाला, असे संत सेना महाराज म्हणतात.
आजि दिवाळी दसरा।
सेना म्हणे आले घरा।।4।।
दिवाळी आणि दसरा हे आनंदाचे सण. तेथे कशाची कमतरता नसते. सर्व आनंदी असतात. सगळं वातावरणच प्रसन्न, उत्साहाचे असते. जेव्हा संत माझ्या घरी येतात तेव्हा माझ्या घरी जणू दिवाळी आणि दसरा असतो. मला अपार सुख मिळते. सर्वत्र चैतन्य पसरते, असे संत सेना महाराज सांगतात.
चंदनाच्या संगें बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।१।।
संत चोखामेळा यांनी या अभंगात संतांच्या सान्निध्यात राहिल्यास सामान्यांमध्येही असामान्य फरक होऊ शकतो हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे. चंदनाच्या झाडाजवळ असणाऱ्या बोरी बाभळीच्या झाडांना, वाकड्या तिकड्या किंवा लहानश्या झुडूपांनाही चंदनाचा सुगंध प्राप्त होतो.
संतांचिया संमें अभाविक जन।
तयाच्या दर्शनें तेचि होती।।२।।
संतांच्या सहवासात जर अभाविक, नास्तिक लोक राहिले | तर त्यांच्या दर्शनानेही ते सज्जन, आस्तिक व भाविक होतात.
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा।
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा।।३।।
चोखामेळा म्हणतात, जन्मास येऊन खरा परमार्थ साधला पाहिजे नाहीतर मनुष्य जन्म मिळून भूमीस भार झाला असे होईल. संतांच्या सान्निध्याने आपले जीवन पावन करून घेतले पाहिजे.
शब्दार्थ:
- आजि – आज – today
- सोनियाचा – सोन्यासारखा, सोन्याचा – like a gold, golden
- दृष्टी – डोळे – eyes
- देखिले – पाहिले – seen
- अवघा – संपूर्ण – all
- निरसला – दूर होणे, नाहीसे होणे – to put away
- माहेर – विवाह झालेल्या मुलीच्या आईवडीलांचे घर – the place of the parents of a married girl
- शीण – थकवा – fatigue
- संग – सोबत – in company, of
- बाभळी – काटेरी झाड – babul tree
- हेकळी – वाकडी – crooked
- टाकळी – झुडुप – shrub
- चंदन – चंदनाचे सुगंधी झाड- sandalwood
- अभाविक – नास्तिक – atheist
- जन – लोक – people
- भार – ओझे – burden
टिपा:
1. संत: संत म्हणजे महात्मा. प्रपंचात राहूनही संतांनी परमार्थ साधला. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संतांनी मराठी भाषेला वाड्:मयाचा मोठा वारसा दिला आहे. महाराष्ट्रात अनेक थोर संत होऊन गेले.
2. संत सेना महाराज: संत सेना महाराज यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड येथे झाला. त्यांच्या अभंगात देव आणि भक्ती यांचे नाते दिसून येते. सेना महाराजांनी अभंगातून भाक्तिरसाची उपासना केलेली आढळते.
3. अभंग: अभंग हा प्राचीन मराठी साहित्यातील एक काव्यप्रकार आहे. संतमेळ्यांचे विठ्ठलभक्तीपर काव्य अभंग स्वरूपात आहे. आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी स ंप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा उपयोग केला.
म्हण:
संत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।