11th Marathi Digest Chapter 4.5 रेडिओजॉकी Textbook Questions and Answers
कृती
प्रश्न 1.
उत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला प्राप्त करावी लागणारी भाषिक कौशल्ये लिहा.
उत्तरः
उत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला मूलभूत भाषिक कौशल्ये म्हणजे लेखन, वाचन, भाषण-संभाषण, श्रवण कौशल्ये आत्मसात करणे अपेक्षित आहे. रेडिओजॉकी होण्यासाठी तुम्हांला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. वाचन चौफेर हवे तसेच रेडिओजॉकी व्यासंगी हवा.
भाषा, साहित्य व संस्कृती यांची त्याला चांगली जाण असावी. त्याची भाषा साधी, सोपी व ओघवती असावी. शब्दफेक, बोलण्यातील सहजता, माधुर्य त्याच्या निवेदनात असावे. उच्चार सुस्पष्ट व निसंदिग्ध असावेत. भाव-भावना यांची जाणीव असावी. मिंग्शिल (मराठी-इंग्लिश), हिंग्लिश (हिंदी-इंग्लिश) तसेच स्थानिक भाषांची सरमिसळ करून आरजे निवेदन करत असतो. भाषा सकारात्मक. श्रोत्यांचे मन प्रसन्न करणारी. मिस्किल अशी असावी.
रेडिओजॉकीला भाषेचे उत्तम ज्ञान असावे. बोलताना शब्दातील भाव भावना यांचे प्रकटीकरण व्हावे. त्याचा अर्थ भाषेतून श्रोत्यांपर्यंत जाणे अपेक्षित आहे. थोडक्यात भाषेची उत्तम जाण व सरावातून, चांगल्या प्रकारे रेडिओजाकीला निवेदन करता येऊ शकते.
प्रश्न 2.
‘आरजे-एक संवादी व्यक्तिमत्त्व’ हे स्पष्ट करा.
उत्तरः
आरजे ए.एम, एफ.एम. व विविध कार्यक्रमांतून श्रोत्यांशी संवाद साधत असतो. त्याला बोलण्याची व गप्पा मारण्याची आवड असते. उत्कृष्ट संवाद कौशल्य व विनोदाची जाण असणारे व्यक्तिमत्त्व असते. स्टुडिओत वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतीतून त्यांना बोलते करण्याचे कौशल्य आरजेकडे असते.
वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधत असतो. श्रोत्यांशी संवाद साधताना तो अनेकदा अनौपचारिक असतो. ‘डायल इन’ या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणात आटोपशीर आणि अधिकाधिक श्रोत्यांना सामावून घेणारा असतो. श्रोत्यांशी संवाद साधताना मार्दवपणा व हजरजबाबीपणा असतो. आरजे समोरच्याला अधिकाधिक बोलण्याची संधी देत असतो. आरजेचे बोलणे संवादी, गतिमान व सहजस्फूर्त असते.
सलग दोन-तीन तासांच्या निवेदनात आरजे विविध गाणी, किस्से सादर करता-करता श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधत असतो. वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून फोनवरून श्रोत्यांशी संभाषण व चर्चा करत असतो. विविध स्पर्धांचे आयोजन, कोड्यांची रचना व त्यांची उत्तरे, विशेष दिनाची चर्चा यातून आरजेचे संवादी व्यक्तिमत्त्व समोर येते. अनेकदा थेट प्रक्षेपित कार्यक्रमांतून प्रवाही संवाद होत असतो. थोडक्यात आरजे हे संवादी व्यक्तिमत्त्व आहे. श्रोते व मान्यवरांशी होणाऱ्या विविधांगी संवादातून त्याचे व्यक्तिमत्त्व आकारास येते.
प्रश्न 3.
रेडिओजॉकी या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी वाढण्याची तुम्हाला जाणवणारी कारणे लिहा.
उत्तरः
आज प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेडिओ स्टेशन्सच्या स्थापनेमुळे रेडिओ चॅनल हा उदयोग वाढत आहे. ऑल इंडिया रेडिओ, ए.एम., एफ.एम., जाहिरात एजन्सी, विशिष्ट प्रसंग, विशिष्ट कार्यक्रम, विविध मनोरंजन कंपन्या अशा विविध क्षेत्रांत व्यवसायाच्या अनेक संधी रेडिओजॉकीला उपलब्ध होत आहेत. रेडिओ स्टेशन्सच्या वाढलेल्या संख्येमुळे या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी वाढत आहेत.
त्याचबरोबर विविध मनोरंजन कंपन्यांद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वेगवेगळ्या जाहिरात एजन्सीत रेडिओजॉकीला नोकरीची संधी मिळते. आजकाल विविध प्रकारची उत्पादने, सेवा यांच्या जाहिरातीचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात जाहिरात होत असते. यातून रेडिओजॉकीला संधी मिळते.
विशिष्ट प्रसंगांत, आयोजित कार्यक्रमात तसेच ऑल इंडिया रेडिओत अनेक कार्यक्रमांतून रेडिओजॉकीला संधी उपलब्ध होत आहे. थोडक्यात आजच्या युगात वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे रेडिओजॉकीला अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.
प्रश्न 4.
रेडिओजॉकीच्या कामाचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तरः
रेडिओजॉकी अर्थात आरजेचे विविध कार्यक्रम प्रसारित होत असतात. ए.एम., एफ.एम. या खाजगी रेडिओवरून श्रोत्यांची आवड, छंद ओळखून विविध स्वरूपाचे कार्यक्रम प्रसारित होत असतात. विविध वयोगट, महिला, विविध क्षेत्र यांनुसार कार्यक्रमाचे स्वरूप व संहिता बदलत असते. एकाच प्रकारचे कार्यक्रम प्रसारीत झाले तर ते श्रोत्यांना कंटाळवाणे व निरस वाटू लागतात. म्हणून त्यात वैविध्य आणून रंजकता वाढवली जाते.
रेडिओजॉकीचे कार्यक्रम महिलांची आवड-निवड, छंद यांचा विचार करून महिलांसाठी, तसेच युवकांची आवड, ध्येये, स्वप्न डोळ्यांसमोर ठेवन कार्यक्रम तयार केले जातात. शालेय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शेती व त्याच्याशी निगडित मलाखती. मार्गदर्शन. सल्ला यांचा कार्यक्रमात अंतर्भाव असतो.
भारतीय संस्कृतीत सण-उत्सवाला खूप महत्त्व आहे. या सण-उत्सवाच्या निमित्ताने त्यांची माहिती, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आरजे सादर करत असतो. श्रोत्यांच्या आवडीचा आणि रंजनाचा विषय म्हणजे संगीत. त्याचे अनेक कार्यक्रम तो सादर करतो. विशेषतः सलग दोन-तीन तास बॉलीवुड हिट गाणी वाजवून श्रोत्यांचे मनोरंजन करत असतो. वेगवेगळ्या विषयांवर परिसंवादाचे आयोजन केले जाते. त्यातून उद्बोधन होत असते.
श्रोत्यांच्या पत्रांना उत्तरे हा एक कार्यक्रम असतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात तसेच, श्रोत्यांची विविध कार्यक्रमांच्या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया पत्राद्वारे व्यक्त होत असते. कधी कधी अचानक घडलेल्या घटनांवर कार्यक्रम असतो. उदा.
नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना इत्यादी. विज्ञानविषयक घडामोडी, त्यावर भाष्य करणाऱ्या बातम्या प्रसारित होतात. प्रासंगिक घडामोडी, चालू घडामोडी यांवर तसेच विविध सामाजिक, राजकीय विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधणारे कार्यक्रम असतात. वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखतींद्वारे विविध विषयांवर प्रकाश टाकला जातो. थोडक्यात आरजेचे कार्यक्रम हे एकसूरी नसून त्यात विविधता असते.
प्रश्न 5.
‘उत्तम भाषिक कौशल्ये संपादन केलेली व्यक्ती उत्तम रेडिओजॉकी होऊ शकते.’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
लेखन, वाचन, श्रवण, भाषण-संभाषण ही भाषेची कौशल्ये आहेत. कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ही कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असते. रेडिओजोंकी हा संवादी निवेदक, सत्रसंचालक असतो. उत्तम रेडिओजॉकी होण्यासाठी भाषिक कौशल्ये आत्मसात करावीच लागतात. भाषेची जाण असणे.
भाषाशैली, अरोह-अवरोह, उच्चारातील स्पष्टता, निसंदिग्धता असावी लागते. उत्तम भाषिक कौशल्य वाचन आणि व्यासंगाने प्राप्त होत असते. रेडिओजॉकीचे वाचन खूप असावे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजन अशा विविध विषयांची जाण व अभ्यास असावा. रेडिओजॉकीची भाषा साधी, सोपी, सरळ, ओघवती असावी तसेच त्यात मार्दव व माधुर्य असावे.
शब्दफेक, वाक्यांची रचना, सलगता, बोलण्याचा वेग, आत्मविश्वास, आवाजातील भारदस्तपणा या सर्व गोष्टी भाषेची कौशल्ये आत्मसात केल्यानंतरच येऊ शकतात. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचा अभ्यास, त्यातील बारकावे, भाव-भावना यांच्या अभ्यासाने भाषेवर प्रभुत्व प्राप्त होत असते व त्यातूनच भाषिक कौशल्यांचा विकास होताना दिसतो. हे सर्व गुण रेडिओजॉकीत असावेत. त्यातूनच तो उत्तम रेडिओजॉकी होऊ शकतो.
रेडिओजॉकीला सलग दोन-तीन तास कार्यक्रमाचे सादरीकरण करावे लागते. वेगवेगळ्या विषयांची, प्रसंगांची, घडामोडींची माहिती देणे, श्रोत्यांशी अनौपचारिक-औपचारिक संवाद साधणे, मुलाखती, श्रोत्यांशी खेळ खेळणे या सर्व कार्यक्रमात रेडिओजॉकीची भाषा अतिशय ओघवती, प्रवाही, मिश्किल, सहजस्फूर्त अशी असावी. याचाच अर्थ असा की उत्तम भाषिक कौशल्ये आत्मसात केलेली व्यक्ती उत्तम रेडिओजॉकी होऊ शकते या विधानात सत्यता आहे.
प्रश्न 6.
‘उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व हे यशस्वी रेडिओजॉकीचे महत्त्वाचे पैलू आहेत.’ स्पष्ट करा.
उत्तरः
ए.एम., एफ.एम. रेडिओवरून सलग दोन-तीन तास श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधत विविध गाण्यांची मधून-मधून पेरणी करत श्रोत्यांच्या हृदयापर्यंत भिडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रेडिओजॉकी. रेडिओजॉकीकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे. तो श्रोत्यांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतो.
वेगवेगळी कोडी, खेळ इ. माध्यमातून श्रोत्यांना बोलते करत असतो. वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखतीतून विषय सविस्तरपणे श्रोत्यांसमोर मांडण्याचे कौशल्य रेडिओजॉकीत असते. प्रासंगिक घडामोडी, वाढदिवस, दिनविशेष अशा निमित्ताने मान्यवरांशी संवाद, मुलाखती, अनौपचारिक चर्चा यांतून त्याचे सुसंवादी व्यक्तिमत्त्व श्रोत्यांसमोर येत असते. समयसूचकता, हजरजबाबीपणा, मिश्किलपणा, विनोदीवृत्तीने कार्यक्रमाची रंजकता तो वाढवत असतो.
रेडिओजॉकीचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी असावे. त्याचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न, आत्मविश्वासू असते. मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान त्याला असावे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सांगीतिक, क्रीडा, अर्थ अशा विविध विषयांची सखोल माहिती रेडिओजॉकीला असावी. चालू घडामोडी, समाजाचा एखादया गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, फॅशन, क्रीडा, बॉलीवुड, युवक-युवतींचा कल या सर्व बाबींचा सखोल अभ्यास असावा.
समाजात आजुबाजूला घडणाऱ्या बारीक-सारीक घटना, प्रसंग यांची माहिती असावी. सूक्ष्म निरीक्षण क्षमता, सर्जनशीलता ही रेडिओजॉकीची खास वैशिष्ट्ये. थोडक्यात सुसंवाद, प्रवाही भाषा, शब्दफेक, कार्यक्रमाची सलगता टिकवणे, रंजन, सर्जनशीलता या गुणांच्या आधारे रेडिओजॉकीचे व्यक्तिमत्व बहुआयामी बनत असते. हेच व्यक्तिमत्त्व यशस्वी व उत्तम रेडिओजॉकी म्हणून श्रोत्यांसमोर येते.
प्रकल्प.
रेडिओवरील आरजेचे काही कार्यक्रम ऐका. तुम्ही आरजे आहात, अशी कल्पना करून ‘युवकांसाठी करिअरच्या संधी’ या विषयावरील लाईव्ह कार्यक्रमासाठी संहिता तयार करा.
11th Marathi Book Answers Chapter 4.5 रेडिओजॉकी Additional Important Questions and Answers
कृती : १ आकलन कृती
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
प्रश्न 1.
उत्तरः
प्रश्न 2.
अदययावतता’ हा शब्द उत्तर म्हणून येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
आकाशवाणीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते?
आधुनिक जीवनात संपर्क …………………………….. आपल्यासमोर आला आहे. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ११४) |
प्रश्न 3.
म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास दिलेले नाव – [ ]
उत्तरः
म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास दिलेले नाव – [आकाशवाणी]
प्रश्न 4.
१९२७ मध्ये भारतात आकाशवाणी केंद्र सुरू करणारी खाजगी कंपनी – [ ]
उत्तरः
१९२७ मध्ये भारतात आकाशवाणी केंद्र सुरू करणारी खाजगी कंपनी – [इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी]
उपयोजित कृती-१.
प्रश्न 1.
आकाशवाणीवरील किंवा खाजगी रेडिओ केंद्रावरील तुम्हाला परिचित असणारे दोन कार्यक्रम.
उत्तर :
आकाशवाणीवरील किंवा खाजगी रेडिओ केंद्रावरील तुम्हाला परिचित असणारे दोन कार्यक्रम.
प्रश्न 2.
उत्तर:
प्रश्न 3.
उत्तर:
स्वाध्याय कृती
प्रश्न 1.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या आकाशवाणीच्या ब्रीदवाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तर :
आकाशवाणी हे अगदी सामान्यातल्या सामान्य घरात पोहोचलेले सुलभ माध्यम आहे. अतिशय शीघ्र गतीने घराघरात पोहोचलेले असे माध्यम शिवाय शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत उपलब्ध असलेले माध्यम आहे. म्हणूनच आकाशवाणीच्या माध्यमातून दिलेली माहिती देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचते. आकाशवाणीचे हे गुण ओळखूनच भारत सरकारने १९२७ साली ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ या खाजगी कंपनीद्वारे भारतात मुंबई व कोलकाता येथे अधिकृत आकाशवाणी केंद्रे स्थापन केली.
अगदी सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा दूरदर्शन माध्यम घराघरात पोहचले नव्हते त्या काळात स्वातंत्र्याची ज्योत लोकांच्या मनात पेटवत ठेवण्याचे मोठे कार्य आकाशवाणीच्या माध्यमातून झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसेनानींची भाषणे आकाशवाणीवरून प्रसारित होत असत. आज स्वातंत्र्यानंतरसुद्धा लोकोपयोगी सरकारी सामाजिक उपक्रमांची माहिती सातत्याने या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली जाते. आकाशवाणीवर विविध विषयांना वाहिलेले कार्यक्रम असतात.
त्यातून फक्त लोकांचे मनोरंजनच होते असे नाही तर अनेक उपयुक्त माहिती श्रोत्यांना पुरवली जाते. आज मोबाईलमध्ये आकाशवाणी व खाजगी रेडिओ वाहिन्या सहजपणे ऐकता येतात. अगदी ट्रेनच्या प्रवासात ते दूर शेतात डोंगरपाड्यावर रेडिओ ऐकता येतो. लोकांना सजग करण्याचे, त्यांना माहितीपूर्ण ज्ञान देण्याचे, सरकारी उपक्रम घराघरात पोचवण्याचे हे अत्यंत प्रभावी साधन आहे. सर्वांच्या हितासाठी व सर्वांच्या सुखासाठी वर्षानुवर्षे या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. म्हणूनच ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे आकाशवाणीचे ब्रीदवाक्य सार्थ ठरले आहे असे म्हणायला हरकत नाही.
कृती : ३
प्रश्न 1.
खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
(अ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
(ब) चौकटीत योग्य माहिती भरा.
उत्तर:
रेडिओजॉकीच्या व्यक्तिमत्वाचे पैलू – व्यक्तिमत्त्व प्रसन्न ………………………………….. त्यांना हे क्षेत्र खुणावत आहे. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ११६) |
प्रश्न 2.
उत्तरः
प्रश्न 3.
रेडिओजॉकीला या घटकांची चांगली जाण असावी.
१. ……………………………..
२. ……………………………..
३. ……………………………..
उत्तरः
रेडिओजॉकीला या घटकांची चांगली जाण असावी
१. भाषा
२. साहित्य
३. सांस्कृतिक घडामोडी
प्रश्न 4.
उत्तरः
स्वमत:
प्रश्न 1.
रेडिओजॉकी ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर:
आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांचे अतिशय प्रभावी, प्रवाही शैलीत निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तिमत्त्वाला रेडिओजॉकी (आरजे) असे म्हणतात. रेडिओजॉकीला मराठीत ‘उद्घोषक’ असे म्हणतात. रेडिओजॉकी संगीत शैलीचा परिचय करून देत टॉक रेडिओ शोचे आयोजन करत असतो. मुलाखती घेणे, श्रोत्यांशी संवाद साधणे, हवामान, खेळ, बातम्या इ. संबंधीची माहिती देत असतो. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधत असतो. स्थानिक भाषा हिंदी, इंग्लिश या भाषांची सरमिसळ करून तो निवेदन करत असतो. सलग दोन-तीन तास श्रोत्यांचे मनोरंजन करत असतो.
प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, समयसूचकता साधत कार्यक्रम सुसूत्रपणे मांडण्याचे कसब रेडिओजॉकीकडे असते. सलग दोन-तीन तासांतील कार्यक्रमात वैविध्य आणण्यासाठी व त्यातील एकसुरीपणा टाळण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. त्यात कोडी, स्पर्धा, श्रोत्यांशी प्रश्नोत्तरे, संवाद, संगीत, दिनचर्या, वाढदिवस यांद्वारे श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता रेडिओजॉकीत असते.
बॉलीवुड क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती, गाणी ऐकवणे हे रेडिओजॉकीचे काम असते. थोडक्यात भाषेवर प्रचंड प्रभुत्व, स्पष्ट उच्चार, आत्मविश्वास, निवेदनातील सहजता, व्यासंग यातून रेडिओजॉकी बहारदार सादरीकरण करत असतो. आरजे संग्राम, आरजे अपूर्वा, आरजे प्रसन्ना, आरजे काव्या अशी ओळख करून देत खाजगी रेडिओशी श्रोत्यांना जोडण्याचे काम रेडिओजॉकी करतो. अनेक खाजगी रेडिओ आरजेच्या नावावर ओळखल्या जातात.
रेडिओजॉकी प्रास्ताविकः
आजच्या काळात संपर्काची अनेक साधने उपलब्ध आहेत. यामध्ये मुद्रित, श्राव्य आणि दृकश्राव्य या माध्यमांद्वारे एकमेकांशी संपर्क साधणे सुलभ झाले आहे. लिखित माध्यमात वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके, हस्तपुस्तिका येतात. श्राव्य माध्यमात आकाशवाणी, दूरध्वनी, ध्वनीफिती इत्यादींचा समावेश होतो.
तर दृकश्राव्य माध्यमात दूरचित्रवाणी, चित्रपट, ध्वनिचित्रफिती, संगणक, इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. या सर्व प्रसारमाध्यमांद्वारे संप्रेषण, समाजप्रबोधन, मार्गदर्शन, ज्ञान, माहिती व मनोरंजन समाजापर्यंत पोहोचवले जाते. १९२७ मध्ये भारतात इंडियन ब्राडकस्टिंग कंपनीने मुंबई व कोलकाता या ठिकाणी आकाशवाणी केंद्र सुरू केले. १९३५ मध्ये म्हैसूर संस्थानने स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले.
पुढे भारत सरकारने हेच नाव स्वीकारले. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन आकाशवाणी विविध कार्यक्रम प्रक्षेपित करत आहे. आकाशवाणी व खाजगी एफ.एम. मध्ये महत्त्वाचा असतो तो निवेदक. खाजगी एफ.एम.मधील रेडिओजॉकी नव्या रूपात आपल्यासमोर आला आहे.
रेडिओजॉकीची पार्श्वभूमी आणि संकल्पना :
१९२०-३० ते १९९३ पर्यंत रेडिओचा प्रवास आहे. २००१ पासून भारतात खाजगी एफ.एम.ची सुरुवात झाली. ‘रेडिओ सिटी बेंगलोर’ हे भारतातील पहिले खाजगी एफ.एम. रेडिओ स्टेशन होय. तर ‘द टाईम्स ग्रुपने ‘रेडिओ मिर्ची’ हे स्टेशन इंदौर येथे सुरू केले, महाराष्ट्रात खाजगी एफ.एम. २००२ मध्ये सुरू झाले. एफ.एम. रेडिओत ‘बॉलिवुड हिट’ मधील तरुणाईला आवडतील अशी गाणी वारंवार ऐकवून मध्ये मध्ये सूत्रसंचालन करणारा रेडिओजॉकी तरुणाईला आर्कषित करतो. रेडिओजॉकीची (आर.जे.) निवेदन शैली ओघवती असावी, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असावे.
सलग दोन-तीन तास निवेदन करून श्रोत्यांशी संवाद साधून त्यांचे मनोरंजन करण्याची क्षमता आर.जे. कडे असते. यात तो संभाषण, चर्चा, वाढदिवस, दिनविशेष, कोडी, स्पर्धा यांचे आयोजन करून श्रोत्यांचे मनोरंजन करतो. थेट प्रक्षेपणाच्या विविध कार्यक्रमाबरोबरच बॉलिवूडमधील सेलिब्रेटिंशी संवाद साधून श्रोत्यांना अनोखी मेजवानी देत असतो.
रेडिओजॉकीच्या कामाचे स्वरूप :
आजच्या काळात रेडिओ जॉकीच्या कामाचे स्वरूप प्रचंड आहे. एफ.एम., ए.एम. रेडिओजॉकी सार्वजनिक रेडिओ स्टेशनद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधू शकतो. उपग्रह रेडिओजॉकीद्वारे एफ.एम.ए.एम. स्पष्ट माहिती व संगीत ऐकवू शकतो. स्पोर्टस टॉकद्वारे क्रीडा, बातम्या, माजी खेळाडू, क्रीडालेखक, निवेदक यांची माहिती देऊन श्रोत्यांशी संवाद साधू शकतो. तसेच सामाजिक, राजकीय विषयांवर श्रोत्यांशी संवाद साधू शकतो. थोडक्यात वरील सर्व विषयांवर माहिती देणारा व श्रोत्यांशी संवाद साधणारा रेडिओजॉकी आपणास खाजगी एफ.एम.द्वारे श्रोत्यांची मने जिंकतो.
रेडिओजॉकीचा आवाज, निवेदन, अभ्यास व व्यक्तिमत्त्वः
रेडिओजॉकीचा आवाज सुस्पष्ट व उत्तम असावा. आरोह-अवरोहाचे उत्तम ज्ञान असावे. भाषा सोपी, साधी व प्रवाही असावी. निवडलेली गाणी, किस्से यात सुसंगतता असावी. निवेदनात आनंद उत्साहीपणा असावा. तर श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आवाजात कारुण्य असावे. रेडिओ जॉकीला सर्वच क्षेत्राचे उत्तम ज्ञान असावे. व्यासंग व चौफेर वाचनातून ते भान येते. मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजीचे ज्ञान असावे. भाषेवर प्रभुत्व हवे.
कार्यक्रमाची संहिता लेखन करता येणे अपेक्षित असते. व्यक्तिमत्त्व प्रसन्न, हरहुन्नरी असावे. हजरजबाबीपणा, बोलण्याची आवड असावी. उत्कृष्ट संवादकौशल्य व विनोदाची जाण असावी. सूक्ष्म निरीक्षण कौशल्यातून आजुबाजूच्या घटनांकडे पाहण्याची दृष्टी त्याच्याकडे असावी. थोडक्यात रेडिओजॉकीचे व्यक्तिमत्त्व, बहुआयामी असावे की जेणेकरून त्यातून उत्तम व प्रभावी सूत्रसंचालन त्याला करता येऊ शकेल.
रेडिओजॉकीच्या कार्यक्रमाचे स्वरूप व क्षेत्रे:
रेडिओजॉकीचे कार्यक्रम विविध स्वरूपाचे असतात. समाजातील विविध क्षेत्रांतील सर्व घटकांसाठी ए.एम. व एफ.एम. वरून कार्यक्रम सादर होत असतात. त्यात प्रासंगिक घडामोडी, मुलाखती, वैज्ञानिक, युवक, महिला, शालेय, कृषी, सण-उत्सव, संगीत, परिसंवाद, श्रोत्यांची पत्रे व अचानक घडलेल्या घटना अशा विविध विषयांवर कार्यक्रमाचे प्रसारण होत असते. त्यामुळे रेडिओजॉकींना नोकरी व व्यवसायाची ही उत्तम संधी आहे.
विविध मनोरंजन कंपन्या, जाहिरात एजन्सी, विशेष कार्यक्रम, विशिष्ट प्रसंग, ऑल इंडिया रेडिओ, ए.एम, एफ.एम. चॅनल इत्यादी क्षेत्रांत करिअरची उत्तम संधी मिळू शकते. त्यासाठी त्याच्याकडे प्रभावी संवाद कौशल्य, वाचन, व्यासंग, स्पष्ट उच्चार, सर्जनशीलता, बहुश्रुतता, समयसूचकता, निरीक्षणक्षमता, बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे असावे. आपल्यातील क्षमता आणि कौशल्याचा विकास साधल्यास उत्तम आरजे बनण्याची संधी आहे व त्यातून युवक-युवतींसाठी उत्तम करिअरचा मार्ग मिळू शकतो.