Maharashtra Board Text books

Chapter 16.1 विश्वकोश

Textbook Questions and Answers

1. टिपा लिहा.

प्रश्न 1.
टिपा लिहा.
1. विश्वकोशाचा उपयोग
2. विश्वकोशाची निर्मितीप्रक्रिया
उत्तर:

1. विश्वकोशाचा उपयोगः कोणताही एक महत्त्वाचा विषय इतर अनेक विषयांशी जोडलेला असतो. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली, तर तो विषय नीट समजून घेता येतो. उदा. ‘वैदयकशास्त्र’ हा महत्त्वाचा विषय विश्वकोशात पाहू लागलो तर त्याच्याशी संबंधित औषधविज्ञान, शरीर, शरीरक्रिया विज्ञान, जीव-रसायनशास्त्र, रोगजंतुशास्त्र असे अनेक उपविषय त्याच ठिकाणी वाचायला मिळतात. अशा प्रकारे मुख्य विषय व त्याच्याशी जोडलेल्या विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोशाचा उपयोग होतो. भाषाभाषांमध्ये आदानप्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीत आले.

शिवाय वाढत्या औदयोगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या, त्यामुळेही अनेक शब्द अस्तित्वात आले. शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. हे सारे समजण्यासाठी विश्वकोशाचा उपयोग होतो. म्हणजेच आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागविण्यासाठी, आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी, सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी विश्वकोशाचा उपयोग होतो.

2. विश्वकोशाची निर्मितीप्रक्रियाः मराठी विश्वकोशाच्या निर्मितीला स्वातंत्र्यपूर्वकाळामध्ये सुरुवात झाली. या निर्मिती प्रक्रियेमध्ये ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. विश्वकोश निर्माण करताना सुरुवातीला विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना केली गेली. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली. मुख्य, मध्यम, लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणे तयार केली गेली. शिवाय नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या. प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदींच्या यादया तयार केल्या गेल्या. नंतर अकारविल्यानुसार या यादया लावण्यात आल्या. 1976 यावर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. सध्या आपल्या विश्वकोशाचे अठरा खंड प्रसिद्ध आहेत.

2. ‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, – याविषयी तुमचे मत लिहा.

प्रश्न 1.
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, – याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तरः

शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषेची गंमत अनुभवता येते. शब्दकोड्यांमुळे भाषिक समृद्धीत निश्चित भर पडते. विविध वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके यांमध्ये येणारी शब्दकोडी सोडवल्यामुळे आपल्या शब्दसंपत्तीत भर पडते. आपला शब्दसंग्रह वाढतो. शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थछटा कळण्यास मदत होते. त्यामुळे शब्दज्ञान वाढते. एकच शब्द पण संदर्भानुसार त्याचा अर्थ कसा बदलतो ते समजण्यास मदतच होते. शब्दकोडी सोडवल्यामुळे आपला शब्दसंग्रह वाढून भाषेवरचे प्रभुत्व वाढते. विविध विषयांचे ज्ञान वाढते. वैज्ञानिक, भौगोलिक, ऐतिहासिक संकल्पना समजणे सोपे होते. शिवाय त्या त्या विषयांचे विस्तृत ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचते. शाब्दिक करामतींवर आधारित शब्दकोडे सोडवल्यामुळे आपल्याला लेखक, कवी, साहित्यिकांचाही जवळून परिचय होतो. त्यामुळे आपली भाषा अधिकाधिक समद्ध होते. अशा प्रकारे ‘शब्दकोडे, सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढण्यास खूप मदत होते’.

3. विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.

प्रश्न 1.
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
उत्तरः
आपल्या शाळेत किंवा आपल्या गावातील, विभागातील सार्वजनिक ग्रंथालयात मोठ-मोठ्या काचेच्या कपाटात मराठीच्या विविध साहित्यसंपदेसोबतच ‘मराठी विश्वकोश’ ठेवलेला आढळतो. असा हा मराठी विश्वकोश पाहायचा असेल तर
1. शब्द अकारविल्यानुसार पाहावेत.
2. बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमाने दिलेला शब्द पाहावा.

एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाप्रमाणे मराठी भाषेतील सर्व विषयांचा समावेश असलेला विश्वकोश आपल्या ज्ञानात, आपल्या भाषिक समृद्धीत भर घालतो. आपला मराठी विश्वकोश पाहिल्यामुळे भाषा व त्यासंबंधाचे संदर्भ, विविध विषयांवरची सखोल व विस्तृत माहिती, त्यातील गंमत आपल्याला अनुभवता येते. आपल्याला आवडणारे हवे असलेले कोणतेही शब्द, त्यांचे अर्थ, त्यांचे विविध संदर्भ विश्वकोशात पाहता येतात, शिवाय भाषेचे अनोखे रंग आपल्याला अनुभवता येतात.

4. केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भावोतो, ते स्पष्ट करा.

प्रश्न 1.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भावोतो, ते स्पष्ट करा.
उत्तरः
आजकाल केसांच्या वेगवेगळ्या स्टाईल करणे आपणा सर्वांनाच आवडते. त्यामुळे आपल्या सौंदर्यात भरच पडते. आजकालच नव्हे पण पौराणिक काळापासून केशरचनेचे आकर्षण सर्व समाजात होते. आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्ये दाखवण्याकरीता त्यात विजयचिन्हे आणि पदके लावत होते.

केशभूषेचा मुख्य उद्देश ‘आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे’ हा आहे. शिवाय ‘सामाजिक संकेतानुसार प्रतीकात्मक केशभूषा करणे’ हा केशभूषेचा सामाजिक उद्देश आहे. या केशभूषेत केस कापणे, केस धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे करणे, सरळ करणे या विविध गोष्टींचा अंतर्भाव होतो.

केस इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंधाची कल्पना पुढे आली असावी. अजिंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पाकृतीत आढळणाऱ्या स्त्रीपुरुषांच्या केशरचना उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात.

5. विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.

प्रश्न 1.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
उत्तरः
उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून आजकाल मराठीचा अधिकाधिक स्वीकार होत चालला आहे. त्याचबरोबर शासनव्यवहाराची भाषा म्हणून राज्यपातळीवर मराठी भाषेला मान्यता मिळाली असल्यामुळे मराठीमध्ये संदर्भग्रंथाची तीव्र गरज निर्माण झाली. त्यामुळेच मानव्यविदया, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली एकत्र करणारा मराठी विश्वकोश तयार झाला. कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी जोडलेला असतो.

अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली, तर तो विषय नीट व्यवस्थित समजून घेणे शक्य होते. मराठी विश्वकोशामुळे तो फायदा होतो. शिवाय शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषासमृद्धीची वाटचाल दमदार होऊ लागली तशी ‘भाषा’ सर्वार्थाने खुलू लागली. भाषा-भाषांमध्ये आदानप्रदान होऊन नवे शब्द मराठीत रूढ झाले. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. त्यामुळे अनेक नवे शब्द अस्तित्वात आले. शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले. अशा या शब्दांचे वेगवेगळे संदर्भ मराठी विश्वकोशातून सहजपणे मिळतात.

अशाप्रकारे आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषयांचा समावेश असलेला मराठी विश्वकोश अतिशय उपयुक्त आहे. त्याचा अभ्यास करून आपण मराठी भाषेतील विविध विषयांवरचे ज्ञान अगदी सहजपणे प्राप्त करू शकतो.

भाषा सौंदर्य:

विश्वकोश अकारविल्ह्यांनुसार (अनुज्ञेय) पाहावा हे आपल्याला कळले. त्यासाठी संपूर्ण वर्णमाला (आता अॅव ऑ हे स्वर धरून) आपल्याला क्रमाने मुखोद्गत असायला हवी. त्या योग्य वर्णांची आणि त्यांची उच्चारस्थाने, परिपूर्ण आकलनही असावयास हवे. (उदा., स्वर, स्वरादी, व्यंजन, महाप्राण, मृदू व्यंजने, कठोर व्यंजने, अनुनासिके).

खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.

word image 13335 1
 1. पैसे न देता, विनामूल्य.
 2. पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
 3. जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
 4. रहस्यमय.
 5. खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.

वरील कोडे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचे उत्तर तुम्हाला सोडवायचे आहे. हे कोडे सोडवल्यावर तुम्हांला निश्चितच भाषेचे सौंदर्य व गंमत लक्षात येईल, अशा कोड्यांचा अभ्यास करा. त्यातील भाषिक वैशिष्ट्ये समजून घ्या व अशी विविध वैशिष्ट्यांची कोडी तयार करण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करा.

भाषाभ्यास:

अनुस्वार लेखनाबाबतचे नियम:

प्रश्न 1.
खालील शब्द वाचा.

‘रंग’, ‘पंकज’, ‘पंचमी’, ‘पंडित’, ‘अंबुज’ हे शब्द तत्सम आहेत. हे आपण पर-सवर्णानेसुद्धा लिहू शकतो, म्हणजे अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिक वापरून लिहू शकतो. उदा., रङ्ग, पङ्कज, पञ्चमी, पण्डित, अम्बुज असे. विशेषतः जुने साहित्य वाचले तर असे लेखन दिसते. परंतु, आजकाल अशी पर-सवर्णाने लिहिण्याची पद्धत जुनी झाली आहे. त्याऐवजी अनुस्वारच वापरले जातात. खालील शब्द बघा कसे दिसतात! ‘निबन्ध’, ‘आम्बा’, ‘खन्त’, ‘सम्प’, ‘दङ्गा’ हे शब्द बघायला विचित्र वाटतात ना! कारण हे तत्सम नाहीत. पर-सवर्ण लिहिण्याची पद्धत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंद देऊनच लिहावेत. मराठीत स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू दयावा.

प्रश्न 2.
खालील शब्द वाचा.

‘सिंह’, ‘संयम’, ‘मांस’, ‘संहार.’ या शब्दांचा उच्चार खरे तर खूप वेगळा आहे ना? या शब्दांचे ‘सिंव्ह’, ‘संय्यम’, ‘मांव्स’, ‘संव्हार’ उच्चार असे होत असले तरी लिहिताना हे शब्द तसे लिहू नयेत.

र, ल, व्, श, ष, स, ह्यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू दयावा.

पर-सवर्णाने लिहा.
घंटा, मंदिर, चंपा, चंचल, मंगल

अनुस्वार वापरून लिहा.
जङ्गल, चेण्डू, सञ्च, गोन्धळ, बम्ब

Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
विश्वकोश हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू असतो. असे का म्हटले जाते याविषयी तुमचे मत मांडा.
उत्तर:

वाचनालय म्हटले म्हणजे पुस्तके आली. पुस्तकांतून आपणास ज्ञान मिळतच असते. पुस्तकांतून फक्त आपणास संबंधित विषयाचेच ज्ञान मिळते, पण विश्वकोश म्हटला म्हणजे त्यात विविध विषयांचे ज्ञान एकत्रित केलेले असते. फक्त भाषेचेच ज्ञान नाही तर विज्ञान तंत्रज्ञान व विविध कला यांचा समग्र अभ्यास करण्यासाठी विश्वकोशाचे साहाय्य घेतले जाते. एखादा विषय त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या विषयांशी कशा प्रकारे जुळलेला असतो याचे आकलन करून घेण्यासाठी विश्वकोश महत्त्वाचा असतो. म्हणून विश्वकोश हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू असतो असे जे म्हटले जाते ते योग्यच आहे.

प्रश्न 2.
भाषासमृद्धीसाठी विश्वकोश महत्त्वाचा असतो. यावर तुमचे मत व्यक्त करा.
उत्तर:

आधुनिक काळात जागतिकीकरण झपाट्याने होत चाललेले आहे. त्यामुळे भाषा-भाषांमध्ये सहसंबंध वाढीस लागले आहे. शब्दसंकर होऊन नवनवीन शब्द मराठीत येत आहेत. तसेच बोली भाषेमधील साहित्यही समृद्ध होत चाललेले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान अशा विविध विषयांतील शब्द मराठीत प्रचलित होऊ लागलेले आहेत. अशा सर्व शब्दांची पाळेमुळे व त्यांचे अर्थ जाणून घेण्यासाठी विश्वकोशाचे साहाय्य घेतले जाते. शब्दांचे सौंदर्य खऱ्या अर्थाने जाणून घेण्याचे विश्वकोश हे महत्त्वाचे साधन आहे. म्हणून भाषा समृद्धीसाठी विश्वकोश महत्त्वाचा असतो.

Summary in Marathi

प्रस्तावना:
‘विश्वकोश’ हे स्थूलवाचन म्हणजे विश्वकोशाची ओळख करून देणारा पाठ आहे. विश्वकोश पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासण्याची सवय लागावी हा हेतू या पाठातून दिसून येतो.

“Vishwakosh’ is an article which introduces students to an encyclopaedia. Necessity to learn and use it for studies are the motives of this chapter.

शब्दर्य:

 1. विश्वकोश – सर्व विषयांचे सखोल ज्ञान देणारा ज्ञानकोश (an encyclopaedia)
 2. ग्रंथालय – ग्रंथाचे दालन (library)
 3. साहित्य – ललित वाङ्मय (literature)
 4. व्युत्पत्ती – शब्दांची घटना व उगम; शब्दाचे मूळ, त्याचा उगम सांगणारे शास्त्र. (etmology)
 5. चरित्र – एखाद्या व्यक्तीचा आयुष्यक्रम (life, biography)
 6. शब्दकोश – शब्दांचा अर्थांसह संग्रह (dicitionary)
 7. मानव्य – माणुसकी (मानवता) (humanity)
 8. विदया – ज्ञान, विद्वत्ता, ज्ञानप्राप्तीचे साधन (knowledge)
 9. विज्ञान – (Science)
 10. संकलित – एकत्र जमा केलेले (compiled)
 11. अद्ययावत – आधुनिक (up-to-date)
 12. ज्ञान – माहिती (knowledge)
 13. संलग्न – जोडलेला (attached)
 14. वैदयकशास्त्र – औषधीशास्त्र (the science of medicine)
 15. औषध – दवा (a medicine)
 16. रसायनशास्त्र – पृथ्वीवरील पदार्थांच्या घटनेत होणाऱ्या फरकांची कारणे, परिणाम इ. विषयक विवेचन करणारे शास्त्र
 17. (Chemistry)
 18. भाषा – मनातील विचार शब्दांद्वारा व्यक्त करण्याचे साधन, बोली (language)
 19. वैदयकशास्त्र – (Medical science)
 20. औषध विज्ञान – (pharmacology)
 21. जीवरसायनशास्त्र – (Biochemistry)
 22. शरीरशास्त्र – (Anatomy)
 23. शरीरक्रिया विज्ञान – (Physiology)
 24. रोगजंतुशास्त्र – (Microbiology)
 25. समृद्धी – संपन्नता
 26. रुढ – (येथे अर्थ) (use) वापर
 27. औदयोगिक – उदयोगविषयक (industrial)
 28. आयाम – पैलू (dimensions)
 29. संदर्भग्रंथ – माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त ग्रंथ (a reference book)
 30. गरज – आवश्यकता (need)
 31. मान्यता – अनुमती (consent)
 32. परिचय – ओळख (an introduction)
 33. कृतज्ञता – उपकाराची जाणीव (gratitude)
 34. स्मरण – स्मृती, आठवण (memory)
 35. उल्लेखनीय – प्रशंसनीय (commendable)
 36. विकास – quicht (progress)
 37. विदयमान – सध्याचा (present)
 38. समिती – मंडळ (committee)
 39. शीर्षक – मथळा (title)
 40. नोंद – टाचण (notes)
 41. अकारविल्हे – मूळाक्षरांच्या क्रमानुसार, अक्षरानुक्रमाने (alphabetically)
 42. खंड – भाग
 43. क्षितिज – आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती वर्तुळाकार मर्यादा. (the horizon)
 44. अभिव्यक्ती – खुलासा, स्पष्टीकरण
 45. प्रगल्भ – परिपक्व (matured)
 46. सूक्ष्म – अगदी बारीक बारीक (miniscule, tiny)
 47. अनुज्ञेय – ग्राहय (permissible)
 48. आधार – प्रमाण (reference)
 49. पौराणिक – पुराणातील (mythological)
 50. आकर्षक – लक्षवेधक (attractive)
 51. अंतर्भूत – समाविष्ट (included)
 52. उगम – उत्पत्ती (origin)
 53. कल्पना – योजना (a plan)
 54. शिल्प – हस्तकौशल्य (sculpture)
 55. अनुकरण – नक्कल (imitation)

टिपा:

1. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिक – इंग्रजी शब्दांचा अर्थ स्पष्ट करणारा जागतिक दर्जाचा शब्दकोश.
2. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ – महाराष्ट्र साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने स्थापन केलेले मंडळ.

वाक्प्रचार:

1. आयाम प्राप्त होणे – महत्त्व प्राप्त होणे.
2. चालना मिळणे – प्रोत्साहन मिळणे.