Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 12 रोजनिशी

Chapter 12 रोजनिशी

Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
वैष्णवीच्या शाळेत ‘बालदिन’ कसा साजरा झाला?
उत्तरः
वैष्णवीच्या शाळेत बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विदयार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. विविध थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून अनेक मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचनं सादर केली. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. रमेश कोठावळे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विदयार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ दिला. अशा प्रकारे वैष्णवीच्या शाळेत ‘बालदिन’ साजरा झाला.

प्रश्न 2.
शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली?
उत्तरः
सुगीचे दिवस पाहण्यासाठी मुले गावशिवारात गेली असता त्यांनी मोत्यासारखी ज्वारी असलेली कणसं, तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकवणारा कापूस अशी पिके पाहिली. तसेच त्यांनी पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही फळांनी लदबदलेली फळझाडेही पाहिली.

प्रश्न 3.
वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला?
उत्तरः
वैष्णवीच्या वाढदिवसादिवशी तिला नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त वैष्णवी, तिचे आईवडिल आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेले. तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागांतल्या मुलामुलींना खाऊचे वाटप केले. आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून वैष्णवीला गहिवरून आले. त्यांच्याकडे पाहून तिला शिकण्याची नवी उमेदही मिळाली. अशा प्रकारे वैष्णवीचा वाढदिवस साजरा झाला.

2. का ते लिहा.

प्रश्न 1.
वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हांला सर्वांत जास्त आवडते.
उत्तर:
वैष्णवीच्या रोजनिशीतील १६ नोव्हेबरचे पान मला सर्वांत जास्त आवडले. कारण आपल्या वाढदिवशी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटण्याची कल्पना मला फार आवडली. म्हणूनच शिकण्याची नवी उमेद देणारे रोजनिशीतील हे पान मला सर्वांत जास्त आवडले.

प्रश्न 2.
वैष्णवीला गहिवरून आले.
उत्तर:
वैष्णवी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली होती. तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागांतील मुलामुलींना वैष्णवीने खाऊ वाटला. परंतु आपल्या आईवडिलांपासून दूर रहात असलेल्या त्या मुलांना पाहून तिला भरून आले. आपल्या आईवडिलांपासून दूर राहण्याच्या कल्पनेने तिला गहिवरून आले.

विचार करा. संगा.

प्रश्न 1.
रोजनिशी का लिहावी? रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल असे तुम्हांला वाटते?
उत्तर:
रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. ही नोंद पुढील गोष्टी ठरविण्यास, निर्णय घेण्यास मदत करते. रोजनिशी म्हणजे आठवणींचा खजिना असतो म्हणूनच रोजनिशी प्रत्येकाने लिहिली पाहिजे.

खेळ खेळूया.

प्रश्न 1.
खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. (अती तेथे माती, आगीतून उठून फुफाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंब थेंब तळे साचे, कामापुरता मामा, गर्वांचे घर खाली)
(अ) फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. [ ]
(आ) एखादयाकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं की त्याला सोडून द्यायचं. [ ]
(इ) सगळीकडे परिस्थिती समान असणे. [ ]
(ई) थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. [ ]
(उ) एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. [ ]
(ऊ) कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. [ ]
(ए) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. [ ]
उत्तरः
(अ) गर्वांचे घर खाली
(आ) कामापुरता मामा
(इ) पळसाला पाने तीनच
(ई) थेंब थेंब तळे साचे
(उ) आगीतून उठून फुफाट्यात पडणे
(ऊ) अती तेथे माती
(ए) नावडतीचे मीठ अळणी.

नेहमी लक्षात ठेवा.

  1. संगणकाच्या स्क्रीनसमोर दीर्घकाळ बसू नये, त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो.
  2. प्रत्येक वीस मिनिटांनंतर जागेवरून उठून दहा-बारा पावले फिरून यावे, त्यामुळे आपले स्नायू सुस्थितीत राहतात.
  3. संगणकावर काम करणारी व्यक्ती व संगणकाची स्क्रीन यांमध्ये योग्य अंतर असावे.
  4. स्वत:चा पासवर्ड नेहमी गोपनीय ठेवावा.
  5. सर्व इलेक्ट्रिक वायर सुस्थितीत असल्याची खात्री करावी, तसेच संगणक चालू असताना आतील भागास हात लावू नये.

आपण समजून घेऊया.

प्रश्न 1.
खालील शब्द वाचा.

पाऊल, गरीब, चूल, माणूस, जमीन, पाटील, कठीण, फूल, सामाईक, संगीत, शरीर. वरील शब्दांतील शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण करा. काय जाणवते? या शब्दांतील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार या चिन्हांपैकी कोणतेच चिन्ह नाही; म्हणजेच या शब्दांतील शेवटचे अक्षर अकारान्त आहे आणि शेवटून दुसऱ्या अक्षराला दिलेली वेलांटी किंवा उकार दीर्घ आहे.

लक्षात ठेवा:

मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार दीर्घ लिहितात; परंतु तत्सम (संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द) शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार संस्कृतमधील मूळ शब्दाप्रमाणे हस्व लिहितात. उदा., चतुर, मंदिर, गुण, कुसुम, प्रिय, अनिल, स्थानिक.

Additional Important Questions and Answers

रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. आज आमच्या शाळेत …………… साजरा करण्यात आला.
  2. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना ……………… दिला.
  3. फळं खाण्याच्या तीव्र इच्छेनं मुलं ……………… झाडाला दगड मारू लागली.
  4. त्या सर्व मुलांकडे बघून मला शिकण्याची नवी मिळाली.

उत्तर:

  1. बालदिन
  2. खाऊ
  3. बोरीच्या
  4. उमेद

खालील प्रश्नांची एका वाक्यांत उत्तर लिहा.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठाची रोजनिशी कोणी लिहिलेली आहे?
उत्तर:
प्रस्तुत पाठाची रोजनिशी वैष्णवीने लिहिलेली आहे.

प्रश्न 2.
बालदिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
उत्तर:
बालदिन 24 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो.

प्रश्न 3.
कोणत्या तारखेची रोजनिशी लिहिली आहे?
उत्तर:
दिनांक 14, 15, व 13 नोव्हेंबरची रोजनिशी लिहिली आहे. शब्दार्थ

प्रश्न 4.
विदयार्थ्यांना गावशिवारात’ कोण व का घेऊन गेले?
उत्तर:
सगळ्या विद्यार्थांना ‘सुगीचे दिवस’ प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री. पाटीलसर विदयार्थ्यांना गावशिवारात घेऊन गेले.

प्रश्न 5.
वैष्णवीच्या जिभेवर कोणती चव रेंगाळत होती?
उत्तरः
वैष्णवीच्या जिभेवर शिवारातील बोरांची चव रेंगाळत होती.

प्रश्न 6.
वैष्णवी वाढदिवस साजरा करण्यासाठी कोठे गेली?
उत्तर:
वाढदिवस साजरा करण्यासाठी वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली.

प्रश्न 7.
दिवाळीची सुट्टी कधी सुरू झाली?
उत्तर:
दिवाळीची सुट्टी 14 नोव्हेंबर पासून सुरू झाली.

खालील आकृती पूर्ण करा.

word image 270

का ते लिहा.

प्रश्न 1.
वैष्णवीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली.
उत्तर:
वैष्णवीच्या शाळेत बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विदयार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. अनेक मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला व त्यांची प्रसिद्ध वचने सादर केली. या स्पर्धेसाठी म्हणून वैष्णवीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली.

पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
word image 272

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
1. वैष्णवीने स्पर्धेसाठी केलेली वेशभूषा – [ ]
2. बालदिनानिमित्त शाळेत आलेले प्रमुख पाहुणे – [ ]
उत्तरे:
1. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
2. डॉ. रमेश कोठावळे

उतारा – पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 44

आज आमच्या ………………
…………. सर्वांना खाऊ दिला.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
रिकाम्या जागा भरा.
1. शाळेतील मुलांनी ……………. वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला. (पारंपारिक / ऐतिहासिक / व्यावसायिक)
2. सर्व विदयार्थ्यांना बालदिनानिमित्त ……………. दिल्या. (भेटी / गोष्टी / शुभेच्छा)
उत्तरे:
1. पारंपारिक
2. शुभेच्छा

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून मुलांनी काय सादर केले?
उत्तर:
थोर पुरुषांची वेशभूषा धारण करून मुलांनी त्यांची प्रसिद्ध वचने सादर केली.

प्रश्न 2.
बालदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी आलेल्या डॉ. कोठावळे यांनी काय काय केले?
उत्तर:
बालदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी आलेल्या डॉ. कोठावळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विदयार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व सर्वांना खाऊ दिला.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. स्पर्धा
  2. वचने
  3. पाहुणे
  4. शाळा

उत्तरे:

  1. स्पर्धा
  2. वचन
  3. पाहुणा
  4. शाळा

प्रश्न 2.
खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1. शुभेच्छा देणे – सदिच्छा व्यक्त करणे सीमेवरील जवानांना यश प्राप्त व्हावे यासाठी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या.
2. धारण करणे – अंगावर चढवणे किंवा घालणे
उत्तर:
कुलदेवीच्या पूजेसाठी बाबांनी सोवळे धारण केले.

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुमचा वेशभूषा स्पर्धेतील अनुभव सांगा.
उत्तर:
पहिलीत असताना शाळेच्या कार्यक्रमात मी वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला होता. आईने हौसेने मला भाजीवाली बनवले होते. नऊवारी साडी, नथ, अंबाडा या वेशभूषेसोबतच टोपली व त्यात काही भाज्याही माझ्या हातात दिल्या होत्या. रंगमंचाच्या मागे टोपली घेऊन उभी असता इतर मुलांनी टोपलीतील काकडी, गाजर खाऊन टाकले. तर पालेभाजी लपवली. त्यामुळे मी रिकाम्या टोपलीसह रडत रडतच रंगमंचावर प्रवेश केला. त्या स्पर्धेत मला बक्षीस मिळाले नसले तरी हा किस्सा मात्र आयुष्यभर लक्षात राहील.

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
खालील शब्दांना समानार्थी शब्द दया.

  1. वेश
  2. गाव
  3. तीव्र
  4. वाढदिवस
  5. मित्र
  6. उमेद

उत्तरः

  1. पोशाख
  2. ग्राम
  3. अतीव
  4. जन्मदिवस
  5. सखा
  6. आशा

प्रश्न 2.
खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. नवीन
  2. अनियमित
  3. पारंपरिक
  4. उमेद

उत्तरः

  1. जुने
  2. नियमित
  3. आधुनिक
  4. नाउमेद

प्रश्न 3.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. दिवस
  2. वचन
  3. झाडे
  4. मुले
  5. सुट्टी
  6. शेंगा

उत्तर:

  1. दिवस
  2. वचने
  3. झाड
  4. मुलगा/मूल
  5. सुट्टया
  6. शेंग

प्रश्न 4.
खालील शब्दांचे लिंग बदला.

  1. बालक
  2. पाहुणा
  3. विद्यार्थिनी
  4. मित्र
  5. मुले
  6. आई
  7. अध्यक्ष
  8. पुरुष

उत्तर:

  1. बालिका
  2. पाहुणी
  3. विदयार्थी
  4. मैत्रीण
  5. मुली
  6. बाबा
  7. अध्यक्षा
  8. स्त्री

खाली वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
यथेच्छ ताव मारणे – मन भरेपर्यंत खाणे
उत्तर:
मामाच्या गावी जाताच आम्ही भाषेमंडळींनी आंब्यांवर यथेच्छ ताव मारला.

प्रश्न 2.
आस्वाद घेणे – आनंद लुटणे
उत्तरः
पंडितजींच्या मैफिलीचा श्रोते मनापासून आस्वाद घेत होते.

प्रश्न 3.
गहिवरून येणे – ऊर भरून येणे
उत्तरः
मुलीची पाठवणी करताना राधाबाईंना गहिवरून आले.
1. मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार दीर्घ लिहितात. उदा. पाऊल, गरीब, चूल, माणूस
2. तत्सम (संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द शब्दांतील आकारान्तापूर्वीचे इकार व उकार संस्कृतमधील मूळ शब्दाप्रमाणे हस्व लिहितात. उदा. चतुर, मंदिर, गुण, प्रिय)

लेखन विभाग

प्रश्न 1.
वैष्णवीच्या रोजनिशीतील चौथे पान पूर्ण करा.
उत्तरः
17 नोव्हेंबर आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली. सुट्टीचे कार्यक्रम आखण्यातच आमचा दिवस गेला. या वर्षी आम्ही मित्र-मैत्रीणींनी मिळून फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला आहे. ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण टाळणाऱ्या ह्या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. उदयापासून आम्ही दिवाळीचा फराळ बनवण्यातही पुढाकार घेणार आहोत. एकंदरीतच
दिवाळीची सुट्टी खूप काही शिकवून जाणार हे नक्की.

प्रश्न 2.
तुम्ही तुमचा वाढदिवस कसा साजरा करू इच्छिता?
उत्तरः
लहानपणी माझा वाढदिवस मित्र मैत्रीणींना बोलावून खाऊ वाटून, केक कापून साजरा होत असे. मात्र यावर्षी मला माझा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याची इच्छा आहे. विभक्त कुटुंबपद्धतीचा मी भाग असल्याने मला आजी आजोबांचे सुख जास्त लाभले नाही. थोडा वेळ का होईना थोरामोठ्यांचे आशीर्वाद व सहवास लाभावा या हेतूने मला माझा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याची इच्छा आहे.

Summary in Marathi

पाठ परिचय:

विदयार्थ्यांना रोजनिशी कशी लिहितात हे समजावे व त्यांनी रोजनिशी लिहावी या प्रयोजनातून समाविष्ट केलेला पाठ म्हणजे रोजनिशी होय. रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. दिवसभरातील घडामोडींची नोंद रोजनिशीमध्ये आपण करत असतो. प्रस्तुत पाठात वैष्णवीने लिहिलेल्या रोजनिशीची पाने दिलेली आहेत.

The purpose of this write up is to make students understand how to write a daily diary and they should start writing a diary. Because of writing a diary, a person gets a new vision of live. We note down important daily affairs in our diary. This chapter consist of a few pages of Vaishnavi’s diary.

शब्दार्थ:

  1. छंद – आवड, नाद – hobby
  2. रोजनिशी – दैनंदिनी – a diary
  3. स्पर्धा – चढाओढ – competition
  4. शुभेच्छा – सदिच्छा – a greetings
  5. कपाशी – सरकी असलेला कापस – cotton-with seeds
  6. यथेच्छ – मनसोक्त – at one’s will
  7. वसतिगृह – भोजननिवासगृह – hostel
  8. वाटप – वाटणी – distribution
  9. आस्वाद – चव – taste
  10. जीभ – रसना, जिव्हा – tongue
  11. शिवार – शेत, वावर – field
  12. श्रोते – प्रेक्षक (audience)
  13. दुर्गम – अवघड, जाण्यास कठीण (inaccessible)
  14. वचन – वाक्य (येथे अर्थ) (statement, quotes)
  15. गावशिवार – गावातील शेते (field)
  16. कपाशीचे बोंड – कापसाची बी (cotton seed)
  17. उमेद – उत्साह, नवी आशा (hopes)

वाक्प्रचार:

  1. स्पर्धा लागणे – चढाओढ लागणे
  2. छंद असणे – आवड असणे
  3. धारण करणे – परिधान करणे
  4. यथेच्छ ताव मारणे – मन भरेपर्यंत खाणे
  5. आस्वाद घेणे – आनंद लुटणे
  6. गहिवरून येणे – ऊर भरून येणे

टिपा:

  1. क्रांतिज्योती – भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, सावित्रीबाई फुले थोर समाजसेवक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण काम. त्यांच्या कार्यामुळे क्रांतिज्योती ही उपाधी प्राप्त. महात्मा जोतीराव फुले यांच्या पत्नी.
  2. सुगीचे दिवस – शेतातील धान्य पिकण्याचा हंगाम
  3. आदिवासी – सन 2971 मध्ये समाज कल्याण समाज कल्याण विभागांतर्गत आदिवासी समाज कल्याण विभाग विभागाची स्थापना झाली. आदिवासी विभागाच्या प्रगतीसाठी, बळकटीकरणासाठी हा विभाग कार्यरत आहे.