Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
(अ) माता धावून जाते ……………………………
(आ) धरणीवर पक्षिणी झेपावते ……………………………
(इ) गाय हंबरत धावते ……………………………
(ई) हरिणी चिंतित होते ……………………………
उत्तरः
(i) माता धावून जाते – आगीत बाळ सापडल्यावर
(ii) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते – पिल्लू जमिनीवर पडताच
(iii) गाय हंबरत धावते – भुकेले वासरू पाहिल्यावर
(iv) हरिणी चिंतित होते – जंगलात वणवा लागल्यावर
प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
उत्तरः
प्रश्न 3.
कोण ते लिहा.
(अ) परमेश्वराचे दास
(आ) मेघाला विनवणी करणारा
उत्तरः
(i) परमेश्वराचे दास – [संत नामदेव]
(ii) मेघाला विनवणी करणारा – [चातक]
प्रश्न 4.
काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘सवेंचि झेंपावें पक्षिणी । पिली पडतांचि धरणीं ।।
भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धांवे ।।
(आ) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही. ‘आई सारखी मायाळू आईच’ असे म्हणतात. मग ती आई कोणीही असो. प्राणी असो की पक्षी असो. तिचे बाळ, लेकरू, पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतेच घालते.
प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की, ‘आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अती व्याकूळ होऊन त्याला वाचवते.’ प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की, एखाद्या गाईचे वासरू भूकेने व्याकूळ होऊन ओरडत असेल तर ती माता (गाय) त्याच्यासाठी धावून जाते. त्याचप्रमाणे जंगलाला वणवा लागला असेल आणि जर एखादया हरिणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरिणी त्यास वाचवण्यास अती चिंतातूर होते. त्याचप्रमाणे एखादया पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते.
(इ) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मी सर्वस्वी तुझ्या अंकित झालो आहे. आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून यावेसे अशी अपेक्षा संत नामदेव या अभंगातून करतात.
संत नामदेव महाराज सांगतात, ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई, घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलासाठी पक्षिणी, भुकेलेल्या वासरासाठी गाय आणि जंगलातील वणव्यात सापडलेल्या पाडसासाठी हरिणी धावून येते. त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे. संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली (आई) मानतात. पुढे संत नामदेव सांगतात, चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पहात असतो, पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनवितो, त्याप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतात,
(ई) पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
उत्तरः
‘घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ असे म्हटले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही प्राण्यांची, पशुंची, पक्ष्यांची आई असो ती आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क, व्याकूळ असते. साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या. ती कुत्री आपल्या पिल्लांचा कसा सांभाळ करते ते आपण अनेकवेळा पाहिले आहे. कांगारू आपल्या पिल्लास संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते. माकडीन आपल्या पिल्लास पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते. कोंबडी आपल्या पिल्लांचा सांभाळ कशी करते ते आपण अनेकवेळा पाहतो. कोणतेही संकट येताच ती पिल्लांना आपल्या दोन्ही पंखाखाली घेते. तसेच ती आपल्या पिलांवर झेप घालणाऱ्याला चोच मारून दूर करण्याचा प्रयत्न करते. शेवटी सगळ्यांची आई ही सारखीच असते. ती भारतातील असो, विदेशातील असो, पक्षी असो वा पशू असो आईचे प्रेम हे आपल्या मुलांवर सारखेच असते.
Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Additional Important Questions and Answers
प्रश्न १.
खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती
प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(i) बाळाला वाचवण्यासाठी कोण धावून येते?
उत्तर:
बाळाला वाचवण्यासाठी माता धावून येते.
(ii) भुकेल्या वासराला पाहून कोण हंबरत धावून येते?
उत्तर:
भुकेल्या वासराला पाहून धेनू (गाय) हंबरत धावून येते.
(iii) चातक पक्षी कोणाची विनवणी करतो?
उत्तरः
चातक पक्षी मेघाची (ढगांची) विनवणी करतो.
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
(i) संत नामदेव यांचे दास – [श्री विठ्ठलाचे]
(ii) संत नामदेव यांना धावून यायला सांगतात – [श्री विठ्ठलाला]
(iii) मेघांची विनवणी करणारा – [चातक]
(iv) पाडसासाठी चिंतित असणारी – [हरिणी]
प्रश्न 3.
खाली दिलेल्या कंसातील योग्य पर्याय निवडून अभंगांच्या ओळी पूर्ण करा.
अग्निमाजि पडे बाळू। ……………………….” धांवें कनवाळू।। (माता, जननी, आई)
(ii) तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी ……………………….” तुझा।। (मालक, स्वामी, दास)
(iii) भुकेलें वत्सरावें।………………………. हुंबरत धांवे।। (धेनु, गाय, गवा)
उत्तर:
(i) माता
(ii) दास
(ii) धेनु
कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1.
जोड्या जुळवा.
उत्तर:
(1 – क),
(ii – ड),
(iii – ब),
(iv – अ)
प्रश्न 2.
सहसंबंध लिहा.
(i) कनवाळू : माता :: चिंतीत ……………………
(ii) धावे : धेनु :: झेंपावें ……………………
उत्तर:
(i) हरणी
(ii) पक्षिणी
प्रश्न 3.
खाली दिलेल्या अर्थाच्या ओवी अभंगातून शोधून लिहा.
(i) आपले पिल्लू घरट्यातून येऊन खाली जमिनीवर पडताच पक्षिणी त्याच्यासाठी अगदी तत्परतेने झेपावून येते. त्याच्या सेवेला धावून जाते.
उत्तरः
सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिली पडतांचि धरणीं।।
(ii) नामदेव महाराज म्हणतात की, आकाशातील ढगांना पाहून चातक पक्षी त्याची स्वत:ची तहान भागवण्यासाठी विनवणी करतो.
उत्तर:
नामा म्हणे मेघा जैसा। विनवितो चातक तैसा।।
प्रश्न 4.
कोण ते लिहा.
उत्तर:
(i) वासरासाठी हंबरणारी – [धेनु]
(ii) धरणीकडे झेपावणारी – [पक्षिणी]
(iii) बाळासाठी धावून जाणारी – [माता]
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक २
२. संतवाणी
(अ) अंकिला मी दास तुझा
अग्निमाजि पडे बाळू।
माता धांवें कनवाळू।।१।।
तैसा धांवें माझिया काजा।
अंकिला मी दास तुझा।।२।।
सवेंचि झेंपावें पक्षिणी।
पिली पडतांचि धरणीं।।३।।
भुकेलें वत्सरावें।
धेनु हुंबरत धांवे।।४।।
वणवा लागलासे वनीं।
पाडस चिंतीत हरणी।।५।।
नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा।।६।।
कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ
प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) अग्नी
(ii) माता
(iii) तैसा
(iv) काजा
उत्तर:
(i) आग
(ii) आई
(iii) त्याप्रमाणे
(iv) काम कृती
काव्यसौंदर्य
प्रश्न 1.
लील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
‘अग्निमाजि पडे बाळू। माता धांवें कनवाळू।।
तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा।।’
उत्तरः
वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज अगदी मनापासून आर्तपणे विठ्ठलाचा धावा करतात. त्यासाठी ते अतिशय समर्पक दृष्टान्त देतात. ते म्हणतात की, ज्याप्रमाणे नजरचुकीने अग्नीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकूळ होऊन , काळजीने त्याच्याजवळ धावून जाते. त्याला मायेने, प्रेमाने उचलून घेते. त्याचप्रमाणे हे प्रभू, विठ्ठला, मी पूर्णपणे तुझा अंकित आहे. मी तुझा दास, सेवक आहे. आईप्रमाणे तुम्ही माझ्या अडचणीत, माझ्या कार्यात व्याकूळ होऊन धावत या.
प्रश्न 2.
संत नामदेवांनी ‘आईकडून (विठ्ठलाकडून) व्यक्त केलेल्या अपेक्षा अभंगाच्या आधारे लिहा.
उत्तरः
या जगात (विश्वात) आपल्या मुलाबाळांपेक्षा मातेला कोणीही महत्त्वाचे नसते. आपल्या मुलापुढे मातेला दुसऱ्या सर्व गोष्टी गौण वाटतात, आई आपल्या मुलांच्या सुखातच आपले सुख मानत असते, आई आपल्या अपत्यासाठी काहीही करू शकते. मग ती आई प्राणी, पशु किंवा पक्षी कोणीही असू दया. संत नामदेव महाराज सांगतात की, आपले बाळ आगीत सापडले तर, त्या बाळाची आई व्याकूळ होऊन त्याला आगीतून वाचवण्यासाठी धावून जाते. घरट्यातून पिल्लू जमिनीवर पडले तर पक्षिणी त्यासाठी तत्परतेने जमिनीकडे झेपावते. भूकेल्या वासराला पाहून गाय हंबरून त्याच्याकडे धाव घेते. जंगलातल्या वणव्यात सापडलेल्या पाडसाला वाचवण्यासाठी हरिणी चिंतीत होते. त्याचप्रमाणे नामदेवांना वाटते, मी सर्वस्वी तुझा (विठ्ठलाचा) अंकित आहे. तेव्हा माझ्या आईने (विठ्ठलाने) माझ्यासाठी तत्परतेने धावून यावे.
प्रश्न 2.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:
संत नामदेव
(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
परमेश्वरकृपेची याचना.
(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ:
अग्निमाजी पडे बाळू। माता धांवे कनवाळू।।
तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा।।
आगीमध्ये आपले लहान बाळ सापडल्यावर त्याची आई व्याकूळ, अगतिक होऊन त्या आगीमध्ये धाव घेते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा तू माझ्या प्रत्येक कार्यास मदत करण्यास धावून ये. कारण मी पूर्णपणे, सर्वस्वी तुझा दास आहे. असे संत नामदेव या ठिकाणी सांगतात.
(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः
संकटात सापडलेल्या बाळाला वाचविण्यासाठी जशी त्याची आई धावत येते, तसा देवसुध्दा आपल्या भक्ताच्या प्रत्येक कार्यात धावून येतो, त्याच्या पाठिशी उभा राहतो. त्यामुळेच आपण तन, मन, धन अर्पून मनोभावे परमेश्वराची भक्ती करून त्याची आळवणी केली पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा संदेश संत नामदेव यांच्या ‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगातून मिळतो.
(५) प्रस्तुत कविता तुम्हांला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण:
संत नामदेवांचा ‘अंकिला मी दास तुझा’ हा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे कारण असे की, आपली श्री विठ्ठलावरची उत्कट भक्ती व परमेश्वराबरोबर असलेले नाते हे संत नामदेवांनी आई-बाळ, पिल्लू-पक्षिणी, धेनू-वासरू, पाडस-हरिणी तसेच मेघ-चातक पक्षी या उदाहरणांतून अतिशय समर्पकपणे मांडलेला आहे. शिवाय आई-मुलाच्या नात्यातील प्रेमभाव व्यक्त करताना ‘देवा, तू माझी आईच आहेस. तेव्हा आपल्या या लेकराच्या प्रत्येक कार्यात तू धावून ये,’ अशी त्यांनी केलेली याचना मनाला भावते.
(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ:
(i) दास – सेवक
(ii) धरणी – धरती, भूमी
(iii) मेघ – ढग
(iv) धेनु – गाय (स्वाध्याय कृती)
(४) काव्यसौंदर्य.
(i) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही. ‘आई सारखी मायाळू आईच’ असे म्हणतात. मग ती आई कोणीही असो. प्राणी असो की पक्षी असो. तिचे बाळ, लेकरू, पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतेच घालते.
प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की, ‘आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अती व्याकूळ होऊन त्याला वाचवते.’ प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की, एखाद्या गाईचे वासरू भूकेने व्याकूळ होऊन ओरडत असेल तर ती माता (गाय) त्याच्यासाठी धावून जाते. त्याचप्रमाणे जंगलाला वणवा लागला असेल आणि जर एखादया हरिणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरिणी त्यास वाचवण्यास अती चिंतातूर होते. त्याचप्रमाणे एखादया पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते.
(ii) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध उदाहरणांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मी सर्वस्वी तुझ्या अंकित झालो आहे. आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यात तू धावून यावेसे अशी अपेक्षा संत नामदेव या अभंगातून करतात.
संत नामदेव महाराज सांगतात, ज्याप्रमाणे अग्नीत सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई, घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलासाठी पक्षिणी, भुकेलेल्या वासरासाठी गाय आणि जंगलातील वणव्यात सापडलेल्या पाडसासाठी हरिणी धावून येते. त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे. संत नामदेव श्री विठ्ठलास आपली माऊली (आई) मानतात. पुढे संत नामदेव सांगतात, चातक पक्षी जसा पहिल्या पडणाऱ्या पावसाची व्याकुळतेने वाट पहात असतो, पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनवितो, त्याप्रमाणे तेवढ्याच व्याकुळतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वरास विनंती करतात,
(iii) पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
उत्तरः
‘घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ असे म्हटले जाते. त्याप्रमाणे कोणत्याही प्राण्यांची, पशुंची, पक्ष्यांची आई असो ती आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क, व्याकूळ असते. साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या. ती कुत्री आपल्या पिल्लांचा कसा सांभाळ करते ते आपण अनेकवेळा पाहिले आहे. कांगारू आपल्या पिल्लास संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते. माकडीन आपल्या पिल्लास पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते. कोंबडी आपल्या पिल्लांचा सांभाळ कशी करते ते आपण अनेकवेळा पाहतो. कोणतेही संकट येताच ती पिल्लांना आपल्या दोन्ही पंखाखाली घेते. तसेच ती आपल्या पिलांवर झेप घालणाऱ्याला चोच मारून दूर करण्याचा प्रयत्न करते. शेवटी सगळ्यांची आई ही सारखीच असते. ती भारतातील असो, विदेशातील असो, पक्षी असो वा पशू असो आईचे प्रेम हे आपल्या मुलांवर सारखेच असते.
संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव Summary in Marathi
संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव भावार्थ
अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।१।।
तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा ।।२।।
वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज अगदी मनापासून आर्ततेने परमेश्वराचा (विठ्ठलाचा) धावा करतात. त्यासाठी ते अतिशय समर्पक दृष्टान्त देतात. ते म्हणतात की, ज्याप्रमाणे नजरचुकीने अग्नीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकूळ होऊन, काळजीने त्याच्याजवळ धावून जाते. त्याला मायेने, प्रेमाने उचलून घेते. त्याचप्रमाणे हे प्रभू, विठ्ठला, मी पूर्णपणे तुझा अंकित आहे. मी तुझा दास, सेवक आहे. आईप्रमाणे तुही माझ्या अडचणीत, माझ्या कार्यात धावत ये.
सवेंचि झेपावें पक्षिणी । पिली पडतांचि धरणीं ।।३।।
विठ्ठलाची आळवणी करताना संत नामदेव महाराज म्हणतात, झाडावरील घरट्यात असणारे पक्ष्याचे लहान पिल्लू घरट्यातून बाहेर येऊन उडण्याच्या प्रयत्नात खाली जमिनीवर पडताच त्याची आई पक्षिणी आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने झेप घेते. त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तुझ्या या सेवकासाठी तू असाच धावून ये.
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे ।।४।।
संत नामदेव महाराज अगदी मनापासून विठ्ठलाचा धावा करतात. ते म्हणतात, भूकेने व्याकूळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते. त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याजवळ धावत येते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला तूही माझ्यासाठी धावून ये.
वणवा लागलासे वनीं पाडस चिंतीत हरणी ।।५।।
संत नामदेव श्री विठ्ठलाची मनापासून विनवणी करतात. अगदी व्याकूळ होऊन हरिणीचे उदाहरण ते देतात. ते म्हणतात की, जंगलात वणवा पसरलेला आहे आणि त्यात हरिणीचे पाडस अडकलेले आहे. अशावेळी त्याची आई म्हणजेच हरिणी आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी खूप चिंतीत होते. त्या पाडसासारखीच माझी अवस्था झाली आहे. म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.
नामा म्हणे मेघा जैसा । विनवितो चातक तैसा ।।६।।
चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो. तेच त्याच्यासाठी जीवन असते असे मानले जाते. हाच दृष्टान्त देऊन संत नामदेव महाराज म्हणतात की, ज्या प्रमाणे चातक पक्षी आकाशात जमलेल्या काळ्या काळ्या, पाण्याने भरलेल्या ढगांना पाणी बरसवण्यासाठी विनवणी करतो. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी तुला विनवितो आहे.
संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव शब्दार्थ
- अग्निमाजि - आगीमध्ये - (in the fire)
- पडे - सापडे - (to be found)
- कनवाळू - दयाळू – (merciful)
- तैसा - त्याचप्रमाणे - (as like that)
- माझिया - माझ्या - (my)
- काजा - काम – (work)
- अंकिला - अंकित झालेला
- सवें - लगेच – (immediately)
- पिल्ली - पिलू - (a young one, acub)
- वत्सर - वासरू – (a calf)
- धेनु - गाय – (a cow)
- हुंबरत - हंबरते – (to low)
- वनी - जंगलात – (in the forest)
- मेघा - ढगांना - (to cloud)
- जैसा - ज्याप्रमाणे - (like, as)
- वत्सरावे - वासराच्या आवाजाने
- पाडस - हरिणीचे पिल्लू
Marathi Aksharbharati Std 10 Digest Pdf भाग-१