Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 तू बुद्धी दे

काव्यपरिचय

‘तू बुद्धी दे’ ही प्रार्थना कवी ‘गुरू ठाकूर’ यांनी लिहिली आहे. या प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवीने दाखवून दिले आहे. कायम सत्याची कास धरून संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व या शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, ही भावना कवीने या प्रार्थनेतून व्यक्त केली आहे.

Tu Buddhi de’ is a prayer composed by Guru Thakur. It highlights the importance of the right path, good thoughts, and good company. The poet has prayed for truth and sensitivity. He suggests that one should have courage to be the saviour of orphans.

भावार्थ

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 तू बुद्धी दे 1

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

नित्य पठणीय अशी ही प्रार्थना आहे. कवी सांगतात की, हे ईश्वरा, तू आम्हाला बुद्धी दे. तू नवविचारांचे तेज दे. आपल्यामध्ये नवचेतना जागवण्यास विश्वास दे. या धरतीवर जे सत्य, सुंदर आहे. जे अजरामर आहे, जे सर्व ठिकाणी भरून राहिलेले आहे त्या सर्वांचा ध्यास माझ्या मनात जीवनभर राहू दे. म्हणजेच जे सदैव सत्य, सुंदर आहे त्याचे माझ्याकडून व्यवस्थित पालन व्हावे. तसेच त्याचप्रकारच्या नवनिर्मितीचा ध्यास म्हणजे उत्कट इच्छा आजन्म माझ्या मनात राहू दे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 तू बुद्धी दे

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती,
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे

ज्यांचा कोणी पालनकर्ता नाही, ज्यांचा सांभाळ करणारे असे कोणी नाही, ज्यांना माया देणारे आभाळ नाही त्यांचा तू सोबती-सखा बन. त्यांना आश्रय देण्याचे काम तू कर. त्यांना मायेची सावली देण्याचे काम कर. जे जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना भरकटलेले आहेत, ज्यांना जीवनाच्या सार्थकतेची वाट सापडत नाही त्यांचा तू सारथी बनून मार्ग दाखवण्याचे काम कर. तुझी जे साधना करतात, नित्य तुझी जे प्रार्थना करतात. त्यांना तू सतत तुझा सहवास दे. म्हणजेच तू नेहमीच त्यांच्या सोबत राहा.

जाणावया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे

या जगात जे दुर्बल आहेत, त्यांचे दुःख आणि वेदना जाणून घेण्यासाठी माझ्या शरीरातील रंधा-रंध्रात सतत संवेदना तेवत ठेवण्याचे काम तू कर. माझ्या मधील संवेदना सतत जागृत ठेवण्याचे काम तू कर. दुःखितांचे दुःख दूर करण्याची आस माझ्या शरीरातील प्रत्येक धमन्यातून वाहणाऱ्या रक्तात असू दे. ही शब्दरूपी काव्य सुमने मी तुझ्यापुढे ठेवतो. त्या सर्व शब्दास आणि माझ्या संपूर्ण जगण्यास एक प्रकारचा अर्थ तू दे. जेणेकरून माझा जन्म दुर्बलांचे दु:ख दूर करण्यासाठी उपयोगी पडेल.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 तू बुद्धी दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

मला सतत चांगला मार्ग आणि चांगली बुद्धी लाभू दे. सतत चांगल्या, सज्जन माणसांची संगत मिळू दे. माझ्या जीवनात कितीही संकटे आली तरी मी माझ्या कर्तव्यापासून कधी दूर होणार नाही, अशी माझी नितीमत्ता राहू दे. माझे आचरण कधीही भ्रष्ट होऊ नये. जीवनरूपी वाटेवरून प्रवास पार करण्यासाठी या पंखांना तू बळ दे. कायम सत्याची कास धरून संवेदनशीलता जपण्यासाठी तसेच आकाशात झेपावण्यासाठी बळ दे. म्हणजेच सतत सौंदर्याचा ध्यास माझ्या मनात राहू दे आणि तो ध्यास पूर्ण करण्यासाठी नवे आकाश म्हणजेच आकाशाएवढ्या नव्या संध्या तू निर्माण कर, की ज्यामध्ये मी माझे कर्तृत्व दाखवू शकेन.

शब्दार्थ

तेज – उत्साह – (energy, vigour)
नव – नवीन – (new) Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 तू बुद्धी दे
चेतना – उत्तेजन, प्रोत्साहन – (inspiration)
सर्वथा – सदैव, सर्व अर्थांनी –
आजन्म – आयुष्यभर, जन्मभर – (lifetime)
ध्यास – उत्कट इच्छा – (agreat longing)
तयांचा – त्यांचा – (to him)
सोबती – सखा, मित्र – (friend)
सापडेना – मिळेना – (not Found)
वाट – रस्ता, मार्ग – (way)
साधना – तपश्चर्या – (learring the hard way)
करिती – करतात – (todo)
नित्य – रोज – (daily)
तव – त्यांना – (to him) Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 तू बुद्धी दे
जाणवाया – जाणून घेण्यासाठी – (to understand)
दुर्बल – ज्यांच्यात बल (शक्ती) नाही – (weak, feeble)
तेवत्या – तेवत (जळणे) – (to be lit)
सदा – सतत – (always)
संवेदना – सह वेदना – (sensation)
खल – दुष्ट – (wicked)
भेदणे – दूर करणे
आस – इच्छा, आवड – (a great longing)
सामर्थ्य – शक्ती – (power, strength)
सन्मार्ग – चांगला मार्ग – (true way)
सन्मती – चांगली बुद्धी – (good thoughts)
लाभो – मिळणे – (to get)
सत्संगती – चांगली संगत (सोबत) – (good company)
भ्रष्ट – वाईट – (polluted)
बळ – शक्ती – (power) Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 तू बुद्धी दे
झेपावण्या – उडण्यासाठी – (to spring or leap)
सारथी – मार्गस रस्ता, दिशा दाखवणारा
रंध – त्वचेवरील अतिसूक्ष्म छिद्र – (pores)
धमन्या – संपूर्ण शरीरभर रक्त वाहून नेणाऱ्या नसा/नाडी – (veins)
रुधिर – रक्त – (blood)
नीती – सदाचाराचे नियम

Marathi Aksharbharati Std 10 Digest Pdf भाग-१