Maharashtra Board Text books

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
उत्तर:
‘जगणं कॅक्टसचं’ या पाठात ‘वसंत शिरवाडकर’ यांनी वाळवंटी प्रदेशातील कॅक्टसवर विशेष माहिती दिली आहे. निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे पटवून दिले आहे. साधारणपणे पाण्याशिवाय वनस्पती जगू शकत नाही. वाळवंटात अगदीच थोडे पाणी मिळते. पण निसर्ग एक जादूगार आहे. त्या थोड्याशा पाण्यातही तो वनस्पती फुलवतो. तेथील प्राणी जगवतो.वाळवंटी प्रदेशातील खास अशी जीवसृष्टी आहे. वनस्पती व प्राणी तेथेही जगू शकतात. कॅक्टसच्या झाडांवरची लाल-पिवळी फुले चित्रमय वाटतात. वाळवंटातील जीवनसृष्टी हा खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कारच आहे. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही जीवसृष्टी निर्माण करणारा निसर्ग खरेच मोठा जादूगार आहे.

प्रश्न 2.
‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता लिहा.
उत्तरः
वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी तर दोन-दोन, तीन-तीन वर्षे पावसाचा ठिकाणा नसतो, एरवी तेथे वाळवंटातसूर्यआगओकतअसतो.हवातापलेलीअसते.सूर्याच्या आगीमध्ये पाने, फुले, गवत करपून जातात. वाळवंटात ओसाड, भकास जीवन असते. कॅक्टस अवर्षणाचा प्रतिकार करणारा आहे. जे काही पाणी मिळेल तेवढे स्वत:मध्ये साठवून घ्यायचे आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत रहायचे. अशी कॅक्टसची जगण्याची किमया असते. सग्वारो कॅक्टस तर २०० वर्षे जगतो. कॅक्टसमध्ये पाणी साठवण्याची रचना असते.

मिळेल तेवढे पाणी तो साठवतो. त्याची सगळी अंगरचना पाणी साठवण्यासाठी बनलेली असते. पाऊस पडतो तेव्हा वाळवंटाची जमीन फारच थोडे पाणी शोषून घेते. त्यामुळे थोड्यावेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी कॅक्टसच्या मुळांची खास रचना असते. आपली मुळे लांब पसरवून भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातील पाणी तो शोषून घेतो. झाडातले बरेचसे पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात म्हणून कॅक्टसच्या झाडाने पान ही गोष्टच काढून टाकली आहे. म्हणूनच म्हटले आहे ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

प्रश्न 3.
टिपा लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 7
उत्तरः
सग्वारो कॅक्टस वाळवंटी प्रदेशाचाअगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्टसच्या अनेक जातींमध्ये सग्वारो हा कॅक्टसचा राजा मानला जातो. तो ५० फूट उंचीपर्यंत वाढतो. त्याची वाढ मंद असते इतकी, की ५० वर्षात तो फक्त ३ फूट वाढतो आणि २०० वर्षे जगतो. सग्वारो कॅक्टसची फुले गेंदेदार असतात ही फुले फुलली की थोडा काळ तरी ओसाड वाळवंट सौंदर्यपूर्ण होते. सग्वारो कॅक्टसला फळे येतात. त्यातील गर कलिंगडासारखा असतो. सग्वारो कॅक्टस हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. सम्वारो कॅक्टसचा उपयोग अमेरिकेतील रेड इंडियन करीत असत. अवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत. सग्वारो फॅक्टसची फळे ही कलिंगडाच्या गरासारखी असल्याने खाण्यासाठी उपयोग होतो. फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हे ही एक खादय असते.

प्रश्न 4.
वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हाला वाटते ते लिहा.
उत्तरः
कॅक्टसच्या झाडामध्ये रसदार गर असतो, म्हणून त्यावर प्राण्यांच्या धाडी पडण्याचा धोका असतो. त्यासाठी खबरदारी म्हणून कॅक्टस झाडांच्या अंगावर धारदार बोचरे काटे पसरलेले असतात. वाळवंटी प्रदेशात बहुतेक झाडांना काटे असतात. त्याला खास कारण झाडे जनावरांनी ओरबाडून खाऊन टाकली तरी पाण्याची पंचाईत नसल्याने ती पुन्हा लवकर उगवून येतात. वाळवंटी प्रदेशात हे शक्य नाही. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाड एकदा गेले की गेले. यासाठी या प्रदेशातील झाडांना स्वत:च्या रक्षणासाठी काटे असतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

प्रश्न 5.
‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तरः
पाण्याला समानार्थी शब्द ‘जीवन’ असा आहे. त्यावरून पाण्याचे अमूल्य महत्त्व लक्षात येते. जीवनात पाणी नसेल तर तहानेने व्याकूळ होऊन माणूस मरेल. स्वच्छता राहणार नाही. पशू-पक्षी, झाडे निसर्ग टिकणार नाही. सर्व सृष्टी उजाड होईल. वाळवंट, ओसाड राने तयार होतील. जीवसृष्टी राहणार नाही. जलचर प्राण्यांची सृष्टी नष्ट होईल. सूर्य आग ओकेल. जमिनीला मोठे तडे जातील. पाण्यावाचून हाहा:कार होईल. जीवनच संपुष्टात येईल. म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

प्रश्न 6.
पाठाच्या आधारे कॅक्टसच्या प्रकारांची माहिती थोडक्यात लिहा.
उत्तरः
कॅक्टसच्या सुमारे १००० जाती आहेत. त्यातील अनेकांचे आकार मोठे चित्रविचित्र आहेत. ‘सायाळ’ कॅक्टस – कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळासारखा (शत्रुने हल्ला करताच काटे सोडणारा प्राणी) दिसतो.
(ii) ‘अस्वल’ कॅक्टस – हा कॅक्टस अस्वलासारखा दिसतो.
(iii) “पिंप’ कॅक्टस – हा कॅक्टस थेट पिंपासारखा दिसतो. Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं
(iv) ‘सांबरशिंग’ कॅक्टस – ‘सांबरशिंग’ कॅक्टस सांबराच्या शिंगासारखा दिसणाऱ्या कॅक्टसला म्हणतात.
(v) सग्वारो कॅक्टस – सग्वारो कॅक्टस हा हात वर करून उभ्या राहिलेल्या एखादया मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. काही कॅक्टसना सुंदर फुले व रसदार फळे येतात. सग्वारो कॅक्टसला शेंड्यावर येणारी फुले पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोडा काळ का होईना बिचाऱ्या ओसाड वाळवंटाला सौंदर्याला स्पर्श होतो. याला कॅक्टसचा राजा म्हणतात.

जगणं कॅक्टसचं Summary in Marathi

जगणं कॅक्टसचं पाठपरिचय

‘जगणं कॅक्टसचं’ हा पाठ लेखक ‘वसंत शिरवाडकर’ यांनी लिहिला आहे. या पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या ‘कॅक्टस’ या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता याचे सूक्ष्म वर्णन केले आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं 2

जगणं कॅक्टसचं Summary in English

“Jagna Cactus Che’ is written by Vasant Shirwadkar. He has explained the types of cactuses, their utility and adaptation to less amounts of water. He has offered detailed information about the cactus.

जगणं कॅक्टसचं शब्दार्थ

  • वाळवंटी प्रदेश – वाळूकामय प्रांत – (a desert region)
  • कोरडेपणा – शुष्कपणा – (dryness)
  • दुर्भिक्ष – टंचाई, दुष्काळ – (scarcity)
  • ठणठणीत – कोरडा व रिकामा – (dry & empty)
  • जीवन – आयुष्य – (life)
  • जादूगार – जादू करणारा – (a magician)
  • जीवसृष्टी – सचेतन सृष्टी – (the living world)
  • बहादुरी – पराक्रम – (valour)
  • चमत्कार – आश्चर्य – (a wonder, a mircale)
  • अवर्षण – दुष्काळ, अनावृष्टी – (drought)
  • प्रदीर्घ – लांबलचक, खूप लांब – (very long)
  • वैराण – ओसाड, पडीक – (barren, desolate)
  • रक्ष – कोरडे, शुष्क – (dry)
  • निष्माण – प्राण / जीव नसलेला – (lifeless)
  • पालवी – झाडाला फुटलेले नवे अंकुर – (fresh foliage)
  • सुप्तावस्था – झोपलेली अवस्था – (sleeping stage)
  • रोप – वनस्पती, रोपटे – (a plant)
  • मरुभूमी – वाळवंट – (desert)
  • नंदनवन – (येथे अर्थ) स्वर्ग (इंद्राचे उपवन) – (the pleasure garden of indra’s paradise)
  • तवा – पोळ्या भाजण्याचे लोखंडी पसरट भांडे – (pan)
  • करपणे – भाजणे, होरपळणे – (to get scorched)
  • भकास – ओसाड, उजाड – (gloomy, desolate)
  • हंगाम – ऋतू, मौसम – (season)
  • प्रतिकार करणे – विरोध करणे – (to oppose)
  • मंद गती – धिम्यागतीने – (slow motion)
  • दिवाणखाना – बैठकीची खोली – (living room, hall)
  • प्रतिनिधी – (representative)
  • राक्षस – दानव – (monster)
  • पेर – दोन सांध्यांमधील भाग – (the portion between two joints)
  • पन्हाळी – पाणी वाहून नेण्याची नळी – (a pipe)
  • बाष्पीभवन – वाफ होणे – (evaporation)
  • वयं – दूर करणे – (to avoid)
  • गर – गीर, मगज – (pulp)
  • बिशाद – हिम्मत, धाडस – (daring)
  • बुंधा – बुडखा – (tree trunk)
  • निमुळता – क्रमाने अरूंद होत जाणारा, चिंचोळा – (tapering)
  • सरळसोट – सरळ, उभा – (upright)
  • कुंपण – संरक्षक भिंत – (a fence)
  • सायाळ – अंगावर काटे असणारा प्राणी, साळू, साळींदर – (hedgehog)
  • सांबर – फाटे फुटलेली शिंगे असणारा हरणासारखा – दिसणारा प्राणी – (horned deer)
  • शिंग – शंग – (horm)
  • शेंडा – टोक, शिखर – (the top)
  • गेंदेदार – गोंड्याच्या फुलांसारखी भरलेली
  • मोरावळा – साखरेच्या पाकात आवळ्याचे बारीक तुकडे शिजवून तयार केलेला गोडपदार्थ – (jam)
  • जिकिरीचे – त्रासदायक – (trouble some)
  • साल – झाडावरचे जाड आवरण – (bark, rind)
  • सोलणे – वरचा पापुद्रा (साल) काढून टाकणे – (to peel, to skin)
  • तुरट – तुरटीसारखी चव असलेला – (astringent)
  • निरुपाय – अगतिक – (helpless)
  • खटाटोप – दगदग, आटापिटा – (strenous efforts)
  • पंचाईत – अडचण – (problem)
  • परजून – परिधान करून – (to wear)
  • स्वसंरक्षण – स्वत:चे संरक्षण – (self–defence)
  • जबाबदारी – उत्तरदायित्व – (responsibility)

जगणं कॅक्टसचं वाक्प्रचार

  • भूगा होणे – चूरा होणे
  • प्रतिकार करणे – विरोध करणे – (to oppose)
  • धाडी पडणे – अकस्मात हल्ला करणे – (to attack)
  • शोषून घेणे – ओढून घेणे – (to absorb)
  • मात करणे – विजय मिळवणे – (to overcome)
  • अभाव असणे – कमतरता असणे, उणीव असणे – (lack of)
  • व्याकूळ होणे – बेचैन होणे – (to feel uneasy)