Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 6 चुडीवाला Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
खालील व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करा.
अब्दुल | रघुभैया |
उत्तरः
अब्दुल | रघुभैया |
(i) सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकीची मानणारा. (ii) साऱ्यांच्या जीवनात आनंद आपल्याच विश्वात रममाण निर्माण करण्यासाठी असणारा. (iii) संवेदनशील. | फारशी जाण नसलेला. धडपडणारा. संवेदनांशी फारसा संबंध नसलेला. |
प्रश्न 2.
खालील विधानांमागील कारणे लिहा.
(अ) रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून,
उत्तरः
रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो कारण त्याचा धंदयावर परिणाम होतो.
(आ) आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच.
उत्तर:
आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच कारण या दिवशी अब्दुल त्यांच्यासाठी रंगीबेरंगी बांगड्या आणि त्यांना लागणाऱ्या इतर वस्तू घेऊन येत होता.
प्रश्न 3.
गुणविशेष लिहा.
उत्तर:
प्रश्न 4.
खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.
वाक्ये | अव्यये | प्रकार |
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. (आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. (इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. (ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली. |
प्रश्न 5.
विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
विरामचिन्हे | नावे |
(अ) “अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.” (आ) “अन्वर जेवला?” |
उत्तर:
विरामचिन्हे | नावे |
(अ) “अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.” (आ) “अन्वर जेवला?” | दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्ण विराम/स्वल्प विराम. दुहेरी अवतरण, प्रश्नचिन्ह |
प्रश्न 6.
खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शोध घेऊन त्यांचा सराव करा.
अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. (उपमा अलंकार)
अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)
प्रश्न 7.
स्वमत.
(अ) सत्यता पटवून दया- ‘अब्दुल एक थोर समाजसेवक’
उत्तर:
अब्दुल हा बांगड्या विकणारा अत्यंत संवेदनशील मनाचा गृहस्थ होता. तपोवनातल्या कुष्ठरोगी मुलींना व स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी तो जात असे. त्यासाठी त्याला त्याच्या धंदयात झळ सोसावी लागत असे. त्याचा रोजगार बुडत असे. पण आजाराने ग्रस्त स्त्रियांचा आनंद बघून त्याला समाधान वाटत होते. समाजऋण मानणारा आणि माणुसकीला जपणारा व दुसऱ्याच्या आनंदासाठी धडपडणारा असा हा अब्दुल खरा समाजसेवक होता.
(आ) शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तरः
इतर चार-चौघीसारखी शन्नू गृहिणी होती. आपला प्रपंच नीट चालावा, अब्दुलचा व्यवसाय वाढावा, इतरांप्रमाणे आपल्या घरातही दोन चांगल्या वस्तू असाव्यात अशी तिची अपेक्षा होती. म्हणून तपोवनात कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जाणाऱ्या अब्दुलचा ती राग करत असे. तपोवनातील कुष्ठरोगाने पिडीत स्त्रियांना अब्दुल बांगड्या भरायला जातो हे जर कुणाला कळले तर इतर स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी अब्दुलकडे येणार नाहीत व त्यांचा परिणाम व्यवसायावर होईल, अशी धास्ती शन्नूला वाटत होती म्हणून अब्दुल तपोवनात जातो हे कोणाला कळू नये यासाठी तिची धडपड सुरू असे. अत्यंत साध्या अपेक्षा असणारी ती सामान्य गृहिणी होती, अब्दुलची उदात्त वृत्ती, परोपकार, सेवाभाव यातलं तिला काही कळत नव्हते.
(इ) तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
आधी त्याने मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. आज कालच्या स्त्रिया, मुली कशा प्रकारच्या बांगड्या वापरतात, फॅशनचा ट्रेंड काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. गुगल, यु ट्युब, वॉटस अॅप यातून त्याने या सगळ्यांची माहिती मिळवली पाहिजे. वरील सगळ्या माध्यमांद्वारे तो अत्यंत प्रभावीपणे त्यांच्याजवळ असलेल्या बांगड्यांची जाहिरात करु शकतो. ऑनलाईन व्यापार करू शकतो. अशा प्रकारे अब्दुलचा मुलगा आपला बांगड्यांचा व्यवसाय वाढवू शकतो.
(ई) दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो, असा प्रसंग लिहा.
उत्तरः
बस स्टॉपवर एक म्हातारी स्त्री उभी होती तिला ‘नानावटी’ हॉस्पिटलला जायचे होते. हॉस्पिटलपर्यंत थेट जाणारी बस नव्हती. रिक्षाला देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. मी एक रिक्षा थांबवली तिच्या हातात शंभर रुपये दिले. रिक्षावाल्याला तिला नानावटी हॉस्पिटलला सोडायला सांगितले. तिच्या डोळ्यातला कृतज्ञभाव आजही आठवतो.
एकदा रस्त्याने जात असतांना फुटपाथवर संसार असलेल्या ठिकाणी एक बाळ खूप कळवळून रडत होतं. आजूबाजूला कोणी दिसेना. मी त्याच्या जवळ गेले त्याच्या अंगाखाली आणि आजुबाजुला बरंच पाणी साचलेलं होतं. मी हिम्मत केली त्याला तिथून उचलले. त्याच्या ठेवलेल्या वस्तूमधून एक कापड काढून त्याला कोरडं केलं, कापडात गुंडाळून त्याला कोरड्या जागेत ठेवणार तोच त्याची आई आली, मी तिच्या हातात मुलं दिलं आपलं रडणं थांबवून ते बाळ माझ्याकडे अगदी टुकूटुकू बघत होते. मला खूप छान वाटलं.
Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 6 चुडीवाला Additional Important Questions and Answers
प्रश्न १. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,
कृती १ : आकलन कृती
प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
प्रश्न 2.
कारणे लिहा.
(i) स्वेटरमधून अब्दुलला चांगलीच थंडी जाणवत होती कारण …………………………..
उत्तर:
स्वेटरमधून अब्दुलला चांगलीच थंडी जाणवत होती कारण अब्दुलचा स्वेटर अनेक ठिकाणी उसवला होता.
(ii) लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली कारण
उत्तर:
लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली कारण अब्दुल त्यांच्यासाठी रंगीबेरंगी बांगड्या घेऊन आला होता.
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
(i) बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला.
(ii) अब्दुल खिडकीजवळ बसला.
(iii) पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली.
(iv) अब्दुल बसस्टॉपवर आला.
उत्तर:
(i) अब्दुल बसस्टॉपवर आला.
(ii) बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला.
(iii) अब्दुल खिडकीजवळ बसला.
(iv) पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली.
प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) अब्दुलचे दुकान बंद असल्याने कोणाचा धंदा तेजीत चालणार होता?
उत्तरः
अब्दुलचे दुकान बंद असल्याने रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार होता.
(ii) कोणाच्या डोळ्यांतला क्रोध अब्दुलच्या परिचयाचा होता?
उत्तरः
शन्नूच्या डोळ्यांतला क्रोध अब्दुलच्या परिचयाचा होता.
(iii) लहान लहान मुलींनी कोणाभोवती एकदम गलका करायला सुरुवात केली?
उत्तरः
लहान लहान मुलींनी अब्दुलभोवती गलका करायला सुरुवात केली.
(iv) बस कोणत्या ठिकाणी रिकामी झाली?
उत्तर:
बस जिल्हाधिकारी कचेरीजवळ रिकामी झाली.
(v) अब्दुलने मफलर कानाला घट्ट का लपेटून घेतला?
उत्तर:
बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अब्दुलला त्रासदायक वाटू लागला होता, म्हणून अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला.
कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
(i) अब्दुलचा व्यवसाय → बांगड्या विकण्याचा
(ii) अब्दुल या ठिकाणी गेला → तपोवन
प्रश्न 2.
आकृतीबंध पूर्ण करा.
प्रश्न 3.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) शांतीवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले.
(ii) संक्रांत असल्याने अब्दुलचा धंदा तेजीत चालला होता
(iii) बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला.
(iv) थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच मजेदार वाटू लागला.
उत्तरः
(i) चूक
(ii) चूक
(iii) बरोबर
(iv) चूक
कृती ३ : स्वमत
प्रश्न 1.
अब्दुलबद्दल माहिती लिहा.
उत्तरः
अब्दुलचा बांगड्या विकण्याचा व्यवसाय होता. अब्दुलचा व्यवसाय जेमतेमच चालत असावा असे वाटते. कारण त्याच्या अंगावरचा स्वेटर अनेक ठिकाणी उसवलेला होता. थंडी वाऱ्याची पर्वा न करता तो आपली बांगड्यांची पेटी आणि पिशवी घेऊन तपोवनातल्या मुलींना बांगड्या भरण्यासाठी निघाला होता. यावरून असे दिसते अब्दुल हा अत्यंत करूणाशील व दयाशील वृत्तीचा, समाजाचे मूल्य जपणारा होता.
प्रश्न 2.
तपोवनाकडे येताना व आल्यावर अब्दुलने कोणत्या गोष्टी अनुभवल्या ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
जिल्हाधिकारी कचेरीजवळ येताच बहुतेक सगळीच बस रिकामी झाली. तपोवनाकडे जाणारे कोणीही प्रवासी नव्हते. तपोवनात आल्यावर त्याचे लक्ष कमानीकडे गेले. जेमतेम हातभर असलेली वेल आता खूप फुलली होती. अब्दुलला गेटजवळ बघताच तपोवनातील सगळया मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली.
प्रश्न 3.
“रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून” शन्नूच्या या विधानामागचे कारण तुमच्या शब्दात लिहा.
उत्तरः
अब्दुल तपोवनात दर संक्रांतीला जात असे. तपोवन हे कुष्ठरोगी लोकांचे आश्रयस्थान होते. तेथील कुष्ठरोगाने पिडीत स्त्रियांना बांगड्या भरायला अब्दुल जातो, हे जर कुणाला कळले तर इतर स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी अब्दुलकडे येणार नाहीत व त्याचा परिणाम व्यवसायावर होईल, अशी धास्ती शन्नूला वाटत होती. म्हणून वरील विधान अब्दुलला उद्देशून तिने म्हटले आहे.
प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) तपोवनातील स्त्रियांना अब्दुल कोणासारखा वाटे?
उत्तरः
तपोवनातील स्त्रियांना अब्दुल देवदूतासारखा वाटे.
(ii) अब्दुलला कोणती कला साधली होती?
उत्तरः
तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्याची कला अब्दुलला साधली होती.
प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) आंब्याच्या झाडाखाली असलेल्या …………………………. अब्दुल बसला. (चबुतऱ्यावर, चौथऱ्यावर, दगडावर, पारावर)
(ii) साऱ्या …………………………. तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस! (मधुबनातील, शांतिवनातील, तपोवनातील, तेजोवनातील)
(iii) प्रत्येकीला …………………………. बांगड्या भरायच्या होत्या. (प्रथम, आधी, रंगीबेरंगी, आवडीच्या)
उत्तर:
(i) चौथऱ्यावर
(ii) तपोवनातील
(iii) प्रथम
कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1.
कोण ते लिहा.
(i) चिठ्ठीतला मजकूर वाचून दाखवणारा – रघुभैया
(ii) अब्दुलला सत्काराचे निमंत्रण देणारे – दाजीसाहेब
(iii) संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनात चुडीवाल्याची वाट पाहणाऱ्या – स्त्रिया
प्रश्न 2.
कारणे लिहा.
(i) चिट्ठीतला मजकूर वाचून अब्दुल आणि शन्नू यांना आनंद झाला कारण ………………………… .
उत्तर:
चिठ्ठीतला मजकूर वाचून अब्दुल आणि शन्नू यांना आनंद झाला कारण तपोवनात अब्दुलचा खास सत्कार होणार होता.
(ii) अब्दुलने रघुभैय्याला चिट्ठी वाचण्यास सांगितली कारण ………………………….
उत्तरः
अब्दुलने रघुभैय्याला चिठ्ठी वाचण्यास सांगितली कारण चिट्ठी मराठीतून होती.
प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.
(i) विलक्षण : समाधान : : खास : ………………………….
(ii) हातात : बांगड्या : : झाडाखाली : ………………………….
उत्तर:
(i) सत्कार
(ii) चौथरा
प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
कृती ३ : स्वमत
प्रश्न 1.
तपोवनातील स्त्रिया व मुलींना अब्दुल देवदूतासारखा वाटे हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
तपोवनात कुष्ठरोगाने पिडित स्त्रिया आणि मुली राहत असत. या स्त्रिया व मुलींनाही इतर स्त्रियांसारखाच साज शृंगार करायला आवडत असे. त्या कुष्ठरोगासारख्या दुर्धर रोगाने ग्रस्त असल्यामुळे त्यांचा हात बांगड्या भरण्यासाठी कोणीही हातात घेणार नव्हते. त्यांचा स्पर्श म्हणजे रोगाला निमंत्रण अशी सर्वसाधारण समजूत; पण अब्दुल मात्र असल्या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता त्यांच्या हातावरील व्रण, जखमा सांभाळून त्यांना हळूवारपणे बांगड्या भरत असे. हे काम तो वर्षातून दोनदा करत असे. रंगीबेरंगी बांगड्यांच्या रंगात त्या स्त्रिया काही काळ का होईना आपले दुःख विसरत असत.
आणि ही गोष्ट केवळ अब्दुलमुळे शक्य होत होती म्हणून अब्दुल त्यांना देवदूतासारखा वाटे.
प्रश्न 2.
दाजीसाहेबांनी अब्दुलचा सत्कार का केला, सकारण लिहा.
उत्तरः
ज्या कुष्ठरोगी लोकांची सावली देखील लोकं टाळतात अशा कुष्ठरोगी स्त्रियांच्या हातात बांगड्या भरण्याचे काम अब्दुल अगदी निस्वार्थी भावनेने करायचा, त्यांच्या जीवनात आनंद फुलवायचा प्रसंगी व्यवसायात आपले नुकसान सोसून अविरतपणे तो हे काम करत होता. त्याच्या सेवाभावी वृत्तीचा व माणुसकीला जपणाऱ्या निर्मळ मनाच्या माणसाचा सत्कार झाला पाहिजे, त्याच्या कामाची पावती त्याला दिली पाहिजे या भावनेतून दाजीसाहेबांनी अब्दुलला सत्काराचे निमंत्रण दिले व त्याचा सत्कार केला.
प्रश्न 3.
‘इच्छा तिथे मार्ग’ – अब्दुलच्या उदाहरणावरून स्पष्ट करा.
उत्तरः
अनेक लोकांच्या मनात बऱ्याच इच्छा असतात. पण ते केवळ विचारच करत राहतात. हे नाही, ते नाही या सबबीखाली त्यांच्या इच्छेला किंवा विचाराला पूर्णत्व येत नाही. पण अब्दुलसारखा अगदी छोटा व्यावसायिक अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थिती असलेला, आपल्याजवळ जे आहे जसं आहे त्यातून निस्वार्थीपणे सेवेचं व्रत साकारतो. कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्याचं काम वर-वर अगदी साधं वाटत असलं तरी त्यामागे अब्दुलची उदात्त भावना, दुसऱ्याच्या आनंदासाठी झटण्याची वृत्ती दिसून येते. फार मोठा गाजा-वाजा, बडेजाव न करता अब्दुल हे काम अत्यंत सेवाभावी वृत्तीने करत होता. खरोखरच मनापासून काही करण्याची जर इच्छा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो हे अब्दुलच्या उदाहरणावरून जाणवते.
प्रश्न 4.
अब्दुल तपोवनात गेल्यावर तिथले वातावरण कसे होत असे, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
अब्दुल तपोवनात गेला की चुडीऽवाला आला, चुडीऽऽवाला आला असे म्हणत सगळ्या बायका-मुली त्याच्या भोवती जमत असत. प्रत्येकीला अब्दुलकडून आपल्याला हव्या असलेल्या वस्तू, रंगीबेरंगी बांगड्या हव्या असत. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या असत म्हणून अब्दुलच्या भोवती त्या गर्दी करत असत. त्यांचा आवाज, गडबड, गोंधळ यामुळे आनंदवनाचा परिसर गजबजून उठे. सगळया स्त्रियांमध्ये आनंद आणि चैतन्य पसरत असे. तो सगळा अनुभव म्हणजे अब्दुलसाठी अत्यंत समाधानाची गोष्ट होती.
प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती
प्रश्न 1.
ओघ तक्ता पूर्ण करा.
प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 3.
कोण ते लिहा
(i) सेतूबंधन करणारा – राम
(ii) सेतूबंधनाला मदत करणारी – खार
प्रश्न 4.
उत्तरे लिहा
(i) संक्रात आणि जेष्ठ पौर्णिमेला हा प्रस्ताव समोर आला होता,
उत्तर:
तपोवनातील स्त्रिया व मुली यांना बांगड्या भरणे.
(ii) दाजीसाहेबांनी यांना विनंती केली होती.
उत्तर:
अनेक बांगडीवाल्यांना
कृती २ : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) दाजीसाहेबांचे वय किती वर्षे होते?
उत्तरः
दाजीसाहेबांचे वय चौऱ्याऐंशी वर्षे होते.
(ii) अब्दुलने दाजीसाहेबांना कोणते आश्वासन दिले ?
उत्तरः
ज्येष्ठ पौर्णिमेला आणि संक्रांतीला तपोवनात बांगड्या भरण्यासाठी येण्याचे आश्वासन अब्दुलने दाजीसाहेबांना दिले.
प्रश्न 3.
कारणे लिहा.
सत्काराच्या ठिकाणी अब्दुल तसाच उभा राहिला; कारण ……………………………………….
(अ) बसायला जागा नव्हती.
(आ) पाहुण्यांबरोबर बसायला त्याला संकोच वाटला.
(इ) अब्दुलच्या मनात भिती होती.
(ई) अब्दुल घाबरला होता.
उत्तरः
सत्काराच्या ठिकाणी अब्दुल तसाच उभा राहिला; कारण पाहुण्यांबरोबर बसायला त्याला संकोच वाटला.
(ii) अब्दुल अतिशय भारावून गेला; कारण ………………………………
(अ) तपोवनातील स्त्रियांचे दुःख पाहून.
(आ) दाजीसाहेबांनी अब्दुलचा सत्कार केला.
(इ) तपोवनात काम करायला मिळाले म्हणून.
(ई) तपोवनातील आनंद पाहून.
उत्तर:
अब्दुल अतिशय भारावून गेला; कारण दाजीसाहेबांनी अब्दुलचा सत्कार केला.
प्रश्न 4.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
(i) …………………………. सेतूबंधन केलं; पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. (रामानं, हनुमानानं, लक्ष्मणानं, सीतेनं)
(ii) …………………………. त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला (दाजीसाहेबांना, शन्नूला, रघुभैय्याला, अब्दुलला)
उत्तर:
(i) रामानं
(ii) अब्दुलला
प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
(i) आवाजातला : खणखणीतपणा : : बोलण्यातली : ………………………………
(ii) तेज : पुंज : चेहरा : : पांढरेस्वच्छ : ………………………………
उत्तर:
(i) ऐट
(ii) धोतर
कृती ३ : स्वमत
प्रश्न 1.
दाजीसाहेबांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
दाजीसाहेब चौऱ्याऐंशी वर्षांचे होते. पण तरीही खूप काटक होते. उंच सडसडीत देहयष्ठी, तेज:पुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरेस्वच्छ धोतर ते नेसत असत. त्यांच्या आवाजात खणखणीतपणा होता आणि बोलण्यात ऐट होती. असे दाजीसाहेबांचे व्यक्तिमत्व होते.
प्रश्न 2.
दाजीसाहेबांच्या पोशाखाचे वर्णन करा,
उत्तरः
दाजीसाहेब पांढरे स्वच्छ धोतर परिधान करत असत. त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला उंच सडसडीत केशरी फेटा असा दाजीसाहेबांचा पोशाख असे. त्यांची शरीरयष्टी आणि पोशाख त्यामुळे ते खूप रुबाबदार दिसत.
प्रश्न 3.
दाजीसाहेब आपल्या भाषणात अब्दुलबद्दल जे बोलले ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
दाजीसाहेब म्हणाले तपोवनासाठी मदत करणाऱ्या अनेक व्यक्ती सुदैवाने आम्हाला लाभल्या. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव अब्दुल मियांनी स्वत:हून स्विकारला. दरवर्षी अब्दुलमियाँ न चुकता येतात व येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुलमियाँ हे काम करतात. त्यांचे हे समाजकार्य, मानवसेवा खरोखरच फार मोठी आहे, अनमोल आहे, अशा शब्दांत दाजीसाहेबांनी अब्दुलच्या कार्याचा गौरव केला.
प्रश्न 4.
प्रत्येकाच्या छोट्या-छोट्या सहकार्यातून अनेक मोठी कामे होऊ शकतात. यावर तुमचे मत उदाहरणासह लिहा.
उत्तरः
दाजीसाहेबांना तपोवनासाठी काम करणारी, मदत करणारी माणसं मिळाली म्हणून एवढं काम ते चांगल्या प्रकारे करू शकले. एखाक्या चांगल्या कामासाठी प्रत्येकाने थोडासा जरी हातभार लावला तरी खूप मोठमोठी कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. अगदी अलिकडचेच उदाहरण घ्यायचे झाले तर नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेले ‘नाम’ फाऊंडेशन. यात अनेकांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे. पाण्याच्या प्रश्नावर काम करणारे जलपुरुष ‘डॉ. राजेंद्रसिंह’ असोत किंवा अनाथांची आई झालेल्या ‘सिंधुताई सकपाळ’ असोत. या सगळ्यांच्या कामाला हातभार लावणारे, सहकार्य देणारे अनेक हात आहेत. सामाजिक सेतुबंधनाची मोठ मोठी कार्ये सहकार्यातूनच साकार होत असतात.
प्रश्न ४. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती.
प्रश्न 1.
ओघतक्ता पूर्ण करा.
प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 3.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा,
(i) अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी ……………………………… जाणार होती. (रिक्षातून, सायकलवरून, मोटारीतून, चालत)
(ii) ……………………………… पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. (शन्नूचे, रघुभैय्याचे, अन्वरचे, दाजीसाहेबांचे)
(iii) थाळीत चपाती आणि ……………………………… भाजी घेऊन तिने थाळी अब्दुलसमोर ठेवली. (मेथीची, भोपळ्याची, वांग्याची, कारल्याची)
उत्तर:
(i) मोटारीतून
(ii) शन्नूचे
(iii) वांग्याची
प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
(i) अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली.
(ii) दाजीसाहेबांनी अब्दुलला मोटारीत बसवले,
(iii) अब्दुल एखादया अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला.
(iv) अब्दुल येताच शन्नू उठली.
उत्तर:
(i) दाजीसाहेबांनी अब्दुलला मोटारीत बसवले.
(ii) अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली.
(iii) अब्दुल येताच शन्नू उठली.
(iv) अब्दुल एखादया अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला.
कृती २: आकलन कृती
प्रश्न 1.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) मोटार कोणत्या चौकात थांबली?
उत्तरः
मोटार अंबादेवीच्या चौकात थांबली.
(ii) शनू कोणत्या गोष्टींचा अब्दुलला नेहमी आग्रह करत होती?
उत्तरः
शन्नू अब्दुलला नवीन व्यवसाय करण्याचा आग्रह करत होती.
प्रश्न 2.
कारणे लिहा.
(i) अब्दुलला बांगड्यांचा व्यवसाय सोडवत नव्हता; कारण …………………………..
(अ) त्याच्या अब्बाजानपासून चालत आलेला व्यवसाय होता.
(आ) बांगड्यांचा धंदा खूप तेजीत होता.
(इ) तो व्यवसाय त्याला मनापासून आवडत होता.
(ई) तो खूप आळशी होता.
उत्तर:
अब्दुलला बांगड्यांचा व्यवसाय सोडवत नव्हता; कारण त्याच्या अब्बाजानपासून चालत आलेला व्यवसाय होता.
(ii) शनू नेहमी नाराज असे; कारण …………………………..
(अ) अब्दुलने तिला तपोवनात नेले नव्हते.
(आ) अन्वर जेवला नव्हता.
(इ) वारंवार सांगूनही अब्दुल व्यवसाय बदलत नव्हता.
(ई) अब्दुल तिच्यावर नेहमी ओरडायचा.
उत्तरः
शनू नेहमी नाराज असे; कारण वारंवार सांगूनही अब्दुल व्यवसाय बदलत नव्हता.
प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
गट अ – गट ब
(i) अष्टमीचा चंद्र (अ) वातावरण
(ii) उदास चेहरा (आ) आकाश
(iii) दुकानाला रंग (इ) अब्दुल
(iv) अंतर्बाह्य प्रसन्न (ई) रघुभैय्याच्या
उत्तर:
(i- आ)
(ii – इ)
(iii – ई)
(iv – अ)
प्रश्न 4.
चौकटी पूर्ण करा.
प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
(i) उदास : चेहरा :: मेघरहित : …………………………..
(ii) अष्टमीचा : चंद्र :: बांगड्यांचा : …………………………..
उत्तर:
(i) आकाश
(ii) धंदा
कृती ३: स्वमत
प्रश्न 1.
अब्दुलची जेवणावरची इच्छा मरून गेली! तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
अब्दुल पुरस्कार स्वीकारून तपोवनातून घरी आला. शन्नोने त्याला जेवायला वाढले. पण शन्नू जेवली नव्हती हे त्याला कळले. अन्वर जेवला पण खिम्यासाठी रुसून बसला होता. हे शनूने अब्दुलला सांगितले. अब्दुलचा धंदा चांगला चालत नव्हता. आणि त्याला धंदा सोडवतही नव्हता. आपल्या मुलांची व बायकोची आपण नीट काळजी घेऊ शकत नाही. त्यांच्या साध्या-साध्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही, म्हणून अब्दुल खूप उदास झाला. जेवणावरची त्याची वासनाच उडाली. त्याच्या तोंडातला घास तोंडातच घोळू लागला.
प्रश्न 2.
शन्नू वारंवार कोणत्या गोष्टीचा आग्रह करत होती? का?
उत्तरः
अब्दुलचा बांगड्यांचा व्यवसाय होता. आधीच जेमतेम चालणारा व्यवसाय आणि नेमका सणाच्या दिवशी आपले दुकान बंद ठेवून अब्दुल तपोवनातल्या स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असे. शन्नू वारंवार अब्दुलला दुसरा व्यवसाय करण्यास सांगत होती. अत्यंत अल्प उत्पन्नात संसाराचा गाडा चालवणं तिला कठीण जात होतं. तिच्या मुलाच्या साध्या साध्या इच्छा तिला पूर्ण करता येत नव्हत्या. म्हणूनच ती, अब्दुलला नवीन धंदा सुरू करायला सांगत होती.
प्रश्न 3.
अब्दुल मोटारीतून प्रवास करतांना त्याच्या मनातले विचार व वातावरणाचे वर्णन करा.
उत्तर:
मोटार धावत होती. अब्दुलच्या मनात विचार आला, शन्नूला आज आणायला हवे होते. तिची नाराजी दूर झाली असती. धावत्या मोटारीतून त्याने बाहेर नजर टाकली. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न होते.
प्रश्न 4.
अब्दुलला नवीन धंदा का सुरू करता येत नव्हता?
उत्तरः
शन्नू वारंवार अब्दुलजवळ नवीन धंदा सुरू करण्याचा आग्रह धरत होती; पण अब्दुलला ते शक्य नव्हते. नवीन धंदयासाठी लागणारे भांडवल त्याच्याकडे नव्हते. शिवाय बांगड्या विकण्याच्या या व्यवसायाशी त्याचे भावनिक नाते होते. त्याच्या वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय होता. म्हणून तो त्याला बंद करावासा वाटत नव्हता.
प्रश्न ५. पुढील उताराच्या आधारे दिलेला सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
(i) देवळात दोनचे टोले देणारा – पहारेकरी
(ii) गाढ झोपी गेलेला – अन्वर
प्रश्न 3.
पुढील घटनांचे परिणाम लिहा. घटना परिणाम
(i) तपोवन दाजीसाहेबांच्या धंदा करायला अब्दुलचं मन हाती राहिलं नाही हे लागत नाही. अब्दुलला कळलं.
(ii) सगळं काही विसरून अब्दुलचे मनोमन सुखावणे. स्त्रियांचे हसणे.
प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट – ‘ब’ गट
(i) देऊळ (अ) हळवा
(ii) तपोवन (आ) पेटी
(iii) बांगड्या (इ) दाजीसाहेब
(iv) अब्दुल (ई) पहारेकरी
उत्तर:
(i – ई),
(ii – इ),
(iii – आ),
(iv – अ)
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) अन्वर ………………………….. झोपला होता. (गाढ, गप्प, शांत, आनंदी)
(ii) एखादया वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची एकाएकी ………………………….. उडून गेली. (इच्छा, जीवनेच्छा, आस, आसक्ती)
(iii) ………………………….. त्याला आवाज दिला. (शनूने, अन्वरने, दाजीसाहेबांनी, रघुभैय्याने)
उत्तर:
(i) गाढ
(ii) जीवनेच्छा
(iii) रघुभैय्याने
कृती २: आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 2.
कारणे लिहा.
(i) अब्दुलचं मन धंदयात लागत नव्हतं. कारण …………………………..
उत्तरः
अब्दुलचं मन धंदयात लागत नव्हतं कारण तपोवन दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नव्हतं.
(ii) अब्दुलने पिशवीतील वस्तू बाहेर काढल्या कारण …………………………..
उत्तर:
अब्दुलने पिशवीतील वस्तू बाहेर काढल्या कारण त्या सगळ्या वस्तू तो संक्रांतीला तपोवनात नेणार होता.
प्रश्न 3.
खालील कृती पूर्ण करा.
प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) अब्दुल हळवा का झाला?
उत्तर:
कष्टाने फुलवलेली कर्मभूमी सोडण्याच्या विचारानं दाजीसाहेबांना किती यातना होत असतील, या विचाराने अब्दुल हळवा झाला.
(ii) अब्दुल तपोवनात कोणत्या सणाच्या दिवशी जाणार होता?
उत्तर:
अब्दुल संक्रांतीला तपोवनात जाणार होता.
(iii) देवळातल्या पहारेकऱ्याने कितीचे टोल दिले?
उत्तर:
देवळातल्या पहारेकऱ्याने दोनचे टोल दिले.
(iv) अब्दुल वर्षातून किती वेळा दुसऱ्यासाठी जगण्यात त्या आनंदाचे सुख अनुभवायचा?
उत्तर:
अब्दुल वर्षातून फक्त दोनदाच दुसऱ्यासाठी जगण्यातल्या आनंदाचे सुख अनुभवायचा.
(v) साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलवर काय परिणाम झाला?
उत्तरः
साऱ्या वस्तूंकडे बघता-बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले.
प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
कृती ३ : स्वमत
प्रश्न 1.
त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त दोनदा अब्दुल अनुभवायचा. स्पष्ट करा.
उत्तर:
अब्दुलचा बांगड्या विकण्याचा व्यवसाय होता. वर्षातून दोनदा म्हणजे संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला अब्दुल तपोवनात जायचा. कुष्ठरोगाने पीडित स्त्रिया, मुली यांच्यासाठी तो टिकल्या, बांगड्या, पिना, आरसा, रिबिन, रुमाल अशा वस्तू घेऊन जायचा. अब्दुल तपोवनात जाताच तिथल्या सगळ्या बायका, मुलींना खूप आनंद व्हायचा. त्यांच्या हातात कौशल्यपूर्वक तो बांगड्या भरायचा. बांगड्यांच्या विविध रंगात क्षणभर का होईना त्या आपले दुःख विसरत, त्यांचा तो आनंद बघून अब्दुल मनोमन सुखावत असे. स्वत:साठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद अब्दुल मिळवत होता.
प्रश्न 2.
एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली असे लेखिका का म्हणते?
उत्तरः
अब्दुल रंगीबेरंगी बांगड्या व इतर अनेक वस्तू घेऊन वर्षातून दोनदा तपोवनात जात असे. त्या रंगीबेरंगी बांगड्या म्हणजे तपोवनातल्या मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी आनंददायी गोष्ट होती. बांगड्या भरण्याचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी चैतन्याचा आणि उत्साहाचा दिवस होता, आपलं सगळं दुःख विसरून बांगड्यांच्या रंगात त्या हरवून जात. हे सगळं बघून अब्दुल मनोमन सुखावत असे. दुसऱ्यासाठी जगण्यातल्या आनंदाचं सुख आता त्याला मिळणार नव्हतं, म्हणून तो खूप दुःखी झाला होता. कारण तपोवन आता राहणार नव्हतं. अब्दुलच्या जीवनातला आनंद संपला होता. त्यामुळेच एखादया वस्वाचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली, असे लेखिका म्हणते.
प्रश्न 3.
वरील परिच्छेदावरून अब्दुलचा स्वभाव विशेष लिहा.
उत्तरः
अब्दुल हा अत्यंत संवेदनशील वृत्तीचा गृहस्थ होता. स्वत:ची आर्थिक स्थिती चांगली नसतांना देखील तो आपल्या व्यवसायाची पर्वा न करता तपोवनात जात असे. तेथील मुलींना स्त्रियांना त्याच्या मनपसंत बांगड्या भरत असे. त्याला त्या मुलींचा, स्त्रियांचा आनंद बघून समाधान वाटत असे. यावरून असे दिसते की, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी धडपडणारा, व माणुसकीला जपणारा असा अब्दुल होता. तपोवन आता राहणार नाही हे कळल्यावर तो खूप दुःखी झाला यावरून असे कळते की, तो आपल्यापेक्षा दुसऱ्यांच्या सुखाचा, आनंदाचा विचार करणारा परोपकारी वृत्तीचा होता. तो खूपच हळवा होता.
स्वाध्याय कृती
प्रश्न 1.
शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तरः
इतर चार-चौघीसारखी शन्नू गृहिणी होती. आपला प्रपंच नीट चालावा, अब्दुलचा व्यवसाय वाढावा, इतरांप्रमाणे आपल्या घरातही दोन चांगल्या वस्तू असाव्यात अशी तिची अपेक्षा होती. म्हणून तपोवनात कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जाणाऱ्या अब्दुलचा ती राग करत असे. तपोवनातील कुष्ठरोगाने पिडीत स्त्रियांना अब्दुल बांगड्या भरायला जातो हे जर कुणाला कळले तर इतर स्त्रिया बांगड्या भरण्यासाठी अब्दुलकडे येणार नाहीत व त्यांचा परिणाम व्यवसायावर होईल, अशी धास्ती शन्नूला वाटत होती म्हणून अब्दुल तपोवनात जातो हे कोणाला कळू नये यासाठी तिची धडपड सुरू असे. अत्यंत साध्या अपेक्षा असणारी ती सामान्य गृहिणी होती, अब्दुलची उदात्त वृत्ती, परोपकार, सेवाभाव यातलं तिला काही कळत नव्हते.
चुडीवाला शब्दार्थ
- उजळणी - सराव , शिकलेल्या भागाचा पुन्हा अभ्यास – (revision)
- चुडीवाला - बांगडीवाला - (bangle seller)
- कुष्ठरोग - महारोग – (leprosy)
- वसाहत - वसतिस्थान – (colony)
- प्रस्ताव - ठराव – (proposal)
- संवेदनशील - भावनाशील - (sensitive)
- वृत्ती - स्वभाव – (nature)
- पर्वणीच - सणाचा दिवस - (a festival)
- उतारू - प्रवासी – (passengers)
- क्रोध - राग – (anger)
- चौथरा - दगडी ओटा
- कीव - करूणा - (mercy, pity)
- मेघरहित - ढग नसलेले - (without clouds)
- उसवलेला - शिवण सैल झालेला किंवा फाटलेला
- जीवनेच्छा - जीवनातील इच्छा
- वाऱ्याचा झोत - वाऱ्याची लाट - (a wave of air)
- कमान - महिरप - (decorative half cirlce)
- दिव्य - कसोटीचा प्रसंग / कठोर परीक्षा - (an ordeal)
- चैतन्य - जिवंतपणा - (liveliness)
- देवदूत - देवाचा निरोप्या - (god’s messenger)
- विलक्षण - वेगळे - (uncommon)
- समाधान - मनाचा संतोष, – (satisfaction)
- सत्कार - आदर – (hospitality, respect)
- संकोच - लाजणे - (to feel shy)
- सडसडीत - उंच देखणा - (tall, slim and comely)
- देहयष्टी - शरीराची ठेवण - (body structure)
- तेजःपुंज - तेजस्वी – (lustrous / brilliant)
- गौरवर्ण - गोरा रंग - (fair)
- रुबाब /दिमाख खार - एक चपळ प्राणी - (asquirrel)
- आश्वासन - वचन/हमी - (promise)
- मोबदला - केलेल्या कामाचे वेतन – (remuneration for the work done)
- अनमोल - मौल्यवान, ज्याचे मूल्य होऊ शकत नाही असे – (priceless)