5th Standard Marathi Digest Chapter 1 नाच रे मोरा Textbook Questions and Answers
1. ऐका. म्हणा.
प्रश्न 1.
ऐका. म्हणा.
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच!
ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच ।। 1 ।।
झर झर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ
काहीतरी गाऊ
करून पुकारा नाच ।। 2 ।।
थेंब थेंब तळ्यात नाचती रे
टप्टप् पानात वाजती रे
पावसाच्या रेघात
खेळ खेळू दोघांत
निळ्या सौंगड्या नाच ।। 3 ।।
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान
सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच ।। 4 ।।
– ग. दि. माडगूळकर
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 1 नाच रे मोरा Additional Important Questions and Answers
1. खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दांत लिहा.
प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दांत लिहा.
- आपला राष्ट्रीय पक्षी कोणता?
- मोर कुठे नाचणार आहे?
- वारा कोणाशी झुंजत आहे?
- ढगाला कशाची उपमा दिली आहे?
- कोण टाळी देते?
- धार कशी झरत आहे?
- तळ्यात कोण नाचतात?
- पानावर टपटप कशाचा आवाज येतो?
- सवंगडी कोणत्या रंगाचा आहे?
- पावसाची रिमझिम थांबल्यावर आकाशात काय दिसू लागले?
उत्तर:
- मोर
- आंब्याच्या वनात
- ढगांशी
- काळ्या कापसाची
- वीज
- झरझर
- थेंब
- थेंबांचा
- निळ्या
- सातरंगी कमान
2. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
प्रस्तुत कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे?
उत्तर:
प्रस्तुत कवितेत पावसाळ्याचे वर्णन केले आहे.
प्रश्न 2.
प्रस्तुत कविता कोणी लिहिली आहे?
उत्तर:
प्रस्तुत कविता ‘ग. दि. माडगूळकरांनी’ लिहिली आहे.
प्रश्न 3.
कवी मोराला कशाप्रकारे नाचण्यास सांगत आहे?
उत्तर:
कवी मोराला पिसारा फुलवून नाचण्यास सांगत आहे.
प्रश्न 4.
झाडांची इरली कशामुळे भिजली आहे?
उत्तर:
झाडांची इरली झर झर धार झरल्यामुळे भिजली आहे.
प्रश्न 5.
कवी कोणाबरोबर खेळ खेळणार आहे?
उत्तर:
कवी निळ्या सवंगड्यांबरोबर खेळ खेळणार आहे.
प्रश्न 6.
कवी मोराला कशाखाली नाचण्यास सांगत आहेत?
उत्तर:
कवी मोराला आभाळातील सातरंगी कमानीखाली नाचण्यास सांगत आहे.
प्रश्न 7.
इंद्रधनुष्यातील सात रंग कोणते?
उत्तर:
तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा हे इंद्रधनुष्यातील सात रंग आहेत.
3. कंसातील शब्दांचा आधार घेऊन रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 1.
कंसातील शब्दांचा आधार घेऊन रिकाम्या जागा भरा.
(रिमझिम, कमान, कापूस, धार, सौंगड्या, जोडी, इरली, तळ्यात, पानात)
- काळा काळा ……………….. पिंजला रे.
- झर झर …………………. झरली रे.
- झाडांची भिजली ……………….. रे.
- थेंब थेंब ……………………. नाचती रे.
- टप्टप् …………………. वाजती रे.
- निळ्या ……………………. नाच.
- पावसाची …………….. थांबली रे.
- तुझी माझी ………………….जमली रे.
- आभाळात छान छान सात रंगी …………………….. .
उत्तरः
- कापूस
- धार
- इरली
- तळ्यात
- पानात
- सौंगड्या
- रिमझिम
- जोडी
- कमान
4. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न 1.
1. ढगांशी वारा झुंजला रे
…………………. पिंजला रे
2. थेंब थेंब तळ्यात नाचती रे
……………………….. वाजती रे
3. पावसाची रिमझिम थांबली रे
…………………………… जमली रे
4. आभाळात छान छान
…………… कमानीखाली त्या नाच।
उत्तर:
1. काळा काळा कापूस
2. टपटप पानात
3. तुझी माझी जोडी
4. छान छान सात रंगी कमान
5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर:
आकाशात काळे काळे ढग जमा झाले आहेत. वारा सुटला आहे. वीज चमकत आहे. झर झर पावसाची धार पडत आहे. झाडांची इरली भिजली आहे. पावसाचे थेंब तळ्यात नाचत आहेत. पावसाच्या थेंबांचा पानांवर पडून टप्टप् असा आवाज येत आहे. आकाशात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन केले आहे.
प्रश्न 2.
प्रस्तुत कवितेत आभाळाचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर:
पाऊस सुरू होण्यापूर्वी आभाळात काळा काळा कापूस पिंजावा तसे काळे ढग जमा झाले आहेत व वीज कडाडते आहे. तसेच पावसाची रिमझिम थांबल्यावर आभाळात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवितेत आभाळाचे वर्णन केले आहे.