Maharashtra Board Text books

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 14 चित्रसंदेश

5th Standard Marathi Digest Chapter 14 चित्रसंदेश Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
पाहा. सांगा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 14 चित्रसंदेश 1
उत्तर:
चित्र 1 – ट्रेन अथवा बस ही आपली नव्हे तर सार्वजनिक मालमत्ता आहे. तिची स्वच्छता हे आपले कर्तव्य आहे. थुकण्याने अनेक प्रकारचे रोग पसरतात. तेव्हा धुंकू नका.
चित्र 2 – रेल्वे रूळ ओलांडणे हे नियमाविरूद्ध आहे. त्याने स्वत:च्याच जीवाला धोका आहे; असे करू नका.
चित्र 3 – चालत्या ट्रेनमध्ये चढणे वा उतरणे म्हणजे आपल्याच जीवाशी खेळ करणे. असे केल्याने आपले किंमती आयुष्य आपणच संपवू, असे करू नका.
चित्र 4 – कोणतेही ज्वलनशील पदार्थ प्रवासात बाळगणे म्हणजे आगीला निमंत्रण देणे. आगीपासून स्वत:चा व इतरांचाही जीव/ प्राण वाचवा.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 14 चित्रसंदेश

1. बसमधील सूचना व संदेशांचे वाचन करा.

प्रश्न 1.
बसमधील सूचना व संदेशांचे वाचन करा.

2. सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा.

प्रश्न 2.
सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा.
उत्तर:
1. पाण्याचा न्हास करी जीवनाचा हास.
2. रूळ ओलांडू नका, आयुष्य संपवू नका.

3. वर्गात भिंतीवर लिहिता येतील अशा सूचना तयार करा.

प्रश्न 3.
वर्गात भिंतीवर लिहिता येतील अशा सूचना तयार करा.
उत्तर:

  1. दररोज वर्ग स्वच्छ करावा.
  2. कचरा कचराकुंडीतच टाकावा.
  3. फळा दररोज स्वच्छ करावा.
  4. बाकावर व वर्गातील भिंतीवर लिहू नये.
  5. वर्गात शांतता राखावी.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 14 चित्रसंदेश

4. काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.

प्रश्न 1.
काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
उत्तर:
काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत, कारण त्या लोकांना सार्वजनिक मालमत्तेबद्दल काळजी नसते. आपल्या जीवाचीही ते पर्वा करत नाहीत ही माणसे सर्वस्वी बेजबाबदार असतात.

5. तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्यासूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.

प्रश्न 1.
तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्यासूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 14 चित्रसंदेश Additional Important Questions and Answers

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
चालत्या वाहनाविषयी काय सांगितले आहे?
उत्तर:
चालत्या वाहनात घाईघाईने चढू किंवा उतरू नये.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 14 चित्रसंदेश

प्रश्न 2.
चालत्या वाहनातून प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी?
उत्तर:
चालत्या वाहनातून हात बाहेर काढू नये व डोकावून पाहू नये ही खबरदारी घ्यावी.

प्रश्न 3.
प्रस्तुत पाठात कोणते दोन महत्त्वाचे संदेश दिले आहेत?
उत्तर:
1. विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे.
2. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.

प्रश्न 4.
कोणत्याही वाहनात काहीही खाल्ल्यास कचरा कुठे टाकावा?
उत्तर:
वाहनात काहीही खाल्ल्यास कचरा पुन्हा पिशवीत साठवावा व नंतर तो कचराकुंडीत टाकावा.

प्रश्न 5.
तुमचा मित्र वारंवार बसमधून हात बाहेर काढत असल्यास तुम्ही काय कराल?
उत्तर:
त्याला समजावू व तसे करण्यापासून थांबवू. त्याचे काय परिणाम होतील ते समजावू.

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
‘चित्रसंदेश’ या पाठात जी चित्रे दिली आहेत त्या चित्रांमधून कोणत्या सूचना व संदेश दिला आहे हे लिहा.
उत्तरः
‘चित्रसंदेश’ या पाठात जी चित्रे दिली आहेत, त्यात बसमधून बाहेर थुकू नये व बसमध्ये कचरा टाकू नये असा संदेश आहे. सार्वजिनक मालमत्तेचे नुकसान होईल असे वागू नये. त्याचप्रमाणे चालत्या वाहनात चढणे, उतरणे अथवा हात बाहेर काढणे यांमुळे आपल्या जीवाला धोका आहे, असे सांगितले आहे.

प्रश्न 2.
तुम्ही शाळेच्या बसमधून प्रवास करताना कोणती काळजी घ्याल?
उत्तरः
आम्ही शाळेच्या बसमधून प्रवास करताना खिडकीतून हात व डोकं बाहेर काढणार नाही. बसमध्ये दंगा-मस्ती करणार नाही.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 14 चित्रसंदेश

प्रश्न 3.
तुम्ही कोणकोणत्या वाहनांनी प्रवास केला आहे?
उत्तर:
आम्ही बस, रिक्क्षा, टॅक्सी, सायकल, मोटरसायकल, आगगाडी, बोट, जहाज या वाहनांनी प्रवास केला आहे.

प्रश्न 4.
वाहन चालवताना पाळावयाच्या नियमांबाबत सूचना लिहा.
उत्तर:

  1. सीटबेल्ट लावा.
  2. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका.
  3. ज्वलनशील पदार्थ गाडीत बाळगू नका.
  4. मोटरसायकल चालवताना हेल्मेट घाला.
  5. सिग्नल तोडू नका.

प्रश्न 5.
योग्य सूचनेसमोर (✓) अशी खूण करा.
उत्तरः

  1. चारचाकी चालताना सीट बेल्ट लावावा. [✓]
  2. बागेतील फुले तोडू नयेत. [✓]
  3. कचरा कचरांकुडींच्या बाहेर टाकावा. [×]
  4. वर्गाच्या भिंतीवर, बाकांवर, पेनाने लिहावे. [×]
  5. रस्त्याच्या मधोमध चालावे. [×]
  6. सार्वजनिक ठिकाणी थुकू नये. [✓]
  7. शाळेच्या आवारात फेरीवाल्यांना येण्यास मनाई आहे. [✓]
  8. विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. [✓]
  9. पाण्याचा वापर करून झाल्यावर नळ तसाच चालू ठेवावा. [×]
  10. घराबरोबरच आपला परिसरही स्वच्छ ठेवावा. [✓]

चित्रसंदेश Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

चित्रसंदेश या पाठात सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना कोणत्या गोष्टींचे पालन करावे, हे चित्रांसहित सूचना देऊन सांगितले आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 14 चित्रसंदेश

शब्दार्थ:

  1. धुंकणे – थुकी बाहेर टाकणे (to spit out)
  2. कचरा – केर (garbage)
  3. वाहन – प्रवासाचे साधन (vehicle)
  4. घाईघाईने – त्वरेने (hurriedly)
  5. धोक्याचे – भयावह (dangerous)
  6. प्रवास – पर्यटन, सफर (a journey)
  7. गुन्हा – अपराध (an offence, a crime)
  8. मन – चित्त (mind)
  9. उत्तम – अत्यंत चांगले, उत्कृष्ट (Best, excellent)