Maharashtra Board Text books

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 17 आमची सहल

5th Standard Marathi Digest Chapter 17 आमची सहल Textbook Questions and Answers

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
मुलांची सहल कोठे गेली होती?
उत्तर:
मुलांची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल

प्रश्न (आ)
सहलीला जाताना मुलांनी सोबत काय काय नेले होते?
उत्तर:
सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या सोबत नेल्या होत्या.

प्रश्न (इ)
बाईंनी आमराईचा कोणता अर्थ सांगितला?
उत्तर:
जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात, त्याला आमराई म्हणतात, असा बाईंनी आमराईचा अर्थ सांगितला.

प्रश्न (ई)
आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली?
उत्तर:
आमराईमध्ये मुले लपाछपी, शिवणापाणी, ऊनसावली असे खेळ खेळली.

2. ऊनसावली, शिवणापाणी यांसारखे तुम्ही कोणते खेळ खेळता त्यांची माहिती सांगा.

प्रश्न 1.
ऊनसावली, शिवणापाणी यांसारखे तुम्ही कोणते खेळ खेळता त्यांची माहिती सांगा.
उत्तरः
लगोरी, आंधळी कोशींबीर असे खेळ खेळतो. आंधळी कोशींबीर – एका मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला इतर खेळाडूंना पकडण्यास सांगण्यात येते. याला आंधळी कोशींबीर असे म्हणतात. इंग्लीश मध्ये याला Hide and Sick असे म्हणतात.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल

3. तुमच्या घरी आंबा व कैरी यांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात.

प्रश्न 1.
तुमच्या घरी आंबा व कैरी यांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात.
उत्तर:

  1. आंब्याचा मुरंबा
  2. चुंदा
  3. लोणचे
  4. मँगो आईस्क्रीम
  5. पन्हे
  6. कैरीची चटणी.

4. तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.

प्रश्न 1.
तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.

प्रश्न 2.
वाचा व लिहा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल 1

प्रश्न 3.
खाली दिलेली वाक्ये वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल 2

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 17 आमची सहल Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
एका शब्दात उत्तरे लिहा.

  1. मुलांनी कशाचा चट्टामट्टा केला?
  2. मुले घरी केव्हा परतली?
  3. रस्त्यावर काय पडली होती?
  4. सगळे एकत्र जेवले यासाठी कोणता शब्द वापरला आहे?

उत्तर:

  1. कैऱ्यांचा
  2. संध्याकाळी
  3. सावली
  4. सहभोजन
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल

प्रश्न 2.
कंसातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा.
(सायंकाळी, दाट, आमराईमध्ये, दाट, आनंदाने)

  1. आमची सहल गावच्या गेली होती.
  2. झाडांची ……………… सावली रस्त्यावर पडली होती.
  3. पक्षी ………………………. उडत होते.
  4. ………………………. आम्ही घरी परतलो.
  5. राई म्हणजे .झाडी.

उत्तर:

  1. आमराईमध्ये
  2. दाट
  3. आनंदाने
  4. सायंकाळी
  5. दाट

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
रस्त्याने जाताना बाईंनी कशाची माहिती सांगितली?
उत्तरः
रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली.

प्रश्न 2.
कोणकोणते पक्षी झाडांवर बसले हाते?
उत्तरः
पोपट, कोकीळ, चिमण्या, कावळे, साळुक्या हे पक्षी झाडांवर बसले होते.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल

प्रश्न 3.
सहलीहून आल्यावरसुद्धा मुलांना कसे वाटत होते?
उत्तरः
सहलीहून आल्यावरसुद्धा मुलांना खूप उत्साही, आनंदी व ताजेतवाने वाटत होते.

प्रश्न 4.
बाईंनी मुलांना कशातला फरक सांगितला?
उत्तर:
बाईंनी मुलांना कैरी व आंबा यांतील फरक सांगितला.

प्रश्न 5.
कच्च्या कैरीपासून काय काय करतात?
उत्तर:
कच्च्या कैरीपासून पन्हे, लोणचे, मोरंबा, चटणी इ. तयार करतात.

प्रश्न 6.
आंब्यापासून काय काय तयार करतात?
उत्तर:
आंब्यापासून आमरस, आमपोळी, जॅम, आंब्याचे सांदण इ. तयार करतात.

प्रश्न 7.
रिकाम्या जागा भरा.

  1. आम्ही रमतगमत झाडांचे ……………….. ” करत चाललो होतो.
  2. वाऱ्याने पडलेल्या ………… गोळा केल्या.
  3. आम्हाला खूप ………………….. ” , आनंदी व . वाटत होते.
  4. तेथे …………. खूप झाडे होती.
  5. चित्रकलेचे ……….. बरोबर घ्यायला सांगितले होते.
  6. त्याचा चालला होता.
  7. आम्ही …………. केले.

उत्तरः

  1. निरीक्षण
  2. कैऱ्या
  3. उत्साही, ताजेतवाने
  4. आंब्याची
  5. साहित्य
  6. किलबिलाट
  7. सहभोजन
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
मुलांनी कोणकोणती चित्रे काढली?
उत्तर:
आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो, कैऱ्यांनी लगडलेले आंब्याचे झाड, खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड, आमराई, कैऱ्या गोळा करणारी मुले, खेळणारी मुले अशी विविध प्रकारची चित्रे मुलांनी काढली.

प्रश्न 2.
मुलांनी आमराईत कोणकोणती मजा केली?
उत्तरः
मुलांनी आमराईत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा करून त्या खाल्ल्या. सहभोजन केले. वेगवेगळ्या प्रकारची चित्रेही काढली. पक्ष्यांची किलबिल ऐकली. निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला, अशाप्रकारे मुलांनी आमराईत मजा केली.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.

  1. सहल
  2. रस्ता
  3. मुलगा
  4. सकाळ
  5. आनंद
  6. वारा
  7. पोपट
  8. घर
  9. दिवस
  10. उत्साही
  11. फरक
  12. थकवा

उत्तर:

  1. पर्यटन
  2. मार्ग
  3. बालक
  4. प्रभात
  5. हर्ष
  6. पवन, वायू
  7. राघू
  8. सदन
  9. दिन
  10. आनंदी
  11. भेद
  12. अशक्तपणा
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. गाव
  2. दाट
  3. सावली
  4. सकाळ
  5. आनंद
  6. दिवस
  7. उत्साही
  8. फरक
  9. उलट
  10. लांब
  11. आंबट

उत्तर:

  1. शहर
  2. विरळ
  3. ऊन
  4. संध्याकाळ
  5. दु:ख
  6. रात्र
  7. अनुत्साही, निरुत्साही
  8. साम्य
  9. सुलट
  10. जवळ
  11. गोड

प्रश्न 3.
लिंग बदला.

  1. बाई
  2. मुले.
  3. पोपट
  4. कोकीळ
  5. कावळी
  6. शिक्षक
  7. डबा

उत्तर:

  1. गुरुजी
  2. मुली
  3. मैना
  4. कोकीळा
  5. कावळा,
  6. शिक्षिका
  7. डबी

प्रश्न 4.
वचन बदला.

  1. सहल
  2. झाड
  3. रस्ता
  4. पक्षी
  5. आंबा
  6. चित्र
  7. सावली
  8. कैऱ्या
  9. चित्रे
  10. डबे
  11. बाटल्या
  12. आमराई
  13. नाव

उत्तर:

  1. सहली
  2. झाडे
  3. रस्ते
  4. पक्षी
  5. आंबे
  6. चित्र
  7. सावल्या
  8. कैरी
  9. चित्र
  10. डबा
  11. बाटली
  12. आमराया
  13. नावे
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल

उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
सर्वांनी सहलीला कुठे जाण्याचे ठरवले?
उत्तर:
सर्वांनी सहलीला महाबळेश्वरला जाण्याचे ठरवले.

प्रश्न 2.
सहलीला कोणकोण आले होते?
उत्तर:
सहलीला वर्ग मित्र, मैत्रिणी, शिक्षक सर्व आले होते.

प्रश्न 3.
महाबळेश्वर येथे कोणकोणते पॉईंट बघितले?
उत्तर:
महाबळेश्वर येथे सनराईज पॉईंट, मंकी पॉईंट, एको पॉईंट, सनसेट पॉईंट इ. पॉईंट पाहिले.

प्रश्न 4.
कोणत्या नद्यांचे दर्शन घेतले?
उत्तर:
महाराष्ट्रातील कृष्णा व कोयना या नदयांचे दर्शन घेतले.

प्रश्न 5.
महाबळेश्वरला कोणते मंदिर पाहिले?
उत्तर:
महाबळेश्वरला कृष्णामाईचे रमणीय मंदिर पाहिले.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल

प्रश्न 6.
सहलीला कोणत्या तलावात बोटीने जलविहार केला?
उत्तर:
सहलीला वैण्णा तलावात बोटीने जलविहार केला.

आमची सहल Summary in Marathi

पदयपरिचय:

शाळेची सहल गावाच्या आमराईमध्ये गेली होती. सहलीला केलेल्या मजेचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 17 आमची सहल

शब्दार्थ:

  1. सहल – पर्यटन (a trip)
  2. गाव – ग्राम (a village)
  3. आमराई – आंब्यांच्या झाडांची बाग (meango grove)
  4. दाट – घनदाट, खूप झाडी (thick, dense)
  5. सावली – छाया (shadow)
  6. रमतगमत – मजा करत (enjoying)
  7. लपाछपी – (hide and sick)
  8. कैरी – कच्चा आंबा (a raw mango)
  9. आंबा – पिकलेला आंबा (a ripe mango)
  10. सहभोजन – एकत्र जेवणे (eating food together)
  11. फरक – भेद (difference)