Maharashtra Board Text books

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी

5th Standard Marathi Digest Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी Textbook Questions and Answers

1. कोण ते लिहा.

प्रश्न 1.
कोण ते लिहा.
(अ) बागेत स्वच्छंदपणे फिरणारे
(आ) कामात मग्न असणारी
(इ) थुईथुई नाचणारे
उत्तर:
(अ) फुलपाखरू
(आ) मधमाशी
(इ) कारंज

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी

2. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. सुंदर(अ) मध
2. औषधी(आ) सुवास
3. मंद(इ) सकाळ
4. दरवळणारा(ई) वारा

उत्तरः

‘अ’ गट‘ब’ गट
1. सुंदर(इ) सकाळ
2. औषधी(अ) मध
3. मंद(ई) वारा
4. दरवळणारा(आ) सुवास

3. तुम्हांला काय पाहिल्यानंतर आनंद होतो?

प्रश्न 1.
तुम्हांला काय पाहिल्यानंतर आनंद होतो?
उत्तरः
सकाळी बागेत गेल्यावर, सूर्याची कोवळी किरणे गवतावर पडून त्यावरील पाणी/दवबिंदू जेव्हा चमकताना दिसतात तेव्हा त्याने मनाला आनंद होतो. मंद वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलणारी फुलझाडं व त्यावरील कळ्या, फुले पाहून मन आनंदीत होते. विविध प्रकारची फुलपाखरे, सुंदर फुलांवर उडताना पाहिल्यावर मन सुखावते. सकाळच्या अशा अनुभवाने मनाला आनंद होतो व मन प्रसन्न होते.

4. एक, मध यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा.

प्रश्न 1.
एक, मध यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा.
उत्तर:
बघ, पण, धन, तर, मन

5. खालील शब्दांना ‘दार’ शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

प्रश्न 1.
खालील शब्दांना ‘दार’ शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट – ऐटदार.
चमक, दुकान, माल, चोप, भाल, खास, आम, गमती, रुबाब, वजन.

  1. चमक
  2. दुकान
  3. माल
  4. चोप
  5. भाल
  6. खास
  7. आम
  8. गमती
  9. रुबाब
  10. वजन

उत्तर:

  1. चमकदार
  2. दुकानदार
  3. मालदार
  4. चोपदार
  5. भालदार
  6. खासदार
  7. आमदार
  8. गमतीदार
  9. रुबाबदार
  10. वजनदार

6. खालील शब्दांना ‘पणा’ शब्द जोडून नवीन शब्द बनले आहेत. वाचा. शब्द वापरून वाक्ये लिहा.
चांगुलपणा, मोठेपणा, लहानपणा, वेगळेपणा, मोकळेपणा, सोपेपणा, कठीणपणा.

उपक्रम:
1. फुलपाखरांविषयीच्या कविता मिळवा. वर्गात म्हणून दाखवा.
2. फुलपाखरांची चित्रे मिळवा. वहीत चिकटवा.

वाचा. लक्षात ठेवा:

फुलपाखरे नाजूक असतात.
त्यांना पकडू नका. इजा करू नका.

ओळखा पाहू!

उंचाडी मान, फताडे पाय,
वाळवंटात डुगडुग जाय.

7. कुंडीवरील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पानांवर आहेत, योग्य जोड्या जुळवा व लिहा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी 1

8. खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व लिहा.

प्रश्न 1.
खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व लिहा.
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी 2
उत्तरः
पुरणपोळी, गोडधोड, गोरगरीब, खाऊनपिऊन, इकडेतिकडे, कामधाम

9. खाली दिलेले पाठ क्र. 1 ते 15 मधील नवीन शब्द व त्यांचे अर्थ वाचा. याचप्रमाणे इतर पाठांतील नव्याने परिचित झालेल्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन तुमचा शब्दसंग्रह तयार करा.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 28 फुलपाखरू आणि मधमाशी Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
कोण ते लिहा.

  1. बागेत सुंदर दिसणारी
  2. सर्वत्र दरवळणारा
  3. रम्य अशी ती
  4. मंद वाहणारा
  5. औषधी असणारे

उत्तर:

  1. फुलझाडे
  2. सुवास
  3. सकाळ
  4. वारा
  5. मध

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
या पाठातील संवाद कोणाकोणात व कुठे झाला आहे?
उत्तर:
या पाठातील संवाद मधमाशी व फुलपाखरू यांच्यात एका बागेत झाला आहे.

प्रश्न 2.
फुलपाखरू मधमाशीला कुठे गप्पा मारायला बोलवत आहे?
उत्तरः
फुलपाखरू मधमाशीला गुलाबाच्या फांदीवर गप्पा मारायला बोलवत आहे.

प्रश्न 3.
मधमाशी बाहेर कशासाठी आली आहे?
उत्तर:
मधमाशी बाहेर मध गोळा करण्यासाठी आली आहे.

प्रश्न 4.
फुलपाखराला कोणती गोष्ट आवडत नाही?
उत्तरः
मधमाशीला त्याच्याबरोबर गप्पा मारायला वेळ नाही, ह गोष्ट फुलपाखराला आवडत नाही.

प्रश्न 5.
कोणत्या गोष्टीत आनंद असतो, असे मधमाशी म्हणते.
उत्तरः
कामात मग्न राहण्यात आनंद असतो, असे मधमाशी म्हणते.

प्रश्न 6.
फुलपाखराने मधमाशीचा कोणता गुण सांगितला आहे?
उत्तरः
मधमाशी इतरांना मोठेपणा देते हा तिचा गुण फुलपाखराने सांगितला आहे.

प्रश्न 7.
मधमाशीने फुलपाखराचा कोणता गुण सांगितला आहे?
उत्तरः
फुलपाखराचे विचार खूप चांगले आहेत. त्यामुळे त्याला ‘सगळेच चांगले दिसते’ हा फुलपाखराचा गुण मधमाशीने सांगितला आहे.

प्रश्न 8.
मधमाशीला मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं?
उत्तरः
मधमाशीला मध गोळा करण्याचं काम राणीमाशीने दिलं.

प्रश्न 9.
पुढील प्राण्यांचे कंसात दिलेले गुण निवडून लिहा. (प्रयत्नशील, कामसू, इमानदार, लबाड, दयाळू, चपळता, वेगवान, मेहनती)

  1. घोडा
  2. कोळी
  3. मासे
  4. मधमाशी
  5. चिमणी
  6. कुत्रा
  7. गाय
  8. कोल्हा

उत्तर:

  1. वेगवान
  2. प्रयत्नशील
  3. चपळता
  4. कामसू
  5. मेहनती
  6. इमानदार
  7. दयाळू
  8. लबाड

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
फुलपाखराने आणि मधमाशीने सकाळचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे?
उत्तरः
फुलपाखरू आणि मधमाशी एका सकाळी बागेत भेटले. फुलपाखरू म्हणाले, “आजची सकाळ किती सुंदर आहे. बागेतील फुलझाडं किती सुंदर दिसत आहेत. फुलांचा सुवास सर्वत्र दरवळत आहे.” तर मधमाशी म्हणाली, “कारंजे थईथुई नाचत आहे, मंद वारा सुटला आहे. सगळं कसं छान वाटतंय.” फुलपाखरू व मधमाशीने सकाळचे वर्णन या शब्दांत केले आहे.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
खालील शब्दार्थांचा अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करा.
उत्तरः
1. सवड – आवडत्या कामासाठी आपल्याला सवड मिळते.
2. मग्न – देवज्ञ अभ्यासात मग्न होता.
3. स्वच्छंदपणे – मुलांना स्वच्छंदपणे फिरून दयाव.

प्रश्न 2.
‘दार’ शब्द जोडा व नवीन शब्द तयार करा.

  1. बलुते
  2. मामले
  3. किल्ला

उत्तर:

  1. बलुतेदार
  2. मामलेदार
  3. किल्लेदार

प्रश्न 3.
‘पणा’ शब्द जोडून नवीन शब्द बनवा व वाक्ये तयार करा.
उत्तर:

  1. चांगुल – चांगुलपणा – चांगुलपणा हा प्रत्येकात हवा.
  2. मोठे – मोठेपणा – मनाचा मोठेपणा काहीजणांकडेच असतो.
  3. लहान – पणा – लहानपणा – लहानपणीचा काळ सुंदर असतो.
  4. वेगळे – वेगळेपणा – आपल्या प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा हवा.
  5. मोकळे – मोकळेपणा – मैत्रीमध्ये मोकळेपणाशिवाय बोलता येत नाही.
  6. सोपे – सोपेपणा – अभ्यासात सोपेपणा येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. सकाळ
  2. बाग
  3. सुवास
  4. मंद
  5. मजा
  6. मध
  7. मन
  8. सवड

उत्तरः

  1. प्रभात
  2. उदयान, उपवन
  3. सुगंध
  4. हळू
  5. मौज
  6. मकरंद
  7. चित्त
  8. वेळ

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. मोठेपणा
  2. चांगुलपणा
  3. सुख
  4. गुण
  5. सुंदर
  6. घाई
  7. शेवट
  8. मोठा
  9. अनेक
  10. उत्तर
  11. फिकट
  12. हारणे
  13. खाली

उत्तरः

  1. क्षुद्रपणा
  2. वाईटपणा
  3. दुःख
  4. अवगुण
  5. कुरूप
  6. निवांत
  7. सुरुवात
  8. लहान
  9. एक
  10. प्रश्न
  11. रंगीत
  12. जिंकणे
  13. वर

प्रश्न 6.
वचन बदला.

  1. कारंजा
  2. वारा
  3. फांदी
  4. मधमाशी
  5. फुलपाखरू
  6. माणूस
  7. डोळा

उत्तरः

  1. कारंजे
  2. वारे
  3. फांदया
  4. मधमाशा
  5. फुलपाखरे
  6. माणसे
  7. डोळे

फुलपाखरू आणि मधमाशी Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

‘बाळ गाडगीळ’ लिखित या पाठात फुलपाखरू आणि मधमाशी यांच्यातील संवाद सुंदरपणे चित्रित झाला आहे. दोघेही एकमेकांमध्ये चांगलेच गुण बघतात एकमेकांना मोठेपणा देतात, हे या पाठात दिसून येते.

शब्दार्थ:

  1. सकाळ – प्रभात (morning),
  2. स्वच्छंद – मुक्तपणे (freely),
  3. मध – फुलांतून मिळणारा रस (honey)
  4. सुंदर – मनोहर (beautiful)
  5. कारंजे – पाण्याचा फवारा (fountain)
  6. सुवास – सुगंध (fragrance)
  7. दरवळणे – पसरणे (to be diffused widely)
  8. दूर – लांब.
  9. निरखून पाहणे- लक्षपूर्वक पाहणे.
  10. मोहक – सुंदर
  11. तुडुंब भरणे – काठोकाठ भरणे.
  12. जाहली – झाली.
  13. आणिक – आणि.
  14. बटबटीत – मोठाले, विद्रूप.
  15. ध्यान – विशिष्ट रूप.
  16. गाठणे – पोहचणे.
  17. अपुला – आपला, स्वतःचा.
  18. कांती – तेज.
  19. प्रभातकाळ – पहाट, सूर्योदयाचा काळ.
  20. संध्यासमयी – संध्याकाळी.
  21. न्हाऊ घालणे – अंघोळ घालणे.
  22. झूल – बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत व नक्षीदार कापड.
  23. बाशिंग – बैलांच्या डोक्याला बांधण्याचे आभूषण.
  24. दिन – दिवस.
  25. धाडधाड्आपटणे – जोरजोरात आदळणे.
  26. पाऊसधोऽधोऽ कोसळणे-खूप जोराचा पाऊस पडणे.
  27. गुणगुणणे – हळू आवाजात गाणे.
  28. पानांआड – पानांमागे.
  29. बिलगणे – प्रेमाने मिठी मारणे.
  30. मंजूळ – ऐकायला गोड.
  31. तीर – काठ.
  32. लता-वेल.
  33. वृक्ष- झाड.
  34. सुमन- फूल.
  35. लव्हाळी – पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती.
  36. आम्रतरू – आंब्याचे झाड.
  37. शीतल-थंड.
  38. घट – मातीचा घडा (माठ).