5th Standard Marathi Digest Chapter 4 हि पिसे कोणाची Textbook Questions and Answers
1. उत्तरे सांगा.
प्रश्न 1.
(अ) मिनूचे घर कोठे होते?
(आ) मिनू कोणाकोणाला भेटली?
(इ) मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला?
(ई) पिसे कोणाची होती?
(उ) मिनूने बदकाला काय सांगितले?
उत्तर:
(अ) मिनूचे घर शेतात होते.
(आ) मिनू कोंबडीताई, कबुतरदादा, मोर व शेवटी बदकाला भेटली.
(इ) मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला.
(ई) पिसे बदकाची होती.
(उ) मिनूने बदकाला सांगितले की, “तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसं.”
2. रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे ‘✓’ अशी खुण करा.
प्रश्न 1.
पिसे सापडल्यावर मिनूला ……………………………..
उत्तर:
(अ) पिसे कोणाची आहेत हे माहीत करून घ्यायचे होते. [✓ ]
(ब) पिसे घरी न्यायची होती. [ ]
3. जोड्या जुळवा.
प्रश्न 1.
जोड्या जुळवा.
उत्तर:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. बदक | (अ) झाड |
2. कोंबडी | (आ) नदी |
3. कबुतर | (इ) खुराडे |
4. उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
प्रश्न 1.
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे शब्दांना प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदाहरणे – घर – घरापासून, घर – घराजवळ, खुराडे – खुराड्यात
- गाव
- तळे
- पाय
- घरटे
उत्तर:
- गावापासून
- तळ्यात
- पायात
- घरट्यात
5. तुम्हांला वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय कराल?
प्रश्न 1.
तुम्हांला वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय कराल?
उत्तरः
आम्हांला वर्गात एखादी वस्तू सापडली तर ती कोणाची आहे हे आम्ही शोधू व ती वस्तू ज्या कोणाची असेल त्याच्या ताब्यात देऊ.
उपक्रम:
तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग यांची माहिती लिहा.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 4 हि पिसे कोणाची Additional Important Questions and Answers
1. उत्तरे सांगा.
प्रश्न 1.
मिनूचे घर कोठे होते?
उत्तर:
मिनूचे घर शेतात होते.
प्रश्न 2.
पिसे पाहून मिनूच्या मनात कोणता विचार आला?
उत्तर:
पिसे पाहून मिनूच्या मनात विचार आला की, ही पिसे नक्कीच कोंबडीची असतील.
प्रश्न 3.
कोंबडी कुठे जाऊन बसली?
उत्तर:
कोंबडी खुराड्यात जाऊन बसली.
प्रश्न 4.
कबुतर कोणत्या रंगाचे होते?
उत्तर:
कबुतर पांढऱ्या-करड्या रंगाचे होते.
प्रश्न 5.
मोराची चाल कशी होती?
उत्तर:
मोराची चाल ऐटदार होती.
प्रश्न 6.
मोराचा पिसारा कसा होता?
उत्तर:
मोराचा पिसारा रंगीबेरंगी लांबसडक मोहक असा होता.
प्रश्न 7.
बदक कुठे होते?
उत्तर:
बदक नदीकिनारी असलेल्या झाडीत होते.
पुढील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा.
प्रश्न 1.
- कोण खेळता-खेळता घरापासून खूप दूर गेली?
- मिनूला कबुतर कोठे दिसले?
- पिसारा सावरत कोण येत होता?
- दाट झाडी कुठे होती?
- कोणाला मिनूचे कौतुक वाटले?
उत्तर:
- मिनू
- झाडावर
- मोर
- नदीकिनारी
- बदकाला
रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे ‘✓’ अशी खुण करा.
प्रश्न 1.
मिनूचे घर ………………………
उत्तर:
(अ) नदीजवळ होते [ ]
(ब) शेतात होते [✓]
प्रश्न 2.
नदीकिनारी
उत्तर:
(अ) दाट झाडी होती. [✓]
(ब) गर्दी होती. [ ]
प्रश्न 3.
बदकाला मिनूचे
उत्तर:
(अ) कौतुक वाटले. [✓]
(आ) राग आला [ ]
प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
- मिनूला ……………….. पिसे दिसली. (दोन / तीन)
- नदी किनारी ……………. झाडी होती. (विरळ / दाट)
- बदक …………………….. बाहेर आले. (झाडीतून / जंगलातून)
- मिनू …………………….घरी आली. (खुशीने / आनंदाने)
- बदकाने दिलेली पिसे मिनूने आपल्या ……………………. ठेवली. (वहीत / कंपासपेटीत)
- कोंबडीने पिसांकडे ……………………. पाहिले. (निरखून / रागाने)
उत्तरः
- दोन
- दाट
- झाडीतून
- आनंदाने
- वहीत
- निरखून
प्रश्न 5.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. चिमणी | |
2. मधमाशी |
उत्तरः
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. चिमणी | (अ) मधमाशीचे पोळे |
2. मधमाशी | (आ) घरटे |
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
बदक मिनूला काय म्हणाले?
उत्तरः
बदक मिनूला म्हणाले की, “मिनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली, की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव.”
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1.
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे शब्दांना प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदाहरणे – घर – घरापासून, खुराडे – खुराड्यात
1. हात
2. नदी
उत्तर:
1. हातात
2. नदीजवळ
प्रश्न 2.
समानार्थी शब्द लिहा.
- घर
- दूर
- शेत
- झाड
- ऐट
- मोहक
- आभार
- नदी
- मोर
- हर्ष
उत्तरः
- गृह, सदन
- लांब
- शिवार
- वृक्ष, तरू
- रुबाब
- आकर्षक
- धन्यवाद
- सरिता
- मयुर
- आनंद
प्रश्न 3.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- खूप
- दूर
- बसली
- पांढरे
- दाट
- जोडणे
- आवडणे
- पुढे
- आनंद
उत्तरः
- कमी
- जवळ
- उठली
- काळे
- विरळ
- तुटणे
- नावडणे
- मागे
- दुःख
प्रश्न 4.
वचन बदला.
- शेत
- पिसे
- कोंबडी
- खुराडे
- पिसारा
- पत्ता
- नदी
- हाक
- घर
- वही
उत्तर:
- शेते
- पिस
- कोंबड्या
- खुराडी
- पिसारे
- पत्ते
- नदया
- हाका
- घरे
- वया
प्रश्न 5.
लिंग बदला.
- कोंबडी
- मोर
- दादा
उत्तरः
- कोंबडा
- लांडोर
- ताई
प्रश्न 6.
खाली दिलेल्या प्राण्यांच्या घरांना काय म्हणतात ते लिहा.
- घोडा
- साप
- वाघ, सिंह
- गाय
उत्तरः
- तबेला
- बिळ
- गुहा
- गोठा
प्रश्न 7.
खाली दिलेल्या प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात ते लिहा.
- घोडा
- वाघ
- सिंह
- गाय
- म्हैस
- कुत्रा
उत्तरः
- शिंगरू
- बछडा
- छावा
- वासरू
- पारडू
- पिल्लू
खेळूया शब्दांशी Summary in Marathi
पाठ्यपरिचय:
मिनू नावाची छोटी मुलगी होती. तिला मिळालेली पिसे कोणाची आहेत हे शोधण्यासाठी तिने केलेली धडपड, सगळ्या पक्ष्यांशी तिचा झालेला संवाद व ती पिसे बदकाची आहेत हे कळल्यावर तिला झालेला आनंद या सर्वांचे वर्णन या पाठात आले आहे.
शब्दार्थ:
- घर – गृह (House)
- खेळणे – (To Play)
- दूर – लांब (To far)
- पिसे – पर (feathers)
- कोबंडी – (Hen)
- निरखणे – बारकाईने पाहणे (To observe)
- खुराडे – कोंबडीचे घर (Hen’s House)
- करडा – राखाडी (Grey)
- कबुतर – (Pigeon)
- ऐटदार – रुबाबदार (of smart appearance)
- मोहक – आकर्षक (attractive)
- बदक – (Duck)
- पत्ता – (Address)
- आभार- धन्यवाद (Thanks)
- नदी – (River)
- दाट – घट्ट (dense, thick)
- हाक मारणे – साद घालणे (To call)
- शोधणे – (To find out)
- कौतुक – प्रशंसा (admire)
- गळून पडणे – (To fall)
- जोडणे – (To Join)
- वेगवेगळी – विविध (Variety of)
- सांभाळणे – (To take care of)
- वही – (a notebook)