5th Standard Marathi Digest Chapter 6 ऐकुया खेळूया Textbook Questions and Answers
1. ऐका. चित्रे पाहा. कृती करा.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 6 ऐकुया खेळूया Additional Important Questions and Answers
प्रश्न 1.
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. 9 वरील चित्र पाहून खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दांत लिहा.
- पहिल्या चित्रातील मुलगी काय करताना दिसत आहे ?
- दुसऱ्या चित्रातील मुलगा व मुलगी कोणाप्रमाणे उडी मारणार आहेत?
- चित्रात किती शंकू आहेत?
- कोणासारखे तीन मीटर चाला असे म्हटले आहे?
- भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तर:
- धावताना
- बेडकाप्रमाणे
- तीन
- हत्तीसारखे
- हॉकी
2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
‘ऐकूया, खेळूया’ या पाठात एकूण किती चित्रे आहेत?
उत्तर:
‘ऐकूया, खेळूया’ या पाठात एकूण आठ चित्रे आहेत.
प्रश्न 2.
शाळेच्या मैदानावर काय करण्यास सांगितले आहे?
उत्तर:
शाळेच्या मैदानावर पन्नास मीटर धावण्यास सांगितले आहे.
प्रश्न 3.
एका जागी किती उंच उड्या मारण्यास सांगितल्या आहेत?
उत्तर:
एका जागी पाच उंच उड्या मारण्यास सांगितल्या आहेत.
प्रश्न 4.
चार उड्या कोणत्या प्रकारे मारण्यास सांगितल्या आहेत?
उत्तर:
चार कोलांट्या उड्या मारण्यासांगितल्या आहेत.
प्रश्न 5.
शिडी कुठे ठेवली आहे?
उत्तर:
शिडी जमिनीवर ठेवली आहे.
प्रश्न 6.
जमिनीवरील शिडीतून कसे धावण्यास सांगितले आहे?
उत्तर:
जमिनीवरील शिडीच्या चौकोनातून धावण्यास सांगितले आहे.
प्रश्न 7.
पाठ्यपुस्तकातील चित्रांमध्ये उड्यांचे कोणते प्रकार सांगितले आहेत?
उत्तर:
बेडूक उडी, उंच उडी, कोलांट्या उड्या, दोरी उडी.
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
तुमच्या शाळेच्या क्रीडामहोत्सवात कोणकोणत्या क्रीडास्पर्धांचा समावेश केला जातो?
उत्तर:
कबड्डी, खो-खो, क्रिकेट, धावण्याची शर्यत, लंगडी, गोळा फेक इ.
प्रश्न 2.
नियमित मैदानी खेळ खेळल्याने कोणते फायदे होतात?
उत्तर:
1. नियमित खेळ खेळल्याने शारीरिक व्यायाम होतो.
2. आरोग्य चांगले राहते.
प्रश्न 3.
खालील चित्रे पाहून चित्रातील खेळ ओळखा.
उत्तरः
- धावणे
- लंगडी
- कबड्डी
- खो-खो
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- शाळा
- मैदान
- हत्ती
- जमीन
- दोरी
उत्तरः
- विदयालय, विद्यामंदिर
- क्रिडांगण
- गज
- धरणी
- दोर
प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- धावणे
- जाणे
- चालणे
- जमीन
- एक
उत्तरः
- थांबणे
- येणे
- धावणे
- आकाश
- अनेक
प्रश्न 3.
खालील शब्दांचे वचन बदला.
- ऐकुया खेळूयामैदान
- बेडूक
- उड्या
- कोलांट्या
- शिडी
- दोरी
उत्तर:
- मैदान
- बेडूक
- उडी
- कोलांटी
- शिड्या
- दोऱ्या
ऐकुया खेळूया Summary in Marathi
पदयपरिचय:
आजच्या तंत्रयुगात मुलांचा बौद्धिक, सामाजिक विकास तर होत असतोच पण त्याबरोबर मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी ‘ऐकूया, खेळूया’ या पाठातून मैदानी खेळांची ओळख करून दिली आहे.
शब्दार्थ:
- शाळा – विदयालय (school)
- मैदान – क्रिडांगण (ground)
- धावणे – पळणे (to run)
- बेडूक – (frog)
- उड्या – (jump)
- शंकू – (cone)
- हत्ती – गज (elephant)
- चाल – (to walk)
- एका जागी – (at one place)
- उंच – (high up)
- कोलांटी उडी – (upside down jump)
- जमिन – धरती (land)
- शिडी – जिना (ladder)
- दोरीवरील उड्या – एक प्रकारचा खेळ (skiping jumps)