5th Standard Marathi Digest Chapter 9 सिंह आणि बेडूक Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
ऐका, वाचा, लक्षात घ्या.
एका …………………. एक राहायचा. त्याला त्या ……………………. कंटाळा आला आणि तो नव्या …………………. राहायला गेला. एकदा ……………… मोठ्याने गरजला. त्या …………….. अनेक ………………… तसेच काही बेडूकही राहात होते. त्यांनी यापूर्वी …………….. पाहिले नव्हते. त्यांचा ……………….. पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. आता मीही मोठा आज काढतो. ..मोठा आवाज काढला. …………… हा आवाज नवीन होता …………………. वाटले, कोणीतही आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. ……….. आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला ……………………. मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. ……………….. त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. ………………. वेगाने पुढे सरकला ……………….. डोक्यावर पाय दिला गयावया करू लागला. ……………………….. त्याला सोडून दिले.
उत्तर:
एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहात होते. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. आता मीही मोठा आज काढतो.
बेडकाने मोठा आवाज काढला. सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले, कोणीतही आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले.
1. या गोष्टीतील प्राण्यांची नावे लिहा.
प्रश्न 1.
या गोष्टीतील प्राण्यांची नावे लिहा.
उत्तरः
सिंह, बेडूक.
2. सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण ते सांगा.
प्रश्न 1.
सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण ते सांगा.
उत्तरः
सिंह
3. खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते कंसातून शोधून लिहा.
प्रश्न 1.
गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहीत करून घ्या. आवाज काढून दाखवा.
उत्तरः
- डरकाळी
- भुंकणे
- चीत्कार
- म्याँव – म्याँव
- हंबरणे
- बें-बें
- खिंकाळणे
- कुईकुई
खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते वाचा.
(अ) वाघाची – डरकाळी
(आ) हत्तीचा – चीत्कार
(इ) गाईचे – हंबरणे
(ई) बकरीचे – बें-बें
(उ) घोड्याचे – खिंकाळणे
(ऊ) कुत्र्याचे – भुंकणे
चित्रसंदेश:
1. ऐका, वाचा.
2. वाचा. लक्षात ठेवा.
वरील संदेशात ‘पाटी’ हा शब्द दोन अर्थांनी आला आहे.
पाटी – 1. टोपली. 2. ज्यावर लिहिले जाते ती.
संदेश – मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको, हातात पाटी दया, म्हणजे मुलामुलींना शिकवा.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 9 सिंह आणि बेडूक Additional Important Questions and Answers
प्रश्न 1.
एका शब्दात उत्तरे लिहा.
- सिंहाच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात?
- सिंहाच्या ओरडण्याला काय म्हणतात?
- सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात?
- पाठातील सिंह कोठे राहत होता?
- बेडूक कसा ओरडतो?
- कोणी आपली गर्जना थांबवली?
- सिंहाने कोणाला सोडून दिले?
उत्तरः
- गुहा
- गर्जना
- छावा
- जंगलात
- डराव डराव
- सिंहाने
- बेडकाला
2. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
सिंह नव्या जंगलात राहायला का गेला?
उत्तरः
सिंहाला जुन्या जंगलात राहायचा कंटाळा आला होता.
प्रश्न 2.
जंगलात कोण-कोण राहत होते?
उत्तर:
जंगलात पशु-पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते.
प्रश्न 3.
बेडकांचा पुढारी काय म्हणाला?
उत्तर:
कुणीतरी मोठा आवाज काढत आहे. मीही त्याच्याप्रमाणेच मोठा आवाज काढतो, असे बेडकांचा पुढारी म्हणाला.
प्रश्न 4.
बेडूक गयावया का करू लागला?
उत्तर:
सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला, म्हणून बेडूक गयावया करू लागला.
प्रश्न 5.
सिंहाने आपली गर्जना का थांबवली?
उत्तर:
कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे. आपण वेळीच सावध व्हावं, या विचाराने सिंहाने आपली गर्जना थांबवली.
प्रश्न 6.
बेडकाने या अगोदर कोणाला पाहिले नव्हते?
उत्तर:
बेडकाने या अगोदर सिंहाला पाहिले नव्हते.
3. थोडक्यात उत्तर लिहा.
प्रश्न 1.
सिंह व बेडकाच्या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ते लिहा.
उत्तरः
स्वत:ची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी कोणालाही आव्हान देऊ नये, त्याने आपलेच नुकसान होते हे सिंह व बेडकाच्या गोष्टीतून शिकलो.
प्रश्न 2.
खाली दिलेल्या चित्रांसाठी कंसातील शब्द वापरूनकथा पूर्ण करा. (मुलगा, म्हाताऱ्या आजीबरोबर, झोपडीत, वर्तमानपत्रे, बागेला, म्हातारी आजी, भांडी, पाकीट, वर्गशिक्षकांकडे, पोलीस स्टेशनला, पोलीसांनी, फोन, पाकिट मालकाने, बक्षीस)
सदा नावाचा एक होता. तो एका राहत होता. त्याला अभ्यास करणे खूप आवडायचे. काही झाले तरी भरपूर शिकायचे, असे त्याने ठरवले. सदा रोज सकाळी टाकायला जायचा. संध्याकाळी दोन घरी पाणी घालायचा. चार घरची घासायची. एक दिवस सदा दुपारी शाळेत जात असताना त्याला रस्त्यावर एक सापडले. सदाने ते पाकीट जसेच्या तसे दिले. शिक्षकाने ते पाकीट बघितले. त्यावर मालकाचा पत्ता, नाव होते. शिक्षक सदाबरोबर गेले व ते पाकीट पोलिसांना दिले. लगेच फोन करून मालकाला बोलावले. व त्यांचे पाकीट त्यांना परत देऊन टाकले. सदाला शाबासकी दिली. त्याला दिले व सदाची शिक्षणाची सर्व जबाबदारी धनिकाने स्विकारली. त्यामुळे सदाचे स्वप्न पूर्ण झाले.
उत्तरः
सदा नावाचा एक मुलगा होता. तो म्हाताऱ्या आजीबरोबर एका झोपडीत राहत होता. त्याला अभ्यास करणे खूप आवडायचे. काही झाले तरी भरपूर शिकायचे, असे त्याने ठरवले. सदा रोज सकाळी वर्तमानपत्रे टाकायला जायचा. संध्याकाळी दोन घरी बागेला पाणी घालायचा.म्हातारी आजी चार घरची भांडी घासायची. एक दिवस सदा दुपारी शाळेत जात असताना त्याला रस्त्यावर एक पाकीट सापडले. सदाने ते पाकीट जसेच्या तसे वर्गशिक्षकांकडे दिले.
शिक्षकाने ते पाकीट बघितले. त्यावर मालकाचा पत्ता, नाव होते. शिक्षक सदांबरोबर पोलीस स्टेशनला गेले व ते पाकीट पोलिसांना दिले. पोलीसांनी लगेच फोन करून मालकाला बोलावले. व त्यांचे पाकीट त्यांना परत देऊन टाकले. पाकिट मालकाने सदाला शाबासकी दिली. त्याला बक्षीस दिले व सदाची शिक्षणाची सर्व जबाबदारी धनिकाने स्विकारली. त्यामुळे सदाचे स्वप्न पूर्ण झाले.
प्रश्न 3.
खालील चित्र पाहा व कंसात दिलेल्या योग्य शब्दांची जोडी वापरून चित्राखाली दिलेले संदेश पूर्ण करा.
(वृक्ष – शान, प्लॅस्टीकची पिशवी – कापडी पिशवी, वेगाला – जीवाला, इंधनाची – देशाची, कचरा – आरोग्याची)
उत्तरः
- प्लॅस्टीकची पिशवी – कापडी पिशवी
- इंधनाची – देशाची
- कचरा – आरोग्याची
- वृक्ष – शान (५) वेगाला – जीवाला
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.
- जंगल
- सिंह
- नवे
- पशू
- पक्षी
- आवाज
- शांत
- कंटाळा
- पुढारी
- पाय
- सावध
- बेडूक
उत्तर:
- वन, रान
- वनराज
- नूतन
- प्राणी, जनावरे
- खग, विहंग
- ध्वनी
- निमूट
- आळस
- नेता
- चरण
- सज्ज
- मंडूक
प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- कंटाळा
- नव्या
- पूर्वी
- सावध
- एक
- पुढारी
- शांत
- वेगाने
- पुढे
- मोठा
- उत्साह
उत्तरः
- उत्साह
- जुन्या
- आता
- बेसावध
- अनेक
- जनता
- अशांत
- सावकाश
- मागे
- लहान
- निरुत्साह
प्रश्न 3.
वचन बदला.
- जंगल
- एक
- आव्हान
- गर्जना
उत्तर:
- जंगले
- अनेक
- आव्हाने
- गर्जना
- पाव
सिंह आणि बेडूक Summary in Marathi
पाठ्यपरिचय:
आपली मर्यादा ओळखून आपण पुढे सरकावे. स्वत:ची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी कोणालाही आव्हान देऊ नये. त्याने आपलेच नुकसान होते, या अर्थाची कथा या पाठात सांगितली आहे.
शब्दार्थ:
- जंगल – वन (forest)
- कंटाळा – निरसता (bore)
- गरजणे – गर्जना करणे (To roar)
- बेडूक – मंडूक (a frog)
- आव्हान – मुकाबला करण्यासाठी आमंत्रण देणे (a challenge)
- पुढारी – नेता (a leader)
- संतुष्ट – समाधानी (satisfied)
- सरकणे – पुढे जाणे (To move on)
- आवाज – ध्वनी (sound)
- सावध – जागरुक (alert)
- शांत – शांतता (calm)
- गयावया – दीनवाणी प्रार्थना (to plead)
- वेग – गती (speed)
- नवीन – नूतन (recent, new)