Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 11 मिनूचा जलप्रवास Textbook Questions and Answers
1. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
मिनू मासोळी कुठे राहायची?
उत्तर:
मिनू मासोळी माशांच्या समूहात राहायची.
प्रश्न आ.
मिनूला समुद्र का बघायचा होता?
उत्तर:
मिनूला सतत उत्सुकता असायची की, नदीचे पाणी रोज कुठं जातं? तेव्हा आई म्हणायची, “समुद्रात जातं” तेव्हा तो समुद्र कसा असेल? तो केवढा असेल? हे जाणून घेण्यासाठी तिला समुद्र बघायचा होता.
प्रश्न इ.
नदीचे पाणी गढूळ का झाले?
उत्तर:
मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे पाण्याचे लोंढे वाहू लागले व त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले.
प्रश्न ई.
खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते?
उत्तर:
खडकावर फुललेली फुले लाल, गुलाबी, अंजिरी अशा विविध रंगांची होती.
प्रश्न उ.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
उत्तर:
समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश पोहचत नसल्याने समुद्राच्या तळाशी खोलवर अंधार असतो. प्रश्न ४.खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
2. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
उत्तरः
‘नदीत खूप खूप पाणी होते. ते पाणी निळे निळे, थंडगार व स्वच्छ होते. इतके स्वच्छ की वरून पाहिले, की तळाची वाळू दिसायची. गोल गोल गोटे दिसायचे अन् सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे.’ असे लेखिकेने नदीचे वर्णन केले आहे.
प्रश्न आ.
मिनूची व आईची चुकामुक का झाली?
उत्तर:
एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले; पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळातच मिनूची व आईची चुकामूक झाली.
प्रश्न इ.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
उत्तर:
समुद्रातून थोडीशी चक्कर मारून परत जावे असा विचार करून मिनू पुढे जात असताना तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती व त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली पाहून मिनूला हसू आले.
3. कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
प्रश्न अ.
“समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!”
उत्तर:
मिनूने जेव्हा हळूच तोंड उघडले तेव्हा समुद्राचे खारट पाणी तिच्या तोंडात गेले तेव्हा ती स्वत:लाच म्हणाली.
प्रश्न आ.
“त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!”
उत्तर:
समुद्राच्या पाण्यात मिनूची एका विचित्र माशाची टक्कर झाली तेव्हा पाण्याच्या तळाकडून कासव मिनूला म्हणाले.
प्रश्न इ.
“घाबरू नकोस, हा तर खेकडा!”
उत्तर:
कासव व मिनू यांच्यात जेव्हा बोलणे चालू होते तेव्हा त्यांच्या मधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मिनूकडे पाहत होता. तेव्हा ती घाबरली, तिची भिती दूर करताना कासव मिनूला म्हणाले.
प्रश्न ई.
“कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.”
उत्तर:
मिनू आपल्या आईकडे पुन्हा नदीच्या दिशेने निघाली तेव्हा मिनू कासवाला म्हणाली.
4. शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो? त्याची क्रिया क्रमाने लिहा.
प्रश्न 1.
शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो? त्याची क्रिया क्रमाने लिहा.
उत्तर:
- नदीतील शंख-शिंपल्यात एक छोटासा किडा असतो.
- या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो. मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो.
- मग त्यातूनच पुढे छानदार मोती तयार होतो.
5. चार – पाच ओळीत वर्णन करा.
प्रश्न अ.
घोडमासा
उत्तर:
घोडमासा हा विचित्र मासा आहे. त्याचे तोंड इतर माशांसारखे नसते. त्याचे तोंड घोड्यासारखे असते. त्याच्या पोटाला पिशवी असते. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात.
प्रश्न आ.
खेकडा
उत्तर:
खेकडा आपल्या पायांनी तिरका चालतो. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी पाहतो. त्याच्या पाठीवर कासवासारखेच कठीण कवच असते. त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. याला सहा तर कधी आठ पायही असतात. त्यांच्या तोंडाजवळ दोन नांग्या असतात, त्यामुळे त्याचं संरक्षण होते व त्याला भक्ष्यही पकडता येते.
6. इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
प्रश्न 1.
इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
उत्तर:
- नबी नशी
- को बळीशी
- छानशी
- सोनुलीशी
7.
प्रश्न अ.
समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
उत्तरः
- लांब – दूर
- प्रचंड – मोठे
- उष्ण – गरम
- लहान – इवली
प्रश्न आ.
विरूद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा.
उत्तरः
- पुढे × मागे
- प्रकाश × अंधार
- मऊ × टणक
- मोठे × लहान
8. योग्य जोड्या जुळवा.
प्रश्न 1.
योग्य जोड्या जुळवा.
उत्तर:
नाम | विशेषण |
1. मिनू | (आ) इवलीशी |
2. पाणी | (इ) खारट |
3. डोळे | (ई) बटबटीत |
4. पाऊस | (अ) मुसळधार |
9. खालील शब्द वाचा. समजून घ्या.
प्रश्न 1.
खालील शब्द वाचा. समजून घ्या.
10. तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
प्रश्न 1.
तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
उत्तर:
‘आई, समुद्र हा खूप मोठा जलाशय असतो. त्यात दूरदूर पर्यंत पाणीच पाणी असते. त्याचा तळ खूप खोल असतो. त्याच्या तळाशी अंधार असतो. कारण तिथपर्यंत सूर्याचा प्रकाश पोहचत नाही. समुद्राचे पाणी चवीला खारट आहे. त्या पाण्यात मोठ्या माशांपासून ते लहान-लहान माशांपर्यंत विविध प्रकारचे मासे आहेत. समुद्रातून आपण जहाज व बोटीत बसून प्रवास करू शकतो. विविध प्रकारचे वायू व तेलाचे साठे समुद्राच्या तळाशी आहेत. त्याचा माणसाने पुरेपुर फायदा करून घेतला आहे. समुद्रातील मोती हे आपला अमुल्य ठेवा आहे.
11. शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.
प्रश्न 1.
खालील वाक्ये वाचा.
अ. विसूने ‘ताजमहाल’, पाहिला.
आ. मंदाने सुरेशला सांगितले, ‘पायल तुझ्याकडे उदया येणार आहे.’
एखादया शब्दावर जोर दयावयाचा असता, दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगताना (‘ – ‘) असे एकेरी अवतरणचिन्ह वापरले जाते.
प्रश्न 2.
खालील वाक्यांतील काळ ओळखा.
- सूर्य पूर्वेला उगवतो.
- मला लाडू आवडला.
- आईचा स्वयंपाक झाला होता.
- मी गावाला जाईन.
- तू का रडतेस?
- मी पोहायला शिकणार आहे.
उत्तरः
- वर्तमानकाळ
- भूतकाळ
- भूतकाळ
- भविष्यकाळ
- वर्तमानकाळ
- भविष्यकाळ
Class 6 Marathi Chapter 11 मिनूचा जलप्रवास Additional Important Questions and Answers
खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य लिहा.
- मिनू होती ………………
- इतर मासे तिचे खूप खूप …………… करायचे.
- आनंदाने तिने ……………………. उडीच मारली.
- एक दिवस ……….. पाऊस पडू लागला.
- जमिनीवरून पाण्याचे …………… वाहायला लागले.
- पाणी वेगाने ……………. होते.
- या गोंधळात मिनूची व आईची ……………… झाली.
- इतक्यात तिची एका विचित्र माशाशी ………………. झाली.
- मिनू …………….. पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोहोचली.
- तो ………….. हात असलेला अष्टभुज मासा.
- हा अगदी …………….. गोळा असतो गोळा.
- मग त्यातून छानदार ……….. तयार होतो.
- आता मात्र मिनूची ……….. उडाली.
- काही माशांच्या अंगातून ……………… बाहेर पडतो.
- कासवदादांनी तिला कितीतरी ………………. दाखवल्या होत्या.
उत्तरः
- इवलीशी
- लाड
- टुणकन
- मुसळधार
- लोंढे
- वाहत
- चुकामूक
- टक्कर
- लाटांच्या
- आठ
- मांसाचा
- मोती
- घाबरगुंडी
- उजेड
- गमती
असे कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
प्रश्न 1.
“समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!”
उत्तर:
मिनूने जेव्हा हळूच तोंड उघडले तेव्हा समुद्राचे खारट पाणी तिच्या तोंडात गेले तेव्हा ती स्वत:लाच म्हणाली.
प्रश्न 2.
“त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!”
उत्तर:
समुद्राच्या पाण्यात मिनूची एका विचित्र माशाची टक्कर झाली तेव्हा पाण्याच्या तळाकडून कासव मिनूला म्हणाले.
प्रश्न 3.
“घाबरू नकोस, हा तर खेकडा!”
उत्तर:
कासव व मिनू यांच्यात जेव्हा बोलणे चालू होते तेव्हा त्यांच्या मधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला. तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मिनूकडे पाहत होता. तेव्हा ती घाबरली, तिची भिती दूर करताना कासव मिनूला म्हणाले.
प्रश्न 4.
“कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.”
उत्तर:
मिनू आपल्या आईकडे पुन्हा नदीच्या दिशेने निघाली तेव्हा मिनू कासवाला म्हणाली.
खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
मिनू कशी होती?
उत्तर:
मिनू इवलीशी, अगदी हाताच्या छोट्या बोटाएवढी होती.
प्रश्न 2.
मिनूचे कल्ले कसे होते?
उत्तर:
मिनू रूपेरी कल्ल्यांची होती. / मिनूचे कल्ले रूपेरी होते.
प्रश्न 3.
मिनूला कशाचा कंटाळा आला होता?
उत्तर:
मिनूला नदीच्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता.
प्रश्न 4.
मासे कोणाला शोधू लागले?
उत्तर:
मासे बावरून एकमेकांना शोधू लागले.
प्रश्न 5.
पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत कशाच्या रांगा होत्या?
उत्तरः
पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या.
प्रश्न 6.
पाण्याच्या तळाशी कोण बसले होते?
उत्तर:
पाण्याच्या तळाशी कासव बसले होते.
प्रश्न 7.
मिनू कासवाजवळ कशी पोहचली?
उत्तर:
मिनू लाटांच्या पायऱ्या उतरत कासवाजवळ पोहचली.
प्रश्न 8.
दोन शिंपल्यांच्या मध्ये कोण बसलेला असतो?
उत्तर:
दोन शिंपल्यांच्या मध्ये एक किडा बसलेला असतो.
प्रश्न 9.
बटबटीत डोळे कोणाचे आहेत?
उत्तर:
बटबटीत डोळे खेकड्याचे आहेत.
प्रश्न 10.
खेकड्यावर शत्रू हल्ला का करू शकत नाही?
उत्तर:
खेकड्याच्या पाठीवर कासवासारखेच कठीण कवच असल्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही.
प्रश्न 11.
खेकड्याला किती पाय असतात?
उत्तर:
खेकड्याला सहा तर कधी आठ पायही असतात.
प्रश्न 12.
तिरका तिरका चालणारा प्राणी कोणता?
उत्तर:
तिरका तिरका चालणारा प्राणी खेकडा होय.
प्रश्न 13.
खेकड्याच्या तोंडाजवळ काय असतात?
उत्तर:
खेकड्याच्या तोंडाजवळ दोन नांग्या असतात.
प्रश्न 14.
खेकड्याच्या दोन नांग्यामुळे त्याला कोणता फायदा होतो?
उत्तर:
खेकड्याच्या दोन नांग्यामुळे त्याला भक्ष्यही मिळते व त्याचे संरक्षणही होते.
खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
आठ हात असणाऱ्या माशाविषयी कासवदादाने मिनूला काय सांगितले?
उत्तर:
आठ हात असणाऱ्या माशाविषयी कासवदादाने मिनूला सांगितले की, ‘तो आठ हात असलेला अष्टभुज मासा. तो कसा उलटा चालतोय, बघितलंस का? पाण्याच्या चुळा भरत हळूहळू मार्ग सरकतो. आपल्या आठ हातांनी मासे, खेकडे पकडून खातो.’ पाण्यात उतरणारी माणसंसुद्धा त्याला घाबरतात बरं का।
खालील वाक्यात एकेरी अवतरण चिन्हांचा वापर करून वाक्य लिहा.
प्रश्न 1.
गाडगेबाबांच्या हातात नेहमी गाडगे असे; म्हणून लोक त्यांना नेहमी गाडगेबाबा म्हणत.
उत्तर:
गाडगेबाबांच्या हातात नेहमी गाडगे असे; म्हणून लोक त्यांना नेहमी ‘गाडगेबाबा’ म्हणत.
प्रश्न 2.
डॉ. बाबासाहेबांना सरकारने भारतरत्न ही पदवी बहाल केली.
उत्तर:
डॉ. बाबासाहेबांना सरकारने ‘भारतरत्न’ ही पदवी बहाल केली.
प्रश्न 3.
लोकमान्य टिळकांनी लोकांना जागृत करण्यासाठी मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली.
उत्तर:
लोकमान्य टिळकांनी लोकांना जागृत करण्यासाठी ‘मराठा’ व ‘केसरी’ ही वर्तमानपत्र सुरू केली.
मिनूचा जलप्रवास Summary in Marathi
पाठपरिचयः
प्रस्तुत पाठात मिनू नावाच्या मासळीने केलेल्या जल प्रवासाचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर समुद्रातील कासवाने दाखवलेल्या गमतीजमतीचे वर्णन केले आहे. त्याच्यातून आपणांस माशांमध्ये असलेल्या सामंजस्याचे दर्शन घडते.
शब्दार्थ:
- जलप्रवास – पाण्यातून प्रवास (voyage)
- निळे – (blue)
- तळ – (to bottom)
- वाळू – रेती (sand)
- गोल गोटे – गोल लहान दगड (round stone)
- सुळसुळ् – सहज (easy)
- मासे – (fish)
- समूह – समुदाय (crowd)
- मासळी – मच्छी (fish)
- इवलीशी – अगदी लहान (very small)
- रूपेरी – चांदीच्या (silver)
- नजरेआड – नजरेपासून दूर (out of sight)
- खोलगट – किंचित खोल (slightly deep)
- समुद्र – सागर (sea)
- मुसळधार – खूप जोराचा (heavy, torrential)
- लोंढे – प्रवाह (stream)
- गढुळ – मातीमिश्रीत झालेले (not clear, muddy)
- बावरून – गडबडून, गोंधळून (confusion)
- वेगाने – गतीने (speedily)
- गिरक्या – गोल गोल फिरत (whirling)
- चक्कर – फेरफटका (stroll, around)
- संग – ओळ (line)
- गंमत – मौज, मजा (fun)
- हळूहळू – सावकाश (slow)
- टक्कर – आघात, धक्का (collision)
- घोडमासा, – समुद्रातील वेगवेगळ्या माशांचे प्रकार समुद्रघोडा (one type of fish)
- रोखाने – त्या दिशेने (towards)
- कासव – (tortoise)
- लाटा – पाण्याचा तरंग (waves)
- पावला – प्रत्येक पावलावर (on each step) पावलांवर
- अष्टभुज – आठ हत असलेला (having eight hands)
- चुळा – तोंडाने पाणी बाहेर फेकणे (gurgle)
- गुंडाळणे – आवरण घालणे (to cover)
- कण – छोटा दाणा (particle)
- तिरका – तिरकस (sloping, slanting)
- बटबटीत – मोठे (big)
- घाबरगुंडी – तीव्र भीती (panic)
- कवच – आवरण (cover)
- कठीण – कडक (hard)
- शत्रू – दुश्मन (enemy)
- हल्ला – चढाई (attack)
- बेट्याला – (येथे अर्थ) खेकड्याला (to crab)
- नांग्या – खेकड्याच्या तोंडाजवळील एक अवयव (part near mouth of a crab)
- भक्ष्य – शिकार (prey)
- प्रकाश – उजेड (light)
- प्रचंड – खूप मोठे (huge)
- क्षणभर – काही काळ (for some moments)
वाक्प्रचार व अर्थ:
- नजरेआड न करणे – नजरेपासून दूर न करणे.
- बावरून जाणे – गोंधळून जाणे.
- चक्कर मारणे – फिरून येणे.
- घाबरगुंडी उडणे – खूप घाबरणे.
- डोळे विस्फारणे – डोळे मोठे करून बघणे.