Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 15 होळी आली होळी Textbook Questions and Answers
1. एक ते दोन शब्दांत उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
होळीला करावयाचा गोड पदार्थ?
उत्तर:
पुरण पोळी
प्रश्न आ.
केरकचरा टाकण्याचे ठिकाण?
उत्तर:
कचरा पेटी, खड्डा
2. एक-दोन वाक्यातं उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?
उत्तर:
कवीने झाडे व फांदया तोडण्यास मनाई केली आहे.
प्रश्न आ.
होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?
उत्तर:
होळीच्या वेळी झोळी सद्गुणांनी भरावी.
प्रश्न इ.
होळीसाठी मोळी कशाची बांधावी?
उत्तर:
अनिष्ट रूढी व प्रथांची मोळी होळीसाठी बांधावी.
प्रश्न ई.
कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?
उत्तर:
‘होळीच्या दिवशी वृक्ष राजी तोडणार नाही’ ही शपथ घ्यायला कवीने सांगितले आहे.
प्रश्न उ.
कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?
उत्तर:
कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी निसर्गराजा पाणी भरेल.
3. ‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन – तीन वाक्यांत लिहा.
प्रश्न 1.
‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन – तीन वाक्यांत लिहा.
उत्तर:
‘होळी’ च्या सणादिवशी गल्लोगल्ली, जागोजागी होळी पेटवली जाते. या होळीमध्ये जाळण्यासाठी आपण झाडे मोठ्या प्रमाणावर तोडतो. ही झाडे जाळल्यामुळे वायू प्रदूषण एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात होते. झाडे तोडल्यामुळे जीवनावश्यक ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाले आहे. एकाच सार्वजनिक ठिकाणी आपण होळी जाळून तिची सर्वांनी सामूहिक पूजा केली तर होणारे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण आपणास टाळता येईल. होळीच्या दिवशी झाडे न तोडता झाडे लावण्याचा संकल्प करूयात व आपल्या पृथ्वीचे संवर्धन करूयात. पर्यावरणाचे रक्षण करूया.
4. ‘होळी’ च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.
प्रश्न 1.
‘होळी’ च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.
उत्तर:
प्रथम मी घराच्या अंगणात पाण्याचा सडा शिंपडून अंगण स्वच्छ करून घेईन. नंतर होळीसाठी अंगणात एक छोटासा खड्डा तयार करेन. त्या खड्ड्यात थोड्या प्रमाणात वाळलेले गवत व शेणाच्या शेणी /गोवऱ्या उभ्या करून रचून ठेवेन. नंतर होळी भोवती सुंदर रांगोळी काढेन. घरात आईच्या कामात मदत करेन.
5. तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करा.
प्रश्न 1.
तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करा.
उत्तर:
6. होळी हा सण ‘फाल्गुन’ या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा.
प्रश्न 1.
होळी हा सण ‘फाल्गुन’ या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा.
उत्तर:
प्रश्न 2.
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
Class 6 Marathi Chapter 15 होळी आली होळी Additional Important Questions and Answers
एक ते दोन शब्दांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
एक प्रकारचे वस्त्र?
उत्तर:
बंडी
खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न 1.
होळी आली होळी
खावी …………………………
…………………… तोडू नका,
केर-कचरा खड्ड्यात टाका.
उत्तर:
होळी आली होळी
खावी पुरणाची पोळी,
झाडे, फांदया तोडू नका,
केर-कचरा खड्ड्यात टाका.
प्रश्न 2.
होळी आली होळी
ठेवू ……………………………
……………………. वृक्ष राजी
घ्यावी आज अशी आण.
उत्तर:
होळी आली होळी
ठेवू पर्यावरणाचे भान,
नका तोडू वृक्ष राजी
घ्यावी आज अशी आण
प्रश्न 3.
होळीचा हा सण असा
……………………………….
……………………………….
स्वत: येऊन पाणी भरील.
उत्तर:
होळीचा हा सण असा
जो कोणी साजरा करील,
निसर्गराजा त्याच्या घरी
स्वत: येऊन पाणी भरील.
खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
कोणत्या गोष्टीचे भान ठेवण्यास कवीने सांगितले आहे?
उत्तर:
पर्यावरणाचे भान ठेवण्यास कवीने सांगितले आहे.
व्याकरण व भाषाभ्यास
प्रश्न अ.
‘होळी – पोळी’ यासारखे कवितेतील शब्द शोधून लिहा.
उत्तर:
- नका – टाका
- झोळी – मोळी
- भान – आण
- थंडी – बंडी
- करील – भरील
प्रश्न आ.
खालील अक्षरांवर अनुस्वार (-) देऊन शब्द पुन्हा लिहा.
उत्तर:
- फादया – फांदया
- बाधू – बांधू
- थडी – थंडी
- बडी – बंडी
- अडी – अंडी
- बाधा – बांधा
होळी आली होळी Summary in Marathi
काव्यपरिचयः
प्रस्तुत कवितेत कवी दिलीप पाटील यांनी ‘होळी’ या सणाचे महत्त्व विशद केले आहे. त्याचबरोबर या सणाच्या निमित्ताने | कोणत्या गोष्टी सोडाव्या व कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात याचे वर्णन केले आहे.
शब्दार्थ:
- होळी – भारतातील एक सण (holi)
- अनिष्ट – वाईट (evil)
- रूढी – परंपरा (tradition, custom)
- पर्यावरण – भोवतालचा परिसर (environment)
- वृक्ष राजी – वन, जंगल (forests)
- आण – शपथ (an oath)
- बंडी – बनियन (under garment)
- पाणी भरणे – मदत करणे (to help)