Maharashtra Board Text books

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई (कविता)

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 17 पाणपोई Textbook Questions and Answers

1. एक – दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
उत्तर:
उन्हामुळे अंगाची लाही लाही होते.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 2.
अवखळ वारा सुटल्यावर काय होते?
उत्तर:
अवखळ वारा सुटल्यावर पालापाचोळा धुळीबरोबर उडतो.

प्रश्न 3.
थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
उत्तर:
रखरखत्या उन्हामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते.

प्रश्न 4.
पाणपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात?
उत्तर:
पाणपोईवर पाणी पिण्यास गरीब श्रीमंत दोन्हीही येतात.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 5.
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?
उत्तर:
रखरखत्या उन्हात रांजणातले थंडगार पाणी पिऊन सर्व तृप्त होतात म्हणून त्याला आशीर्वाद देतात.

2. उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.

प्रश्न 1.
उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.

3. घामेजणे, लाहीलाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमुहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.

प्रश्न 1.
घामेजणे, लाहीलाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमुहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.
उत्तर:
उन्हाळ्याचे दिवस होते. रखरखते ऊन होते. मामाच्या शेतावर जायचे होते. अंगाची लाहीलाही होत होती. आम्ही घामेजलो होतो. उष्णगरम झळाई लागत होती. घसा कोरडा पडला होता. तहान लागली होती. जवळच्या झऱ्यातून थंडगार गोड पाणी प्यायलो. मन तृप्त झाले.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

4. रखरख, गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा.

प्रश्न 1.
रखरख, गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा.
उत्तर:

  1. लाहीलाही
  2. सारखीसारखी
  3. झरझर
  4. भरभर
  5. पटपट

5. पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.

पाणबुड्या, पाणलोट, पाणवठा, पाणथळ, पाणकोंबडा, पाणघोडा, पाणवनस्पती.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

6. ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई 1

7. खालील विरूद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील विरूद्धार्थी शब्द लिहा.
उत्तर:

  1. गार × गरम
  2. रंक × राव
  3. ऊन × सावली
  4. तृप्त × अतृप्त
  5. दुवा × शाप
  6. सज्जन × दुर्जन
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

8. तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.

प्रश्न 1.
तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.
उत्तर:
डांबरी रस्त्यावरून चालताना उष्णतेच्या झळा लागत होत्या. थंडगार पाणी प्यावेसे वाटत होते आणि अचानक एक पाणपोई दिसली. माझ्या मनात विचार येतील की ही पाणपोई कोणी ठेवली असेल? त्या सज्जन माणसास मला भेटता येईल का? हे पाणी थंडगार कसे राहते? लाल फडके कोण बांधून जाते? त्या सज्जनाचे मला आभार मानता येतील का? इत्यादी.

9. चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.

प्रश्न 1.
चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.
उत्तर:
मे महिन्याची दुपार होती. वाटसरू दुसऱ्या गावाला जायला निघाला. जवळ पाणीही नव्हते. रखरखत्या उन्हात चालवत नव्हते. ग्लानी येत होती. कडक ऊन होते. थोडे पुढे जाऊन पहातो तो काय एका मोठ्या वृक्षाखाली पाणपोई दिसली. मनाला खूप बरे वाटले. ज्यानी कोणी ती पाणपोई ठेवली होती त्याला खूप दुवा दिला. समाजसेवेची ही पद्धत किती न्यारी आहे असे वाटले. तहान शमली. तृप्तता झाली.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

10. तुमच्या गावातील एखादया पाणपोईवर जा. तीकोणी काढली, ती काढण्यामागचा उद्देश, त्याची निगा कशी राखतात, पाणी कसे भरले जाते याची माहिती घ्या. ती एक मोठी समाजसेवा कशी आहे, याबद्दल सात-आठ ओळी लिहा.
उत्तर:
राजापूर आमचे गाव. उन्हाळा सुरू झाला की गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती व त्यांचा तरूण मुलगा मोठ्या झाडाच्या पारावर सुंदर मोठे काळे माठ आणतात. त्यात स्वच्छ गोड पाणी भरतात. त्या माठाला ओले लाल फडके बांधतात. त्यामुळे माठातील पाणी थंडगार रहाते. वाटसरूंना, तहानलेल्यांना एवढ्या प्रचंड उष्णतेत गार पाणी मिळावे व त्यांची तहान शमावी हा त्यामागील उद्देश. वाटसरूने पाणी काढण्यासाठी ठेवलेल्या डावानेच पाणी घ्यायचे हा दंडक असतो.

त्यात उष्टे भांडे किंवा हात बुडवता येत नाही. हे रांजण नीट झाकलेले असते. केरकचरा त्यात जात नाही. गाळलेले नळाचे पाणी यात भरले जाते. ते जंतुविरहीत असते. ‘तहान शमविण्यासाठी’ स्वेच्छेने केलेली ही सेवा म्हणजे समाजसेवेचे एक उत्तम उदाहरण आहे. यातून ‘परोपकार’ हा मुख्य उद्देश दिसून येतो. आपणासही यातून शिकण्यासारखे आहे. घरातील गॅलरीत व खिडकीबाहेर पक्ष्यांनाही दाणा पाण्याची सोय करता येते. करून तर पहा!

विचार करून सांगा !

प्रश्न 1.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.

प्रश्न 2.
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.
उत्तरः
कोणताही उपक्रम हा समाजाच्या हितासाठी असेल तर घरातील मोठ्या माणसांना निश्चितच आनंद होतो. ते देखील तुमची योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतात. कमी खर्चात योग्य काम कसे होईल हे शिकवितात. त्यासाठी लागणारी शिस्त, नियोजनाचे धडे देतात. म्हणून मोठया माणसांना सांगणे आवश्यक आहे असे मला वाटतेय.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 3.
अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.

प्रश्न 4.
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई 2

प्रश्न 5.
‘पाणी हेच जीवन’ यांवर आधारित दहा ओळी लिहा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 6.
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.

प्रश्न 7.
खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-‘) घाला व उतारा पुन्हा लिहा.

प्रश्न 8.
इयत्ता पाचवीमध्ये तुमचा शब्दसंग्रह तुम्ही तयार केला आहे. शब्दसंग्रह किंवा शब्दकोश कसा पाहावा हे आपण पाहूया.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई 3

प्रश्न 9.
वर दिलेले ‘अ’ गटातील व ‘ब’ गटातील शब्द वाचा.
‘अ’ गटातील शब्द हे बाराखडीतील स्वरचिन्हानुसार दिलेले नाहीत.
मात्र ‘ब’ गटातील शब्द हे बाराखडीतील स्वरचिन्हानुसार दिलेले आहेत.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 10.
पाठ्यपुस्तकातील पाठ 2 आणि पाठ 3 मधील शब्दार्थ खालील चौकटीत दिले आहेत.

प्रश्न 11.
पाठ्यपुस्तकातील पाठ 2 आणि पाठ 3 मधील शब्दार्थ शब्दकोशाप्रमाणे खालील चौकटीत दिले आहेत.

‘अ’ गट

लुकलुकणे-चमकणे.
तल्लीन होणे-दंग होणे, गुंग होणे.
कडकडून भेटणे-प्रेमाने मिठी मारणे.
बिलगणे-प्रेमाने जवळ येणे.
गहिवरून येणे-मन भरून येणे.
धमाल-मजा.
पाडाचा आंबा-अर्धवट पिकलेला आंबा.
आमराई-आंब्याच्या झाडांची बाग.
ऐन दुपारी- भर दुपारी.
भणाण वारा – वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज.
खचणे-खाली खाली जाणे, ढासळणे.
चडफड- राग,
गिल्ला करणे-गोंधळ करणे.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

‘ब’ गट

आमराई-आंब्याच्या झाडांची बाग,
ऐन दुपारी- भर दुपारी.
कडकडून भेटणे-प्रेमाने मिठी मारणे.
खचणे- खाली खाली येणे, ढासळणे.
गहिवरून येणे-मन भरून येणे.
गिल्ला करणे-गोंधळ करणे.
चडफड- राग.
तल्लीन होणे-दंग होणे, गुंग होणे.
धमाल-मजा.
पाडाचा आंबा-अर्धवट पिकलेला आंबा.
बिलगणे-प्रेमाने जवळ येणे.
भणाण वारा – वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज.
लुकलुकणे-चमकणे.

आले का लक्षात?

‘क, ख ….. ज्ञ’ या अक्षरांच्या क्रमानुसार व बाराखडीतील चिन्हानुसार वरील शब्द लिहिले आहेत. शब्दकोश पाहताना याच पद्धतीने पाहा. पाठ्यपुस्तकातील किंवा पाठ्येतर साहित्यातील शब्दांचे अर्थ पाहताना या पद्धतीने शब्दकोश पाहा. पाठ्यपुस्तकातील इतर पाठांमध्ये आलेले शब्दार्थ पाहा व शब्दकोशाप्रमाणे लिहून अधिकचा सराव करा.

Class 6 Marathi Chapter 17 पाणपोई Additional Important Questions and Answers

योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
उन्हाने अंगाची ……………. होते. (लाहीलाही / आग)
उत्तर:
लाहीलाही

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 2.
…………….. सावलीत पाणपोई थाटली आहे. (आंब्याच्या / वटवृक्षाच्या)
उत्तर:
वटवृक्षाच्या

प्रश्न 3.
रखरखत्या उन्हात …………….. वारा सुटला आहे. (उष्णगरम / अवखळ)
उत्तर:
अवखळ

प्रश्न 4.
पाणी पिण्यास ……………… ठेवतात. (रांजण / माठ)
उत्तर:
रांजण

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 5.
पाणी पिऊन ………………. दुवा देतात. (लोकांना / सज्जनास)
उत्तर:
सज्जनास

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
रांजण कसे होते?
उत्तर:
रांजण गार पाण्याने भरलेले व लाल कापडाने झाकलेले होते.

प्रश्न 2.
कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
उत्तर:

  1. ……………. होतीया लाहीलाही.
  2. आठवते दग्ध ………………….
  3. …………………. अवखळ वारा.
  4. …………………. उंच अंबरा.
  5. …………………. मोठी तहान.
  6. ‘रंक असो ………………….
  7. धन्य असो ………………….
  8. पिऊनीया ………………….

उत्तरः

  1. उन्हात घामेजुनी अंगाची होतीया लाहीलाही.
  2. आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई.
  3. रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा.
  4. धुळीसंगे पालापाचोळा जाई या उंच अंबरा.
  5. सारखीसारखी लागते साऱ्यांना मोठी तहान.
  6. ‘रंक असो वा राव,’ हे पाणी पितात सारेजण!
  7. धन्य असो ज्याने थाटिली ही पाणपोई उन्हात.
  8. पिऊनीया पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास.
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

व्याकरण व भाषाभ्यास

विशेषण:
नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात.
उदा. सुंदर, कोवळे, लहान, लुसलुशीत, कडक, गोजिरवाणे इ.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.

 नामविशेषण
1. ताजमहालअ. नरम
2. वाराब. थंडगार
3. बर्फक. कडक
4. लाकूडड. सोसाट्याचा
5. कापूसइ. सुंदर

उत्तर:

नामविशेषण
1. ताजमहालइ. सुंदर
2. वाराड. सोसाट्याचा
3. बर्फब. थंडगार
4. लाकूडक. कडक
5. कापूसअ. नरम

प्रश्न 2.
‘वारा’ या शब्दाला विशेषणे लावा..
उत्तर:
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई 4

प्रश्न 3.
एकाच अर्थाचे शब्द शोधा. जसे की – उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा.
उत्तर:

  1. केरकचरा
  2. गोरागोमटा
  3. गरमागरम
  4. घनदाट
  5. काळाकभिन्न
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

प्रश्न 4.
संबंधित शब्द लिहा.
उत्तर:

  1. पाणपोई – पाणबुड्या, पाणबोट, पाणवठा, पाणथळ, पाणकोंबडा, पाणघोडा, पाणवनस्पती
  2. जलचर – जलविद्युत, जलसाठा, जलसमाधी, जलाशय, जलसंपत्ती, जलधी

प्रश्न 6.
खालील विरूद्धार्थी शब्द लिहा.
उत्तर:

  1. थाटणे × मोडणे
  2. आठवणे × विसरणे
  3. थकलेला × ताजातवाना
  4. मोठी × लहान
  5. भरलेले × रिकामे
  6. झाकणे × उघडणे

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
अंगाची लाहीलाही होणे – उन्हामुळे अंगाची आग होणे.
उत्तर:
वैशाख महिन्यात अंगाची लाहीलाही होते.

प्रश्न 2.
तृप्त होणे – समाधानी होणे.
उत्तर:
भुकेलेला भिकारी भाजीभाकरी खाऊन तृप्त झाला.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

विचार करून सांगा !

प्रश्न 1.
कोणकोणते सामाजिक उपक्रम करावेत असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.
उत्तरः
1. जलसाक्षरता अभियान राबवणे – पाणी ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. पाण्याचा योग्य वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाण्याचे सिंचन, नियोजन, वापर अतिशय काळजीपूर्वक करण्यासाठी खेडोपाडी, शहरातून जलसाक्षरता शिबीरे घ्यायला हवी.

2. तंत्रज्ञान साक्षरता – आजच्या तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात दररोज नवनवीन बदल घडत आहेत. त्याला सामोरे
जाण्यासाठी संगणक, टॅब, मोबाईलची ओळख व त्यात कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी वृद्धांचे व जिज्ञासूंचे तंत्रज्ञान साक्षरता वर्ग मोफत घेतले पाहिजे. त्यामुळे संभाव्य अडचणींवर ते मात करू शकतील. उदा. रांगेत उभे न राहता एखादया वृद्ध व्यक्तिला ऑनलाईन बुकींग कसे करतात ते शिकविणे.

पाणपोई Summary in Marathi

काव्यपरिचयः
‘पाणपोई’ या कवितेत उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना, रखरखते ऊन असताना वाटसरूंना ग्लानी येते व पाणी हवेहवेसे वाटते. तर त्या ठिकाणी स्वच्छ, थंडगार पाणी प्यायला मिळाले तर अत्यंत तृप्तता मिळते. वाटसरूंना पाणी पिण्यासाठी केलेली सोय म्हणजेच पाणपोई. भूतदयेचे हे उत्तम उदाहरण आहे.

शब्दार्थ:

  1. दग्ध ऊन – भाजणारे ऊन (burning heat)
  2. वाटवृक्ष – वडाचे झाड (Banyan tree)
  3. पाणपोई – उन्हाळ्यामध्ये वाटसरूंसाठी केलेली पिण्याच्या पाण्याची सोय (stand to supply water to travellers)
  4. अवखळ – खोडकर (naughty, mischevous)
  5. थकलेला – दमलेला (tired)
  6. ग्लानी – चक्कर, सुस्ती (ennui, fatigue)
  7. रांजण – मोठे माठ (big earthen pot)
  8. तृप्त – संतुष्ट (satisfied)
  9. रंक – गरीब (poor)
  10. राव – श्रीमंत (rich)
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 17 पाणपोई

वाक्प्रचार व अर्थ:

  1. अंगाची लाही लाही होणे – उन्हामुळे अंगाची आग होणे.
  2. तृप्त होणे – समाधानी होणे.