9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 18 हसरे दुःख Textbook Questions and Answers
1. आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा:
प्रश्न 1.
उत्तर:
प्रश्न 2.
उत्तर:
2. खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा:
प्रश्न 1.
खाली दिलेल्या घटनांचा परिणाम लिहा:
उत्तर:
घटना | परिणाम |
1. चार्लीने ‘जॅक जोन्स’ म्हणायला सुरुवात केली. | 1. वादयवृंदही त्याला साथ देऊ लागला. |
2. प्रेक्षागृहात वादयवृंदाचे स्वर घुमू लागले. | 2. सारे थिएटर त्या स्वरांनी भरून गेले. |
3. प्रेक्षागृहातील आरोळ्या स्टेज मॅनेजरने ऐकल्या. | 3. स्टेज मॅनेजर धावतपळत आला आणि विंगेत. चार्लीच्या शेजारी उभा राहिला. गोंधळून जाऊन लिलीकडे बघत राहिला. |
3. कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा:
प्रश्न (अ)
कंसातील वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यांत योग्य उपयोग करा: (अवेहलना करणे, चेहरा पांढरा फटफटीत पडणे, पदार्पण करणे, स्तिमित होणे)
- आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.
- शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले.
- दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.
- गुणवान माणसांचा अनादर करू नये.
उत्तर:
- आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचे चेहरे पांढरे फटफटीत पडले.
- शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पदार्पण केले.
- दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले.
- गुणवान माणसांची अवहेलना करू नये.
प्रश्न (ब)
पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा :
- तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला.
- तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
- नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.
- सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला.
उत्तर:
- तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकलीने सावरला.
- त्याच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही.
- नर्तकाचे नृत्य प्रेक्षणीय होते.
- सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गायनाने रंगला.
4. स्वमत:
प्रश्न 1.
चार्लीच्या तुम्हांला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर:
चार्ली हा मुळातच गुणी कलावंत होता. आपली ही ओळख त्याने पदार्पणातच करून दिली. त्या दिवशी आई गात असताना तो एकाग्रतेने गाणे ऐकत होता. मला तर वाटते की, तो आईबरोबर मनातल्या मनात गाणे गातच असावा. यासाठी एकाग्रता राखण्याची व आपल्या आवडत्या विषयाशी एकरूप होण्याची क्षमता लागते. ती चार्लीकडे होती. रंगमंचावरून प्रत्यक्ष गाण्याची वेळ आली, तेव्हा चार्लीने ते यशस्वी रितीने गायले. याचे कारण त्याला कार्यक्रम सादर करायचा नव्हता. त्याला गायचे होते. त्याच्यात गायनाची ऊर्मी होती. तो त्या गाण्याशी एकरूप झाला होता. म्हणून तो गाऊ शकला.
पैशांचा पाऊस पडला, तेव्हा त्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनाही तसे सांगितले. हा त्याच्या मनाचा निरागसपणा, निष्पापपणा होता. तो कलावंतच होता. कलेची ऊर्मी त्याच्यात होती. म्हणून त्याने नाचून दाखवले. नकला करून दाखवल्या. हे सर्व त्याने निरीक्षणातून मिळवले होते. त्याची निरीक्षणक्षमता अफाट होती. एकंदरीत पदार्पणातच त्याने आपले कलावंतपण सिद्ध केले.
प्रश्न 2.
स्टेज मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल, ते सविस्तर लिहा.
उत्तर:
स्टेज मॅनेजरने चार्लीला गाणे सादर करायला सांगितले, हे योग्यच होते. तो निर्णय योग्यच होता, हे चालीने आपल्या कामगिरीने सिद्ध केलेच. मात्र, मॅनेजरची एक गोष्ट मला पटली नाही आणि आवडलीही नाही. लिलीवर अनवस्था प्रसंग ओढवला, तेव्हा मॅनेजर गोंधळून गेला. त्याने प्रेक्षकांना शांत करण्यासाठी काहीही केले नाही. मी त्याच्या जागी असतो, तर पुढे झालो असतो. प्रेक्षकांची क्षमा मागितली असती. घडलेल्या प्रसंगात लिलीची कोणतीही चूक नव्हती, तिच्यावर कोसळलेली ती नैसर्गिक आपत्ती होती, हे सर्व त्यांना समजावून सांगितले असते. पंधरा मिनिटांची विश्रांती जाहीर केली असती. या अवधीत विचारविनिमय केला असता. लिलीला धीर दिला असता. मला वाटते, असेच व्हायला हवे होते.
प्रश्न 3.
‘हसरे दुःख’ या शीर्षकाचा तुम्हांला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लिली हार्ले ही एक मोठी कलावंत होती. गायन, पियानो वादन, नर्तन यांत ती निष्णात होती. कलावंत म्हणून जे मोठेपण असते, ते तिने मिळवले होते. या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसा, कीर्ती मिळवली होती. हे सर्व एके दिवशी अचानक लुप्त झाले. तिचा आवाज हरवला आणि तिचे सर्वस्वच गेले. ती रात्र तिच्या दृष्टीने काळरात्र होती. दुःखाचा कडेलोट होता.
त्याच रात्री लिलीचा पाच वर्षांचा हरहुन्नरी मुलगा या संकटात तिच्या मदतीला धावून आला. कोसळलेला कार्यक्रम त्याने पुन्हा उभारला. त्याने गायन, अभिनय व नर्तन या कौशल्यांचे डोळे दिपवणारे दर्शन घडवले. कोणत्याही आईला आभाळ ठेंगणे वाटावे, असे दृश्य होते ते. नवा कलावंत उदयाला आला. आपल्या मुलाचा हा उदयकाळ म्हणजे सुखाचा सर्वोच्च बिंदू होता. एका बाजूला सुख होते. त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला दु:ख होते. म्हणून या पाठाचे शीर्षक आहे – ‘हसरे दुःख’.
5. हसरे दुःख’ या पाठातील पाठवंशाचे नाट्यीकरण करून वर्गात सादरीकरण करा.
प्रश्न 1.
हसरे दुःख’ या पाठातील पाठवंशाचे नाट्यीकरण करून वर्गात सादरीकरण करा.
अपठित गद्य आकलन:
1. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती का.
प्रश्न (अ)
चोकटी पूर्ण करा. अश्मयुगातील माणसाने दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू – [ ] [ ] [ ] [ ]
आमयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे काम येण्यासाठी चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नानातहांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-हत्यारे बनवली आणि त्याचे दागदागिने देखील घडवले. साठक कोरून किंवा दगडाच्या भिंती रचून आपल्या निवान्याची सोय केली. माणसाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर त्याला आपल्या सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट कान दिल्याशिवाय राहवले नाही.
फुरसद मिळाली तशी तो लेगी खोदू लागला; शिल्पे कोरू लागला, घरांना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि स्थापत्य या दोन्ही कला प्रयाप्रमाणे अशा दाडातून फुटल्या आणि विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दशहाने माणसाचे जीवन परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि माणसाच्या सृजनशीलतेला कला आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून त्याने तो पूजला.
प्रश्न (आ)
माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताऱ्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा.
भाषाभ्यास:
अनुस्वार लेखनावावतचे नियम:
1. खालील शब्द वाचा.
‘रंग’, ‘का’, ‘पंचमी’, ‘पंडित’, ‘अंधुज हे शब्द तत्सम आहेत. हे आपण पर-सवर्णानसुया लिहू शकतो, म्हणजे अनुस्वारानंतर देणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिक वापरून लिहू शकतो. उदा., रा. पडकर, पञ्चमी, पण्डित, अन्धुन असे. विशेषतः जुने साहित्य वाचले तर असे लेखन दिसते. परंतु, आजकाल अशी पर-सवनि लिहिण्याची पद्धत जुनी झाली आहे. त्याऐवजी अनुस्वारच वापरले जातात. खालील शब्दया कसे दिसतात! ‘निबन्य’, ‘आम्बा’, ‘वन’, ‘सम्म’, ‘दल्या हे शब्द वयायला विचित्र वाटतात ना! कारण हे तत्सम नाहीत. पर-सवर्ग लिहिण्याची पद्यत का तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शोविंद देऊनच लिहावेत.
मराठीत स्पष्टोच्यारित अनुनासिकाबद्दल शीविंदू दयावा.
2. खालील शब्द वाचा.
‘सिंह’, ‘संगम’, मांस’, ‘संहार’ या शब्दांचा उच्चार करे तर खूप शाळा आहे ना? या शब्दांचे ‘सिंह’, कम’, भांबा’, ‘संहार’ उच्चार असे होतात आणि तसेच ते कायचे असतात पण लिहिताना हे शब्द तसे लिहू नयेत.
इ.इ.स., स. प. म. रयांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीविंदू दयावा.
पर – सवर्णाने लिहा:
घंटा, मंदिर, चंपा, चंचल, मंगल
अनुस्वार वापसन लिहा:
जगाल, घेण्डू, सञ्च, गोन्धळ, बम्ब
Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 18 हसरे दुःख Additional Important Questions and Answers
उतारा क्र. 1
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
प्रेक्षागारात घडलेला तो विपरीत प्रसंग लिली कथन करीत आहे, अशी कल्पना करून लिहा.
उत्तर:
त्या दिवशी माझे गाणे रंगात आले होते. माझे खूप चाहते आले होते. त्यांना संगीताचा आनंद भरभरून दयावा, असे मलाच वाटत होते. आनंदाने फुललेले श्रोत्यांचे चेहेरे पाहण्यातले सुख मी अनेकदा अनुभवले आहे. त्या दिवशीसुद्धा मी भरभरून गात होते. श्रोते डोलत होते. त्यांच्या चेहेऱ्यांवरचा आनंद मला दिसत होता. मीसुद्धा खुशीत होते. आजसुद्धा मी यशाचा आणखी एक टप्पा गाठणार होते, अशी माझी खात्री झाली होती आणि घडले भलतेच.
मधुर स्वरविलास चालू असतानाच अचानक मध्येच माझा आवाज चिरकला. कंठातून आवाजच येईना. स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. स्वरांनी वादयवृंदाची साथसंगत सोडून दिली. काही केल्या काही होईना. मी घुसमटले. आतल्या आत कोसळले. इतकी लांच्छनास्पद स्थिती मी कधीच अनुभवली नव्हती. श्रोत्यांना तोंड दाखवण्याचीही मला लाज वाटू लागली. मी कशीबशी खाली मान घालून विंगेत परतले.
उतारा क्र. 2
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
चंडोल पक्ष्याच्या उदाहरणाला अनुसरून आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
विपरीत घटनेचे श्रोत्यांवरील परिणाम लिहा.
- ……………………………
- …………………………..
- …………………………..
- …………………………..
उत्तर:
- काही काळानंतर श्रोत्यांना दम धरवेना. त्यांच्यात कुजबूज सुरू झाली.
- श्रोते आरडाओरडा करू लागले. आरडाओरड वाढू लागली.
- काही श्रोते लिलीचे गाणे भसाड्या आवाजात म्हणू लागले.
- श्रोत्यांच्या गायनाला शिट्ट्यांची व आरोळ्यांची साथ मिळाली.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
यापूर्वीचा लिली हार्लेबाबतचा मॅनेजरचा अनुभव लिहा.
1. …………………….
2. ……………………
उत्तर:
1. लिली हार्ले एकदा रंगमंचावर गेली की, तिच्याकडे मॅनेजरला कधी बघावेच लागत नसे.
2. लिली रंगमंचावर उभी राहिली की, मॅनेजर निर्धास्तपणे दुसरीकडे बघायला मोकळा असे.
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
लिली हार्लेच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगासारखा तुम्ही अनुभवलेला किंवा तुम्हांला ठाऊक असलेला प्रसंग सांगा.
उत्तर:
माझ्या आयुष्यातला तो प्रसंग मी कधीही विसरणार नाही. प्रस्तुत पाठ वाचला त्या वेळी मला तो तीव्रपणे आठवला. लिलीची काय अवस्था झाली असेल, हे मला पूर्णपणे कळले. गेल्याच्या गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही. मी सातवीत होतो. जिल्हास्तरीय वक्तृत्वस्पर्धा होती. आमच्या शाळेतून मी सहभागी झालो होतो. सभागृह पूर्ण भरलेले होते. एकेकाचे नाव घेतले जायचे, तो यायचा आणि तडाखेबंद भाषण करून जायचा. ते पाहून माझ्या छातीत धडधडायचे. माझा क्रमांक जवळ येऊ लागला तशी माझी भीती वाढू लागली. माझे नाव पुकारले गेले आणि मी आतून धडपडलोच. व्यासपीठावर गेलो. माझे हातपाय थरथरायला लागले.
परीक्षक मला, “घाबरू नकोस. बोल तू.’ असा धीर देऊ लागले. त्याबरोबर माझी भीती आणखी वाढू लागली. मी कशीबशी तीनचार वाक्ये बोललो आणि पुढचे काही आठवेच ना! खरे तर मी भाषण चोख पाठ केले होते. सरांनी माझ्याकडून घोटवून घेतले होते. कोणाचाही ऑफ पिरिअड असला की माझे भाषण ठेवायचे. भरपूर सराव झाला होता. आईबाबा आणि काकाकाकीसुद्धा खूश होते माझ्यावर. हे सगळे आठवले. पण भाषण आठवेना. मी तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा म्हणू लागलो. शब्दसुद्धा थरथरत येऊ लागले. अखेरीस मला रडू आले. मी तसाच खाली उतरलो आणि टेबलावर डोके टेकून खूप वेळ तसाच बसून राहिलो.
उतारा क्र. 3
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
पुढे दिलेल्या घटनांचे परिणाम लिहा:
घटना | परिणाम |
लिली प्रहसनात काम करी, तेव्हा प्रेक्षागारात हास्यलहरी उठत. |
उत्तर:
घटना | परिणाम |
लिली प्रहसनात काम करी, तेव्हा प्रेक्षागारात हास्यलहरी उठत. | मग स्टेज मॅनेजर निर्धास्त होई. त्याला लिलीच्या कामाकडे लक्ष देण्याची गरज राहत नसे. |
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
माहिती लिहा:
मॅनेजरला घडलेले लिलीचे दर्शन.
उत्तर:
लिलीची मुद्रा पांढरी पडली होती. आजवर तिच्या गोड गळ्याने तिला दगा दिला नव्हता. तिची एवढी अवहेलना झाली नव्हती! अपमानित अवस्थेत ती मुकाट्याने विंगेत परतली.
प्रश्न 2.
अर्थ स्पष्ट करा:
विदयुल्लता चमकावी आणि क्षणार्धात घनदाट अंधकारात विलीन होऊन जावी, असा प्रकार घडला होता.
उत्तर:
वीज चमकते तेव्हा आसमंत झळाळून जातो. लख्ख प्रकाश पडतो. पण वीज चमकून गेली की, मिट्ट काळोख होतो. प्रकाशाचा टिपूसही दिसत नाही. लिलीच्या बाबतीत असेच घडले. तिची कारकीर्द झळाळत होती. तिला नाव मिळत होते. पैसा मिळत होता. तिचे हे तेज क्षणार्धात नष्ट झाले. तिच्या तेजाचा पुसटसा बिंदूही प्रकट झाला नाही. मिट्ट काळोख पसरावा तसे झाले.
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
लिलीच्या या प्रसंगासंबंधात तिथे हजर असलेल्या एका रसिक श्रोत्याचे मनोगत लिहा.
उत्तर:
अरे देवा! काय घडले हे? विश्वासच बसत नाही. किती वेळा या लिलीचे कार्यक्रम मी पाहिले आहेत! किती वेळा गायन ऐकले आहे! प्रत्येक वेळी ती चार पावले पुढेच जात होती. तिची प्रगतीच होत होती. तिचे बहारदार नृत्य, रसाळ गायन, वातावरण प्रसन्न करणारा तिचा अभिनय! काय बोलावे त्याबद्दल? आता हा आनंद संपला. तिची अलौकिक कला लोप पावली.
असे कसे झाले? काय खाल्ले असेल तिने? तिच्या अन्नात कोणीतरी काहीतरी मिसळले नाही ना? एखादयाचे चांगले कोणाला पाहवत नाही. ते विनाकारण शत्रू बनतात आणि असा घात करतात. असा कोणी दुष्ट असेल, तर त्याला शोधलेच पाहिजे. छे, छे! अशी वेळ वैऱ्यावरसुद्धा येऊ नये. खरे म्हणजे हे फक्त लिलीचे नुकसान नाही. हे आम्हां रसिकांचेही नुकसान आहे. काय करणार? आलिया भोगासी…!
उतारा क्र. 4
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
पुढील वाक्यामागील भाव स्पष्ट करा:
मॅनेजरला ते माहीत का नव्हते?
उत्तर:
मॅनेजर लिलीला खूप आधीपासून ओळखत होता. तिचे अनेक कार्यक्रम त्याने जवळून पाहिले होते. कलावंत म्हणून असलेले तिचे मोठेपण त्याला माहीत होते. तिची असहायता, अगतिकता त्याला समजत होती. त्यामुळे तिने मॅनेजरजवळ दिलगिरी व्यक्त करण्याची गरज नव्हती. हा सर्व भाव त्या छोट्याशा एका वाक्यात आहे.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
मॅनेजरने घेतलेल्या निर्णयावर तुमचे मत नोंदवा.
उत्तर:
मॅनेजरने खरे तर फार मोठा धोका पत्करला होता. कारण चार्ली त्या वेळी 5 वर्षांचा होता. 5 वर्षांच्या मुलाची समज ती काय असणार? कला म्हणजे काय हे समजून घेणे त्याच्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट होती. कलेच्या सादरीकरणातील खाचाखोचा त्याला कळणे शक्यच नव्हते. तो सतत आईसोबत असल्याने आईचे गाणे त्याच्या कानांवर सततच पडत होते. बालबुद्धीनुसार तो ते गाणे सतत गुणगुणत, गात राहिला असणार. आईच्या गायनाचे अनुकरण करीत करीत त्याने तिचे गायन आत्मसात केले. ते केवळ आईचे गायन नव्हते, तर ते उत्तम गायन होते. मॅनेजरने हे पाहिले होते, ऐकले होते. त्याला चार्लीचा अंतर्यामी विश्वास वाटत होता. म्हणून त्याने पाच वर्षांच्या चार्लीला स्टेजवर आणले, असे माझे मत आहे.
उतारा क्र. 5
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
पुढील उद्गार कोणी, कोणाला उद्देशून काढले ते लिहा:
1. याच्या आईची प्रकृती अचानक बिघडली… तेव्हा तिचं अपुरं राहिलेलं गाणं आता हा पुरं करील!
2. मी आधी पैसे गोळा करतो आणि मग राहिलेलं गाणं म्हणून दाखवतो.
उत्तर:
1. स्टेज मॅनेजर – रसिक श्रोत्यांना.
2. चार्ली – रसिक श्रोत्यांना.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
का ते लिहा:
1. श्रोत्यांनी स्टेजवर पैशांची उधळण केली.
2. चार्लीने ताबडतोब स्टेज मॅनेजरचा पाठलाग केला.
उत्तर:
1. चार्लीच्या गाण्याने सारे श्रोते भारावून गेले.
2. श्रोत्यांनी चार्लीच्या गायनासाठी स्टेजवर उधळलेले पैसे गोळा करून स्टेज मॅनेजर निघून गेला.
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारे स्टेज मॅनेजरचे गुण लिहा.
उत्तर:
‘स्टेज मॅनेजर’ याला मराठीत ‘रंगमंच व्यवस्थापक’ म्हणतात. हा खरे तर व्यावसायिक. त्याचे काम खूप महत्त्वाचे असते. स्टेजवरचे पडदे, सर्व दिवे, ध्वनिव्यवस्था, वादयवृंदाची व्यवस्था, नेपथ्याची व्यवस्था वगैरे सर्व बाबी रंगमंच व्यवस्थापक सांभाळतो. हे काम करता करता त्याचे लिली व चार्ली यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. लिलीच्या रंगमंच व्यवस्थापकाला मनुष्यस्वभावाची चांगली जाण आहे.
त्याला लिलीची कलेवरील निष्ठा आणि तिचे कलावंत म्हणून असलेले सामर्थ्य कळते. चार्लीची क्षमताही त्याने अचूक ओळखली. पाच वर्षांच्या चार्लीने पदार्पणातच आपली क्षमता सिद्ध केली. श्रोत्यांनी उधळलेले पैसे गोळा करून तो लिलीला नेऊन देतो. यात त्याचा प्रामाणिकपणा दिसतो. आलेल्या श्रोत्यांना-प्रेक्षकांना पूर्ण कार्यक्रम दाखवला पाहिजे, ही कर्तव्याची भावनाही त्याच्या मनात है असते. मुख्य म्हणजे व्यवहाराच्या पलीकडे जाऊन माणसांशी जिव्हाळ्याने वागण्याचा मोठा गुण त्याच्याकडे आहे.
उतारा क्र. 6
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
का ते लिहा:
1. चार्लीच्या जिवात जीव आला.
2. प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतले.
उत्तर:
1. आपल्याला मिळालेले पैसे स्टेज मॅनेजर हडप करतो की काय, ही चार्लीला शंका आली. म्हणून त्याने त्याचा पाठलागही केला. पण मॅनेजरने ते पैसे चार्लीच्या आईकडे दिले. म्हणून चार्लीच्या जिवात जीव आला.
2. चार्लीच्या आईचा आवाज अचानक बसल्यामुळे तिचे गाणे अर्धवट राहिले. त्यामुळे श्रोत्यांचा विरस झाला होता. या पार्श्वभूमीवर चार्लीने उरलेले गाणे आईप्रमाणे हुबेहूब म्हटले. आणि चार्ली त्या वेळी अवघा पाच वर्षांचा होता. या सर्व बाबींमुळे श्रोते बेहद्द खूश झाले. त्यांनी आनंदाच्या भरात थिएटर डोक्यावर घेतले.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
या उताऱ्यातून तुम्हांला जाणवणारे चार्लीचे स्वभावगुण लिहा.
उत्तर:
चार्लीचे वय पाच वर्षे होते. म्हणजे अज्ञानी बालकच तो. तो त्याच्या स्वभावाला अनुसरून नैसर्गिकपणे वागला. वास्तविक अशा समारंभाचे संकेत असतात. ते सर्वांनी पाळायचे असतात. पण चार्ली गाणे थांबवून पैसे गोळा करतो. पैसे घेऊन जाणाऱ्या मॅनेजरचा पाठलाग करतो. समारंभाचे संकेत मोडून तो बालसुलभ वृत्तीने वागतो. त्यामुळे गमतीदार विसंगती निर्माण होते. त्याची निरीक्षण शक्ती जबरदस्त आहे. म्हणून आईच्या गायनाची तो हुबेहूब नक्कल करतो. अन्य नकलाही करतो. रंगमंचावर वावरताना तो घाबरत नाही, गोंधळत नाही. कलावंताकडे असलेले हे महत्त्वाचे गुण त्याच्याकडे दिसतात.
उतारा क्र. 7
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
भाषाभ्यास:
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:
1. समास:
प्रश्न 1.
तक्ता भरा:
उत्तर:
सामासिक शब्द | विग्रह |
1. दुःष्काळ | दुः (वाईट) असा काळ |
2. आठवडा | आठ दिवसांचा समूह |
3. नेआण | ने आणि आण |
4. धर्माधर्म | धर्म किंवा अधर्म |
5. पालापाचोळा | पाला, पाचोळा वगैरे |
2. शब्दसिद्धी:
प्रश्न 1.
‘कार’ प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:
- कथाकार
- नाटककार
- संगीतकार
- शिल्पकार
3. वाक्प्रचार:
प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
- नाचक्की होणे
- भान हरपणे
- लुप्त होणे
- पाठ थोपटणे.
उत्तर:
- नाचक्की होणे – अर्थ : अब्रू जाणे.
वाक्य : सरांना उलट उत्तर देऊन सुरेशने स्वतःची नाचक्की केली. - भान हरपणे – अर्थ : जाणीव न उरणे.
वाक्य: चित्र रंगवताना शालिनीचे भान हरपले. - लुप्त होणे – अर्थ : नाहीसे होणे.
वाक्य: कडक उन्हाळ्यामुळे विहिरीतले पाणी लुप्त झाले. - पाठ थोपटणे – अर्थ : शाबासकी देणे.
वाक्य : निबंधस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मालतीची सरांनी पाठ थोपटली.
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:
1. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1.
पुढील शब्दात लपलेले प्रत्येकी चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
- दुसरीकडे
- लांबसडक
- उदासवाण्या
- पदन्यासात.
उत्तर:
प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
- बाहेर
- गोड
- धूसर
- सुरेल
- धाकटा
- दूर.
उत्तर:
- बाहेर × आत
- गोड × कडू
- धूसर × स्पष्ट
- सुरेल × कर्कश
- धाकटा × थोरला
- दूर × जवळ.
2. लेखननियम:
प्रश्न 1.
अनुस्वार लेखनाबाबतचे नियम:
पुढील शब्द वाचा.
उत्तर:
‘रंग’, ‘पंकज’, ‘पंचमी’, ‘पंडित’, ‘अंबुज’ हे शब्द तत्सम आहेत. हे आपण पर-सवर्णानेसुद्धा लिहू शकतो. म्हणजे अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिक वापरून लिहू शकतो. उदा., रङ्ग, पङ्कज, पञ्चमी, पण्डित, अम्बुज असे. विशेषतः जुने साहित्य वाचले तर असे लेखन दिसते. परंतु, आजकाल अशी परसवर्णाने लिहिण्याची पद्धत जुनी झाली आहे. त्याऐवजी अनुस्वारच वापरले जातात. पुढील शब्द बघा कसे दिसतात!
‘निबन्ध’, ‘आम्बा’, ‘खन्त’, ‘सम्प’, ‘दगा’ हे शब्द बघायला विचित्र वाटतात ना! कारण हे तत्सम नाहीत. पर-सवर्ण लिहिण्याची पद्धत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू देऊनच लिहावेत.
मराठीत स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू दयावा.
पुढील शब्द वाचा.
‘सिंह’, ‘संयम’, ‘मांस’, ‘संहार’ या शब्दांचा उच्चार खरे तर खूप वेगळा आहे ना? या शब्दांचे ‘सिंव्ह’, ‘संय्यम’, ‘मांव्स’, ‘संव्हार’ अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू दयावा.
असे उच्चार होत असले तरी लिहिताना हे शब्द तसे लिहू नयेत.
नियम : य्, र, ल, व्, श्, प्, स्, ह यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबददल केवळ शीर्षबिंदू दयावा.
प्रश्न 1.
पुढील शब्द पर-सवर्णाने लिहा:
- घंटा
- मंदिर
- चंपा
- चंचल
- मंगल.
उत्तर:
- घण्टा
- मन्दिर
- चम्पा
- चञ्चल
- मङ्गल.
प्रश्न 2.
पुढील शब्द अनुस्वार वापरून लिहा:
- जङ्गल
- चेण्डू
- सञ्च
- गोन्धळ
- बम्ब.
उत्तर:
- जंगल
- चेंडू
- संच
- गोंधळ
- बंब.
प्रश्न 3.
पुढील शब्द लेखननियमांनुसार अचूक लिहा :
- त्रिकालाबाधित
- हास्यकल्लोळ
- यत्किंचित
- प्रकृती
- कंठमाधुर्य.
उत्तर:
- त्रीकाळाबाधीत
- हस्यकलोल
- यक्तिचीत
- परक्रुती
- कंठमाधूर्य.
3. विरामचिन्हे:
प्रश्न 1.
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा:
मॅनेजर म्हणाला छे छे तुम्ही आता स्टेजवर जाण्याची गरज नाही.
उत्तर:
मॅनेजर म्हणाला, “छे, छे! तुम्ही आता स्टेजवर जाण्याची गरज नाही.”
4. पारिभाषिक शब्द:
प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा :
1. Children Theatre
2. Anniversary.
उत्तर:
1. बालरंगभूमी
2. वर्धापन दिन.
उपक्रम:
प्रश्न 1.
हसरे दु:ख’ या पाठातील पाठ्यांशाचे नाट्यीकरण करून वर्गात सादरीकरण करा.
हसरे दुःख Summary in Marathi
प्रस्तावना:
भा. द. खेर हे जुन्या पिढीतील एक सुप्रसिद्ध लेखक. त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे काही लेखन पुढीलप्रमाणे:
कादंबऱ्या: ‘सुखाचा लपंडाव’, ‘प्रायश्चित्त’, ‘शुभमंगल’, ‘नंदादीप’, ‘वादळवारा’, ‘यज्ञ’, ‘अमृतपुत्र’.
अन्य लेखन: ‘आईन्स्टाईनचे नवे विश्व’, ‘गीताज्ञानदेवी’, ‘अपरोक्षानुभूती’, ‘अधांतरी’, ‘द प्रिन्सेस’ इत्यादी.
प्रस्तुत पाठात चार्ली चॅप्लिनचा कलेच्या प्रांतातील प्रवेशाचा प्रसंग चित्रित केला आहे. यातील दुर्दैवाचा भाग असा की, त्याच्या आईच्या कारकिर्दीचा दु:खद अंत झाला, त्या क्षणीच त्याची कलावंत म्हणून कारकीर्द सुरू झाली. एकच क्षण सुख आणि दु:ख यांनी भरलेला! म्हणून त्या प्रसंगातील भावनांना ‘हसरे दुःख’ असे नाव दिले आहे.
शब्दार्थ:
- तेजोमय – तेजाने युक्त, तेजस्वी.
- कंठमाधुर्य – कंठाचे माधुर्य, गळ्याचा गोडवा, म्हणजे आवाजाचा गोडवा.
- विध – घायाळ.
- विपरीत – उलट, विरुद्ध (वाईट या अर्थाने रूढ).
- कावराबावरा – भीतीने बावरलेला, बुजलेला.
- पदन्यास – पावलांची लयदार हालचाल.
- अवहेलना – हेटाळणी.
- नाचक्की – बदनामी.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:
- नजर खिळून राहणे – एकाग्रतेने पाहणे.
- जिवाचा कान करणे – मन लावून ऐकणे.
- भान हरपणे – गुंग होणे.
- तंद्री लागणे – गुंग होणे.
- रंगात येणे – तल्लीन होणे.
- दम धरणे – धीर धरणे.
- दम निघून जाणे – धीर सुटणे.